सामाजिक

  • शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचा प्रश्न आता लोकसभेत; दीपक सिंह हुजुरीयांचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे

    ▫️संवैधानिक हक्कांचे उल्लंघन आणि बोर्डाच्या रचनेवर प्रश्न नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ जून २६ नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि शीख समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून स्थानिक पातळीवरील राजकीय आणि धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्ते दीपक सिंह हुजुरीया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना थेट पत्र लिहून हे मुद्दे आगामी संसद अधिवेशनात मांडण्याची मागणी केलीआहे. हुजुरीया यांनी पाठविलेल्या पत्रात स्थानिक स्तरावर शीख समाजाच्या संवैधानिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर दावा केला आहे.…

    Read More »
  • मुखेड प्रभाग ९ मधील जनता कचऱ्याच्या विळख्यात; तक्रारींकडे प्रशासनाचा कानाडोळा

    ▫️घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक आजारपणाच्या उंबरठ्यावर मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १२ जून २६ स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करणाऱ्या मुखेड नगरपरिषदेचा खरा चेहरा प्रभाग क्रमांक ९ मध्ये उघडा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नाल्या कचरा आणि गाळाने तुंबल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.  वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रभाग ९ मधील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती अधिकच भीषण होते. सांडपाणी साचल्याने परिसरात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात राहणेही कठीण झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. येथील त्रस्त नागरिकांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली आहे. “प्रशासनाला आमचा बळीहवा आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. तक्रार करूनही स्वच्छता कर्मचारी प्रभागाकडे फिरकत नाहीत…

    Read More »
  • मुखेड येथे पोस्ट ऑफिसची हक्काची इमारत उभारण्याची डॉ.श्रावण रॅपणवाड यांनी केली मागणी

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १२ जून २६मुखेड शहरात अनेक वर्षांपासून पोस्ट ऑफिसची हक्काची जागा पडीक असून,सध्या हे कार्यालय एका…

    Read More »
  • जिद्द आणि चिकाटीचे फळ: सरफराज शेख यांना ‘श्रम-साफल्य पुरस्कार’ प्रदान

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ जून २६  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या युवकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून, नागपूर कारागृह पोलीस आणि SRPF पुणे अशा दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मुखेडचे सुपुत्र सरफराज मुजीब शेख यांचा ‘श्रम-साफल्य पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सरफराज शेख यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण परीक्षांत यश मिळवले. त्यांची निवड अखेर SRPF पुणे येथे झाली आहे. त्यांच्या या यशाने मुखेड शहराच्या शिरपेचात मानाचातुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां…

    Read More »
  • मुखेडची जनता वाऱ्यावर; सत्ताधारी नगरसेवकांची ‘देव दर्शन’ टूर मस्त सुरू!

    ▫️पाणी, रस्ते आणि कचऱ्याच्या समस्यांनी नागरिक त्रस्त; लोकप्रतिनिधी मात्र सहलीत मग्न. मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ १० जून २६  शहरात नागरी समस्यांचा डोंगर साचलेला असताना आणि नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करतअसताना, सत्ताधारी नगरसेवक मात्र ‘देव दर्शना‘च्या सहलीत मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून लोकप्रतिनिधींनी सहलीचा आनंद लुटणे, हा मुखेडकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी प्रभागातील नाल्या व रस्त्यांवरील खड्डे अजूनही बुजवले गेलेले नाहीत.…

    Read More »
  • वरिष्ठ लिपिक माधव तोटवाड यांच्या मातोश्री व्यंकुबाई तोटवाड यांचे निधन

    मुखेड: येथील उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक माधव हणमंतराव तोटवाड यांच्या मातोश्री व्यंकुबाई हणमंतराव तोटवाड यांचे आज रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन…

    Read More »
  • मुखेड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला गती; प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे ‘४ दिवसीय’ वेळापत्रक जाहीर

