सामाजिक
-
मुखेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के!
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ एप्रिल २६ आज सकाळी मुखेड शहर व परिसरातील ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साधारण ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला अनेक नागरिकांना जमिनीतून गुढ आवाज आल्याचा अनुभव आला. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असले, तरी अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकान मधे भीतीचे वातावरण होते. सकाळी ८:४५ च्या दरम्यान…
Read More » -
मुखेडमध्ये फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंतीचा उत्साह; विविध कार्यक्रमांचे आयोजन.
मुखेड / प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६ राष्ट्रनिर्माते, क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती व विश्वभुषण, महामानव…
Read More » -
मुखेड बस स्थानक परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६ येथील बस स्थानक परिसरात आज एक इसम मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ…
Read More » -
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर खरबखंडगाव येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे उपोषण सुटले.
▫️वादग्रस्त जागेवरील बांधकाम थांबवण्याचे आदेश मुखेड : प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ०७ एप्रिल २६ न्यायासाठी लढा देणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्ध माऊलीच्या संयमाला अखेर यश आले आहे. मुखेड तालुक्यातील खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरीबा कांबळे यांच्या मालकीच्या जागेवर गावातीलच काही धनदांडग्यांनी जबरदस्तीने सुरू केलेले बांधकाम प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर थांबवण्यात आले असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने मरुबाई सखाराम कांबळे यांनी आपले ८ दिवसीय उपोषण मागे घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सखाराम कांबळे यांची वारसदार पत्नी मरुबाई कांबळे आणि त्यांची सून लक्ष्मीबाई राजाराम कांबळे या आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी काही काळ बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन गावातील शिवाजी एकाळे, परमेश्वर एकाळे आणि यादवराव एकाळे यांनी…
Read More » -
आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या ‘कपाळकरंट्या’ कर्मचाऱ्यांवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक! पगारातून होणार १५ टक्के कपात
▫️तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक कायदा; आता जन्मदात्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत मुलांच्या खिशातून वसूल होणार! हैदराबाद/तेलंगणा (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०५ एप्रिल…
Read More » -
बांगड्या विकणाऱ्या चा मुलगा जमीर शेखची “धर्मदाय निरीक्षक” पदासाठी निवड.
मुखेड / प्रतिनिधी. श्रमिक एकता न्यूज़ ०४ एप्रिल २६ तालुक्यातील मौजे चांडोळा येथील बांगड्यांचे व्यवसायिक रहिमोद्दीन शेख यांचा मुलगा जमीर रहिमोदीन शेख यांनी अथक परिश्रम,जिद्द,चिकाटी आणी अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या (गट–ब) परीक्षेमध्ये ईडब्लूएस प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावत ‘धर्मदाय निरीक्षक‘ पदाला गवसणी घातली आहे.या यशाबद्दल जमीरचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्यातील मौजे चांडोळा येथील रहिवासी असलेले रहीमोद्दीन शेख हे चांडोळा व परिसरातील गावामध्ये बांगड्या विक्री करण्याचा व्यवसाय करून आपल्या कुंटुबांचा उदरनिर्वाह चालवीतात त्यांची घरची परिस्थिती अंत्यत हलाखीची असुन त्यांनी आपल्या व्यवसावरच कुटुंबाचा गाडा चालवत लेकरांना शिक्षण देण्याचे कार्य पाडले आहे.आपला मुलगा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी व्हावे म्हणून त्यांनी…
Read More » -
काळाचा क्रूर घाला! मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पित्याचाही मृत्यू; कंधार तालुक्यातील फुलवळवर शोककळा
▫️बाप-लेकावर एकाच वेळी झाले अंत्यसंस्कार; निछलकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कंधार (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०४ एप्रिल २०२६) निसर्गाचा नियम आहे की…
Read More » -
न्यायासाठी ८० वर्षीय मरुबाई कांबळे यांचे ‘आमरण उपोषण’! प्रशासकीय आश्वासनानंतरही मरुबाईंच्या जागेचा प्रश्न कायम
▫️तहसीलदारांच्या दिलेले लेखी आश्वासन हवेतच;उपोषणाचा आजचा पाचवा दिवस मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०३ एप्रिल २६ तालुक्यातील खरब खंडगाव येथील मरुबाई सखाराम कांबळे (वय ८० वर्षे) या वयोवृद्ध दलित महिलेच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळवून देण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. १३ जानेवारी२०२६ रोजी तहसीलदारांनी लेखी पत्र देऊनही अतिक्रमण धारकांवर कोणतीही कारवाई न झाल्याने, संतापलेल्या मरुबाई कांबळे यांनी आता ‘आमरण उपोषण’ पुकारले आहे.…
Read More » -
मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी!
▫️शहरात भीतीचे वातावरण; तात्काळ बंदोबस्त करण्याची ‘IMA’ मुखेडची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज ०१ एप्रिल २६ मुखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, कुत्र्यांच्या चाव्यामुळेरेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तात्काळपावले उचलण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) मुखेड शाखेने केली आहे. ‘आयएमए‘ने मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील आठवड्यात एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा…
Read More » -
“पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ निखळला!; ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे अपघाती निधन.”
नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ३१ मार्च २६ समाजप्रबोधनाचे शस्त्र हाती घेऊन जाती–पातीच्या भिंती तोडण्यासाठी आयुष्य वेचणारे, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि थोर विचारवंत ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकरयांचे आज मंगळवारी नांदेड शहरात झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर आणि पुरोगामी चळवळीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर भागात सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मधुकर महाराज हे आपल्या कामासाठी जात असताना MH 26 CH 4386 क्रमांकाच्या भरधाव टिपरने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महाराजांचाजागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. मधुकर महाराज बारुळकर हे केवळ एक कीर्तनकार नव्हते, तर ते एक प्रखर समाजसुधारक होते. आपल्या ओघवत्या भाषणातून समाज, राजकारण आणि दैनंदिन जीवनातील विसंगतीवर ते मार्मिक बोटठेवत असत. सर्वसमावेशक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली. त्यांच्या जाण्याने “पुरोगामी विचारांचा एक अनमोल हिरा” हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.…
Read More »