Uncategorized

  • आज जि.प समोर शिक्षक परिषदेचे ढोल बजाओ आंदोलन..

    ▫️१४ शिक्षक संघटनांनी ढोल बजाव आंदोलनास दिला पाठिंबा. ▫️आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन. नांदेड प्रतिनिधी:- १५ सप्टेंबर  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने प्रलंबित असलेले मागण्या सोडविण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन ०४ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी जिल्हापरिषद नांदेड यांना देऊन निकाली काढण्याची मागणी करण्यात आलेली होती परंतु प्रशासनाने कुठलीही प्रश्न निकाली काढलेले नाहीत म्हणून शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर…

    Read More »
  • मुखेडमध्ये अवैध सावकारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    मुखेड प्रतिनिधी:- १४ सप्टेंबर तालुक्यातील मौजे दापका राजा येथील एका व्यक्तीने ३ टक्के दराने अवैधरित्या व्याजाने पैसे दिल्या प्रकरणी सहाय्यक अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी मारुती किशन गायकवाड (रा. दापका राजा, ता. मुखेड) याने पीडितास तीन टक्के व्याजदराने १३ हजार ५०० रुपये दिले होते. जवळपास सहा महिने त्यांच्याकडून व्याज वसूल करण्यात आले. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या भावाने सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. शहानिशा केली असता आरोपीने कुठलाही परवाना नसताना व्याजाने रक्कम दिल्याचे आढळून आले. तसेच व्याज वसुलीही केली होती सहाय्यक अधिकारी नारायण श्रीरंगराव होनराव यांनी याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक २१३/२०२५ दाखल केला आहे तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल तेलंग हे करीत आहेत

    Read More »
  • जि.प.मुलींचे हायस्कूलच्या २५० विद्यार्थ्यांना मोफत कंपासपेटी.

    ▫️विध्यार्थ्यांच्या शैक्षणीक विकासासाठी तोटरे परिवाराचा पुढाकार. मुखेड / प्रतिनिधी. जि.प.शाळेचे माजी विद्यार्थी तथा नांदेड महानगरपालिकेचे टाऊन प्लॅन इंजिनियर स्व.परमेश्वर तोटरे…

    Read More »
  • मंदिरात का गेला म्हणत मारहाण ; सहा जणांविरुध्द अट्रॉसिटीसह विविध गुन्हा दाखल

    उमरी / प्रतिनिधी १३ सप्टेंबर मंदिरात दर्शनासाठी का गेलास म्हणत एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उमरी तालुक्यातील मौजे शिरुर येथे घडली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुध्द उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे शिरुर येथील रहिवासी तथा मिस्त्री प्रकाश माधव टिकेकर ४३ हे व त्यांची मुलगी आसे गावातील मारुती मंदिरात दि. ५ सप्टेंबर रोजी दर्शनासाठी गेले होते. मंदिरात दर्शन घेवून ते खाली उतरत असताना शिरुर मधील बाळू लक्ष्मण मामंडे याने त्यांचा हात धरुन जातीवाचक शिविगाळ करीत तू आमच्या मंदिरात कसे काय गेलास म्हणत खाली ओढत आणले आणि बाळू व त्याचे सहकारी गोविंद पिराजी मामंडे, विठ्ठल महाजन दाताळकर, माधव किशन खतगावे, साईनाथ बापुराव जाधव व अन्य एक अशासहा जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. आपण हिंदू मांतग आहेत ते माहित असूनही आरोपींनी जातीवाचक शिविगाळ करीत लाथा बुक्क्या घातल्या. त्यामुळे आपण पळून गेलो व जीव वाचविला, अशी फिर्याद टिकेकर यांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी उमरी पोलिस ठाण्यात उपरोक्त सहा आरोपीं विरुध्ददि. ११ सप्टेंबर रोजी गुरनं २९२/२५, अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील करीत आहेत.

    Read More »
  • तांदळाच्या ६२० गोण्या घेऊन जाणारा ट्रक फुलवळ टोलनाक्याजवळ उलटला 

    ▫️माल हा काळ्याबाजारात चालला होता की काय? कंधार प्रतिनिधी:- १३ सप्टेंबर  नांदेड–बिदर राष्ट्रीय महामार्गावरील फुलवळ टोलनाक्याजवळ (ता कंधार ) रस्त्यावर तांदूळ घेऊनजाणारा ट्रक उलटला. ही घटना शुक्रवारी(दि.१२) सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. टोलनाक्याजवळ पलटी होऊन तांदळाचे भरलेले पोते अस्ताव्यस्त पडल्यामुळे सदरचा माल हा काळ्याबाजारात चालला होता की काय ? असा प्रश्न उपस्थित करून परिसरात चर्चेला उधान आल्याचेऐकावयास मिळत होते. याबाबतची अधिक माहिती अशी की ट्रक क्रमांक पी.बी.०४/ एएफ–८४४८ हा पंजाब पासिंग चा ट्रकअसून अंदाजे प्रति पोते ५० किलो याप्रमाणे ६२० तांदळाने भरलेले पोत्यासहीत पलटी झाला. ही बाबलक्षात येताच फुलवळ, बहाद्दरपुरा, कंधार येथे पसरताच तात्काळ या ठिकाणी शेकडो नागरिकांची बघ्यांची गर्दी जमा झाली होती. ट्रक पलटी होताच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तींनी ट्रक चालकास केबिनच्या बाहेर काढून काही दुखापत झाली का? अशी विचारणा करत चालकाचे नाव विचारले असता रामेश्वर उर्फ परमेश्वरकाशिनाथ जाहीर रा. लिंबोटी ता. लोहा जि. नांदेड येथील रहिवासी असून सदरचा तांदूळ हा बिदर येथून भरून गोंदियाकडे जात असल्याचे सांगत असताना तिथे मोठा बघ्यांचा जमाव झाल्याचे पाहून पुढील माहिती न देता त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला.…

    Read More »
  • माजी नगरसेवक सय्यद जानी यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश..