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ राज्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने निर्मित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला आहे. राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार, मुखेडचे तहसीलदार धनंजय राऊत  यांनी तालुक्यातील एकूण १०९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या निवडणूक आणि आरक्षण कार्यक्रमात मुखेड तालुक्यातील मुदत संपत आलेल्या १०८ ग्रामपंचायती आणि ‘येवती‘ ग्रामपंचायतीमधून नव्याने स्थापित झालेली ‘रत्नातांडा’ अशी एकूण १०९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाच्या परिपत्रका प्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण…

    Read More »
  • मुखेड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला बहुजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दरव–र्षीप्रमाणेयाही वर्षी ६ जून रोजी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शनिवार सकाळी १०.३० वाजता शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अभूतपूर्व उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा केला. याकार्यक्रमाला राजमुद्रा संघटनेचे युवा तरुन  शिवप्रेमी बांधव यांच्या सह जयप्रकाश कानगुले (नगरसेवकप्र ), सदानंद पाटील जाधव, शरद पाटील जाधव, शिवाजी गेदेवाड, नरेश इंगोले.शाम इंगोले ,मनोज इंगोले , कपिल काटेवाडे, बालाजी पा इंगोले सुरज जाधव, योगेश जाधव, विरभद्र स्वामी, विट्टल जामदार,  सचिन चिखलीकर, पपु पा पाटोदे, दत्ता गजलवाड, अज्ञान पाशा, वैभव इंगळे, साई भोसले, सोहम भिसे, हराळे मामा, वैभव बोडके, यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मुखेड–कंधार विधानसभा क्षेत्रातील बहुजन बांधवांनी मोलाची साथ दिली. या सोहळ्याने परिसरात राष्ट्राभिमान आणि शिवप्रेमाचे नवे जागरण घडवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजन समितीने केलेअसून, उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत, युवापिढीने शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन राजमुद्रा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..

    Read More »
  • नांदेड तालुक्यातील शासकीय डेपो मधील रेतीसाठयाचा १९ जून रोजी जाहिर लिलाव

    नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदेड तालुक्यातील शासकीय डेपोमधीलशिल्लक रेतीसाठयाचा जाहिर लिलाव शुक्रवार १९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वा. उपविभागीयअधिकारी कार्यालय, चिखलवाडी परिसर नांदेड येथील कार्यालयाचे सभागृह येथे करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यास इच्छूक व्यक्तींनी ओळखपत्रासह विहीत तारखेस उपस्थित राहावे, असेआवाहन उपविभागीय अधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.   नांदेड तालुक्यातील शासकीय रेती डेपोमधील शिल्लक रेतीसाठा पुढीलप्रमाणे आहे. मौ. रहाटी जुने वाघीता. नांदेड 38 हजार 712 उपलब्ध रेतीसाठा असून हातची किंमत 2 हजार 767 रुपये आहे.  याची हातचीकिंमत 10 कोटी 71 लाख 16 हजार 104 रुपये आहे. तर खुपसरवाडी येथे 1 हजार 5 उपलब्ध रेतीसाठाअसून हातची किंमत प्रति ब्रास 2 हजार 767 रुपये आहे. तर 27 लाख  80 हजार  835 रुपये याप्रमाणेआहे.   लिलावाच्या अटी व शर्ती महसूल व वनविभागाचा 8 एप्रिल 2025 व 15 जुलै 2025 शासन निर्णया प्रमाणे  राहतील. या जाहिर लिलावाच्या अटी व शर्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड वतहसिल कार्यालय, नांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत.

    Read More »
  • मराठवाडा विभागीय “होलार समाज चिंतन परिषद”मुखेड येथे संपन्न…

    ▫️राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी अण्णासाहेब जाहीरे जुन्नेकर तर मराठवाडा अध्यक्षपदी प्रा. वैजनाथ सुरनर यांची फेरनिवड…. मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०५ जून…

    Read More »
Back to top button