सामाजिक

  • मुखेडच्या पीएमश्री शाळेसमोर अस्वच्छतेचे साम्राज्य; राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाची कारवाईला बगल.

    ▫️शाळेच्या दारात मटणाची दुकाने, आजी माजी नगरसेवक व नेत्यांना मिळतोय भाड्याचा मलिदा ▫️१३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम; उपोषणाचा इशारा श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड ०३ जुलै २६ शहरातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल‘च्या परिसरात सध्या अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शाळेच्या आवारात चिकन–मटनच्या दुकानांमुळे…

    Read More »
  • संजीव डोईबळे यांना रोटरी फाउंडेशनचा मानाचा ‘पॉल हॅरिस फेलो’ (PHF) सन्मान

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड ०२ जुलै २६ रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीचे सदस्य रोटेरियन संजीव डोईबळे यांना रोटरी फाउंडेशनतर्फे…

    Read More »
  • माझ्या लेकाला वाचवा!’ म्हणत ६४ वर्षांच्या आईने दिली स्वतःची किडनी

    ▫️या माऊलीने दाखवलेल्या हिमतीला, त्यागाला आणि ममतेला आज सर्वत्र सलाम केला जात आहे. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- २९ जून २६  जगात आईची माया सर्वात श्रेष्ठ मानली जाते. या मातृत्वाची आणि अथांग प्रेमाची प्रचिती मुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. एका ६४ वर्षीय माऊलीने मृत्यूच्या दाढेत असलेल्या आपल्या ३० वर्षीय मुलाला स्वतःची किडनी दान करून अक्षरशः पुनर्जन्म दिला आहे. कमलबाई रामकांत शिंदे असे या धाडसी आणि प्रेमळ मातेचे नाव आहे. मुक्रमाबाद सेवा सहकारी सोसायटीचे माजी संचालक रमाकांत पा. शिंदे यांचा मुलगा उमेश (वय ३०) याची प्रकृती काही दिवसां पासून बरी नव्हती त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय तपासणी अंती उमेशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाच्या आजाराची ही धक्कादायक बातमी जेव्हा ६४ वर्षीय आई कमलबाई यांना समजली, तेव्हा त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, क्षणाचाही विलंब न लावता स्वतःची किडनी मुलाला देण्याचा धाडसी निर्णय घेतला.…

    Read More »
  • ९१ मुखेड विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम; अचूक मतदार यादीसाठी BLA-2 ची भूमिका महत्त्वाची – अनुप पाटील

    ▫️ ३० जून ते २९ जुलै दरम्यान BLO घरोघरी जाऊन करणार मतदार नोंदणी; राजकीय पक्षांच्या BLA-2 चीतहसील कार्यालयात बैठक संपन्न. मुखेड श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:-  भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (२०२६) जाहीर केला आहे. या अनुषंगाने ९१ मुखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या अचूक करण्यासाठी राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या BLA-2 (Booth Level Agent) यांचीभूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मतदार नोंदणी अधिकारी अनुप पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी २७ जून २०२६ रोजी मुखेड तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्याBLA-2 ची विशेष बैठक पार पडली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दिनांक ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ९१मुखेड विधानसभा मतदारसंघातील ३६६ केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) घरोघरी भेटी देणार आहेत. याभेटीदरम्यान ते मतदारांना ‘Enumeration Form’ (परिगणन नमुना) वाटप करून ते भरून घेण्याचेकाम करणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि BLO सोबत समन्वय ठेवण्यासाठी विविधराजकीय पक्षांनी आपले BLA-2 नियुक्त केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीने ३६६, भारतीयराष्ट्रीय काँग्रेसने २८२, शिवसेनेने २६३ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने २२३ BLA-2 नियुक्त केले आहेत. तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीत, SIR कार्यक्रमात BLO आणि BLA-02 यांची नेमकीजबाबदारी काय असेल, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील एकही पात्र मतदारयादीतून वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट होऊ नये, यासाठीBLA-02 यांनी दक्ष राहावे. तसेच, तात्पुरत्या स्वरूपात बाहेरगावी स्थलांतरित असलेल्या मतदारांमध्येजनजागृती करून त्यांचेही ‘Enumeration Form’ भरून घेण्याचे आवाहन अनुप पाटील यांनी याप्रसंगीकेले. या महत्त्वपूर्ण बैठकीला राजकीय पक्षांच्या वतीने भाजपचे BLA-01 शिवाजी राठोड आणि शिवसेनेचेबालाजी पाटील कबनुरकर उपस्थित होते. तसेच, प्रशासनाच्या वतीने निवडणूक नायब तहसीलदारसतीश जोहरे, महसूल सहाय्यक संदीप भुरे, लिपिक सुनील कुलकर्णी, डाटा एंट्री ऑपरेटर बबलू आतार, दफेदार गोपीनाथ पिंगळे आणि गणेश बंडे आदींची उपस्थिती होती.