    नांदेड प्रतिनिधी: १२ सप्टेंबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक सय्यद जानी यांनी आज, शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी वंचित…

    Read More »
  • जि.प.मुलींचे हायस्कूलच्या शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने  सन्मान.

    ▫️शिक्षक दिन्नाचे औचित्य साधून  घेण्यात आले कार्यक्रम. मुखेड / प्रतिनिधी. १२ सप्टेंबर  शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील पिएमश्री, आदर्श शाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचेमुखेड या प्रशालेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू–भगिनिंचा शिक्षक दिन्नानिमित्त शाळाव्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेताब शेख यांच्या हस्ते गुलाबपुष्प,पुष्पगुच्छ व लेखणी भेट देवुनयथोचित सत्कार करण्यात आले.  शिक्षक दिन्नानिमित्त आयोजीत कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्लीराधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.त्यानंतर पिएमश्री,आदर्शशाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या शाळेतील मुख्याध्याप  डी.जे.कांबळे,सांस्कृतिकविभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे,सहशिक्षक एस.बी. राजपुत,विश्वांभर जाधव, बळीराममुद्देवाड,सौ.मधुमती लोणीकर,डॉ.बरकतउल्ला,अंबादास देशमुख,दिपक लोहबंदे, सौ.सुनिताआलमले,गंगाधर अनकडे,नागनाथ स्वामी, ए.के.जाधव,सुधीर शृंगारे, राहुलकूमार मेहरकर,कल्याणइंगळे,श्यामसुंदर दारकु,बालाजी गोंड,बळीराम दुरनाळे,चंद्रकांत डावकरे,हरी भालेराव,श्रीमती आशालतास्वामी,हरिदास पवार,पंढरी भालेराव,सौ.संगिता धनशेट्टी,सौ.सुरेखा हराळे, सौ.शिला उबाळे,सौ.सरस्वतीमुपडे,सौ.सुनिता पाटील,सौ.रेखा दिनकर,सौ.संगीता माळगे,सौ. अनुपमा टाकळीकर,व्यंकटीकेंद्रे,प्रकाश डोईजड,सौ.दिपाली बारहात्ते,सौ.नागसेना येवतीकर, सौ.एम.एच.गवते,सौ.अनितासाळुंखे,सौ.गंगामणी शेटकार, सौ.रंजना कदम,सौ.शाहेदाबी ताबोंळी,सौ.लुमावती गडगिळे, फय्युमद्दीनपटेल,सौ.राजकोर/कांबळे,जिवन वडजे,सय्यद अकबर,चौहान भवानीसिंह,पवार प्रशांत,सौ.केळेहरीबाई,अवधुत गीरी सह सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेताब शेखयांच्या हस्ते गुलाबपुष्प,पुष्पगुच्छ व लेखणी भेट देवून यथोचित सन्मान करण्यात आले.कार्यक्रमाचेप्रस्ताविक मुख्याध्यापक डी. जे.कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन दिलीपराव देवकांबळे यांनीकेले.उपस्थितांचे आभार सौ.सुरेखा हराळे यांनी मानले.माध्यमीक शिक्षक व्ही.एस.जाधव यांनी मनोगतव्यक्त केले.महेताब शेख यांनी सर्व शिक्षक बंधू–भगिनिंना शिक्षक दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या.

    Read More »
  • राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसाठी आरक्षण जाहीर

    ▫️नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष पद: ओबिसी महिला राखीव मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी घडामोडींना वेग येताना दिसत आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. या निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार असल्याची देखील माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तसेच केंद्रीय निवडणूक आयोग बिहार प्रमाणेच महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील वृत्त समोर आलं होतं. राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या आगामीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अतिशय जलद गतीनेघडामोडी घडत आहेत. असं असताना आता राज्याच्या ग्रामविकास  विभागाकडून जिल्हा परिषदेचेअध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. एकूण ३४ जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या जीआरनुसार, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा सर्वसाधर महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा ही अनुसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर अशा ८ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालं आहे. तर सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या ६ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलाप्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पालघर, नंदुरबार या दोन जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीवठेवण्यात आल्या आहेत. तर अहिल्यानगर, अकोला, वाशिम या 3 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदासाठी अनुसुचित जामाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. परभणी, हिंगोली, वर्धा या जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद हे अनुसुचित जातीसाठी आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलंआहे. तर बीड आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसुचित जाती महिला प्रवर्गसाठी आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. परभणी, रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, धाराशिव या जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला यासाठी आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर सोलापूर, नांदेड, नागपूर, भंडारा या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

    Read More »
  • ओळखपत्र न लावल्‍यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई होणार !

    ▫️११ वर्षांपूर्वी आदेश काढलेला असूनही त्‍याचे पालन न करणारे कर्तव्‍यचुकार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ! नांदेड प्रतिनिधी:- १२ सप्टेंबर शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी…

    Read More »
  • शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्यासाठी शिक्षक परिषदेचे 15 सप्टेंबर रोजी ढोल बजाओ आंदोलन

    ▫️मोठ्या संख्येने आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हाव शिक्षक नेते:- मधुकर उन्हाळे नांदेड प्रतिनिधी:- दि.१२ सप्टेंबर नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात…

    Read More »
Back to top button