सामाजिक
-
पोलीस उपनिरिक्षक हणमंतराव चोंडीकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.
🔸गजानन त्यागमपुरे मित्रमंडळाने केले होते कार्यक्रमाचे आयोजन. मुखेड / प्रतिनिधी ३० जून २५ पोलीस उपनिरीक्षक हणमंत मारोतराव चोंडीकर हे नियत…
Read More » -
शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड
▫️विभागीय कार्याध्यक्षपदी बालाजी बामणे,उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, संघटकपदी ग.नु.जाधव यांची निवड नांदेड प्रतिनिधी:- २९ जून २५ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा शहरातील हॉटेल ताज पाटील येथे जिल्हा प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे यांच्या अध्यक्षते खाली, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, राज्य कार्यवाह पुरुषोत्तम काळे, राज्यसंघटन मंत्री सुरे दंडवते,राज्यकार्याध्यक्ष मच्छिंद्रगुरमे,विभागिय अध्यक्ष संजय कोठाळे, विभागीय उपाध्यक्ष अजित केंद्रे,पतीपत्नी शिक्षकसंघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भिंगोले,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माधवी पांचाळ यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. व उपस्थित शिक्षकांनी बदली धोरण,जुनी पेन्शन लागू करणे,जिल्हा पुरस्कार वेतनवाढ, केंद्रप्रमुख पदोन्नती याबाबत प्रश्न उपस्थित केले.यावर राज्य अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांना हे सर्व प्रश्न शासनस्तरवर मांडु असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित जिल्हा भरातील शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित नुतनजिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हाकार्यवाहपदी प्रल्हाद राठोड तर मराठवाडा विभाग स्तरावर कार्याध्यक्षपदी बालाजी बामणे,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील माळेगावकर,संघटक ग.नु.जाधव जिल्हा…
Read More » -
सरकारी अनुदान गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाई करा :- बच्चेवार यांची मागणी
मुखेड -(ता. प्रतिनिधी) २८ जून २५ तालुक्यातील बेरळी खुर्द येथील शेतजमिनीत अनधिकृत भूखंडीकरण आणि खोटा पेरा दाखवून शासनाच्या दुष्काळी अनुदानात…
Read More » -
विकलांग विधवा सेवा समिती च्या मराठवाडा उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे सलगरकर यांची निवड.
मुखेड प्रतिनिधी :- २४ जून २५ राष्ट्रीय विकलांग विधवा सेवा संघटना ही विकलांग व विधवा महिला भगिनी दिव्यांग बांधव यांच्या…
Read More » -
काँग्रेसच्या मागणीला यश, आंदोलनाचा इशारा देताच मुखेड आगारात पाच बसेस दाखल
मुखेड प्रतिनिधी :- १५ जून २५मुखेड आगार हे नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्नाचे असूनही नवीन बसेस नव्हते म्हणून काँग्रेस पक्षाने…
Read More » -
हिमायतनगर येथील 33 केव्ही उपकेंद्र महावितरण चे एकमेव कर्तव्यदक्ष कमर्चारी ( लाईणमैन ) ढगे देतात 24 तास सेवा
हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी हिमायातनगर महावितरण च्या निष्काळजी पणा बद्दल नेहमीच चर्चा हिमायतनगर च्या नागरिकांकडून ऐकव्यास मिळते उन्हाळा आला की…
Read More » -
मुखेड तालुक्यातील पिंपळकुंठा–बिल्लाळी पाटी रस्त्याची दयनीय अवस्था!
रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य; नागरिकांचे जीवन धोक्यात, प्रशासन मात्र गप्प मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील पिंपळकुठा ते बिल्लाळी पाटीदरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः…
Read More » -
बेटमोगरा येथील जि.प शाळेच्या मुख्याध्यापकाचे भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
▫️गुणपत्रिकेसाठी एका विद्यार्थ्याकडून हजारो रुपये उकळल्याने गटशिक्षणाधिकारीकडे तक्रार ◽️मुख्याध्यापकाने पैसे मागितल्याचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल! मुखेड प्रतिनिधी:- ०६ जून २५ मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने दिवसेंदिवस भ्रष्टकारभाराचे कळस गाठल्याचे दिसून येत आहे. दहावी बोर्ड परिक्षेच्या फि भरण्यापासून ते गुणपत्रिकादेण्यापर्यंत गावातील एका गरीब विद्यार्थ्याकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप. विद्यार्थ्याने मुख्याध्यापक विरोधात गटशिक्षणाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्याबोर्डाच्या परिक्षेत खाजगी रित्या १७ नंबरचा ऑनलाईन पद्धतीने फार्म भरून आपल्या पत्नीला परिक्षेत बसवण्याच्या आशेने तक्रारदार यादव खंडू नवलेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक वाय डी भैरवाडयांची भेट घेतली. मुख्याध्यापकाने गरिब विद्यार्थीनीच्या पतीच्या मजबुरीच्या फायदा घेत यासाठी हजारोंरुपयांची मागणी केली. याव्यतिरिक्त यादव नवलेकर यांनी स्वतः पैसे भरुन बाहेरुन ऑनलाईन पद्धतीनेअर्ज केले असतानाही पुन्हा ऑनलाईन करण्यासाठी दोन हजार लागतात, म्हणून नगदी दोन हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर परिक्षेच्या काळात बि.ओ. कार्यालयाच्या लोकांना पैसे पाठवले तरच तुमचीपत्नी पास होते असे खोटे बोलून पुन्हा दोन हजार रुपये उकळले. मात्र यादव नवलेकर यांना अनाधिकृतपणे मुख्याध्यापकाकडून येवढे आर्थिक फटके बसल्यानंतर उत्तीर्णझालेल्या पत्नीच्या गुणपत्रिकेसाठी मुख्याध्यापक वाय डी भैरवाड यांनी फोन करुन चक्क दोन हजार रुपयांची पुन्हा मागणी केल्याने संतापलेल्या पतीने मुख्याध्यापकाची केलेली कॉल रेकॉर्डींग दि.५ जूनरोजी मुखेड येथील संबंधित गटशिक्षणाधिकारी हामीद दौलताबादी यांच्याकडे सादर करुन लेखी निवेदनाद्वारे मुख्याध्यापक विरोधात तक्रार केली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सदर या निवेदनावर जयभिमसोनकांबळे,मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, मारोती गायकवाड, आसलम दौलताबादी सह आदींचीस्वाक्षऱ्या आहेत.
Read More » -
मुखेड शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले
मुखेड (प्रतिनिधी) ०६ जून २५ राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुखेड शहरात अत्यंत जल्लोषात आणि…
Read More » -
सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच का सैल होतेय? नांदेडमध्ये वर्षभरात ३३० हून अधिक घटस्फोट; संवाद हरवतोय,शंका वाढतेय
नांदेड – मोबाईलचा अतिरेक, संवादाचा अभाव, करिअरचा ताण, एकमेकांविषयी समजून न घेण्याचीवृत्ती… यामुळे नांदेडमध्ये सातजन्माच्या गाठी अल्पकाळातच सैल होऊ लागली आहे. २०२४ मध्ये नांदेडजिल्हा कौटुंबिक न्यायालयात तब्बल ३३१ घटस्फोटाचे खटले दाखल झाले, तर यंदाच्या केवळ पाचमहिन्यांतच १६४ नव्या तक्रारी समोर आल्या आहेत. तुटलेली माणुसकीची नाळ, सोशल मीडियामधील आभासी जग, लॉक असलेले फोन, अपत्यावरूनहोणारे वाद, सासुरवाशीण संघर्ष, आर्थिक असमतोल – ही आधुनिक घटस्फोटाची नवी कारणं ठरतआहेत. ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये म्युच्युअल सेपरेशन होत असून, कोर्टाऐवजी सामोपचारातून प्रश्नसोडवले जात आहेत. घटस्फोट आता फक्त वादामुळेच नव्हे, तर संवादाच्या अनुपस्थितीतही होतोय. “नात्यांमध्ये समजून घेणं, वेळ देणं आणि संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं झालं आहे,” असं मत अॅड. प्रसाद रानवळकर यांनी व्यक्तकेलं. घर तुटू नये म्हणून संवादाचं बंधन मजबूत ठेवा – नाहीतर ‘सातजन्माची’ गाठ एका क्लिकवर तुटू शकते!
Read More »