    Read More »
  • नांदेड जिल्ह्याला मिळाले नवे सिंघम; डॉ. नीलाभ रोहन यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार

    ▫️हिंगोलीतील ऐतिहासिक व धडाकेबाज कामगिरी नांदेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २३ जून २६  नांदेड जिल्हा पोलीस दलाला अधिक बळकट आणि शिस्तबद्ध करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील आपल्या अल्पशा कार्यकाळात गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांची नांदेडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे. जून२०२६ च्या ताज्या प्रशासकीय बदल्यां नुसार त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.…

    Read More »
  • कै. माधवराव मुद्देवाड यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प; मित्र परिवाराकडून अभिवादन

    मुखेड / प्रतिनिधी :– श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६ कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि आयुष्यभर समाज हितालाच आपले ध्येय मानणारे कै. माधवराव मुद्देवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कै. मुद्देवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. कै. माधवराव मुद्देवाड हे केवळ एक नेते नव्हते, तर शेकडो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. या अभिवादन कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला. “कै. मुद्देवाड यांनी समाजातील शेवटच्या…

    Read More »
  • परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळून ७ जणांचा मृत्यू, ३२ भाविक जखमी

    परभणी: प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६  परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात आज एक अत्यंतदुर्दैवी आणि मोठी दुर्घटना घडली. मंदिराच्या सभा मंडपाचे छत अचानक कोसळल्याने ७ भाविकांचा मृत्यू झाला असून, ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण दबले गेले होते. शनिवार असल्याने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती, त्याच वेळी हा अपघात घडला. यशवाडी हे परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने, येथे दर शनिवारी आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आज सकाळ पासूनच मंदिरात भाविकांची मोठी रिघ लागली होती. मुख्य मंदिरा समोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच, दुपारी अचानक सभा मंडपाच्या चालू बांधकामाचा एक मोठाभाग पत्त्यासारखा कोसळला. पिलर आणि छताचा संपूर्ण राडारोडा थेट खाली उभ्या असलेल्या भाविकांवर पडल्याने मोठी जीवितहानी झाली. छत कोसळल्याचा प्रचंड आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळीदाखल झाला. मात्र, मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने सुरुवातीला बचाव पथक आणि रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिक आणि…

    Read More »
  • अवैध धंदेवाल्यांचा कर्दनकाळ ठरलेले डीआयजी शहाजी उमाप यांची मोठी कारवाई; परभणी एलसीबीसह ८ अमलदारांवर गाजली कुऱ्हाड!

    ▫️“कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल.” – डीआयजी शहाजी उमाप नांदेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६…

    Read More »
  • घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची छावाची मागणी !

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० जून २६ मुखेड तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू अद्याप उपलब्ध झाली नसुन ती…

    Read More »
  • शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचा प्रश्न आता लोकसभेत; दीपक सिंह हुजुरीयांचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे

    ▫️संवैधानिक हक्कांचे उल्लंघन आणि बोर्डाच्या रचनेवर प्रश्न नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ जून २६ नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि शीख समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून स्थानिक पातळीवरील राजकीय आणि धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते दीपक सिंह हुजुरीया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना थेट पत्र लिहून हे मुद्दे आगामी संसद अधिवेशनात मांडण्याची मागणी केलीआहे. हुजुरीया यांनी पाठविलेल्या पत्रात स्थानिक स्तरावर शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर दावा केला आहे.…

    Read More »
Back to top button