सामाजिक

  • मुखेड तालुका प्रशासनाचा मोठा निर्णय: ५ जूनपासून ‘या’ ६ दाखल्यांसाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल बंधनकारक!

    ▫️शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार धनंजय राऊत यांचे आदेश ▫️चुकीच्या पद्धतीला चाप; सीएससी आणि सेतू चालकांनाही कडक सूचना मुखेड प्रतिनिधी…

    Read More »
  • हिमायतनगरच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षकांकडून नागरिकांच्या ‘मोठ्या’ अपेक्षा!

    ▫️अवैध धंद्यांना चाप लावून सर्वसामान्यांना समान न्याय देण्याचे मोठे आव्हान हिमायतनगर प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़:- अजीम हिंदुस्तानी ०४ जून २६…

    Read More »
  • हिमायतनगर नगरपंचायतीचा ‘स्वच्छता’ नावाचा फार्स! नालीतील कचरा ४ दिवसांपासून रस्त्यावरच सडतोय; अर्धा कचरा पुन्हा नालीत!

    ▫️कचरा वेळेवर उचलण्यास प्रशासनाला मिळेना मुहूर्त; बाजाराच्या दिवशीही व्यापारी अन् नागरिकांचीकोंडी, जनतेमध्ये तीव्र संताप! हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी ०३ जून २६ शहरातील वार्ड क्रमांक २ मध्ये नगरपंचायतीच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा उत्तम नमुना पाहायला मिळत आहे. या वार्डात नाली स्वच्छतेचे काम तर करण्यात आले, मात्र नालीतून बाहेर काढलेला प्लास्टिक कचरा आणि दुर्गंधीयुक्त गाळ गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसाचपडून आहे. कचरा वेळीच न उचलल्या गेल्यामुळे वाऱ्याने आणि वाहनांच्या वर्दळीमुळे त्यातील अर्ध्याहून अधिक प्लास्टिक कचरा पुन्हा नालीत गेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा नेमका कसला स्वच्छता ‘फार्स‘ सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नियम कडक असतानाही नाली साफ केल्यानंतर तो कचरा त्वरित उचलणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा कचरा अनेक दिवस रस्त्यावरच सडत राहिला. आज बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी होती, तरीही रस्त्यालगत पडून असलेला गाळ व प्लास्टिक कचरा हटविण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखवले नाही. यामुळे व्यापारी, पादचारी आणि ग्राहकांना प्रचंड गैरसोयीचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागला. सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत नाल्या पूर्णपणे मोकळ्या करणे गरजेचे असताना, काढलेला कचरा पुन्हा नालीत जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्याच पावसात नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर आणि दुकानांत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “जर नालीतील कचरा बाहेर काढून तो पुन्हा नालीतच जाणार असेल, तर अशा दिखाऊ स्वच्छता मोहिमेचा फायदा काय?” असा रोखठोक प्रश्न स्थानिक जनतेने उपस्थित केला आहे.…

    Read More »
  • नांदेड महापालिकेचा निर्लज्ज कारभार! इस्लाम पुऱ्यात नळातून आले गटारा सारखे पाणी; नागरिकांच्या जिवाशी खेळ!

    ▫️‘दूषित पाणी की विष?’ नागरिकांचा संतप्त सवाल ▫️ऐन उन्हाळ्यात प्रभाग क्र. १८ मध्ये पाण्यासाठी हाहाकार; सैलाब नगर, वाघी रोड भागात भीषणपाणीटंचाईमुळे जनतेत तीव्र संताप! नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०२ जून २६ एकीकडे उन्हाची तीव्र दाहकता आणि दुसरीकडे महापालिकेचा ढिसाळ कारभार! नांदेडच्या इस्लाम पुरा भागात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील नागरिकांच्या नळाला चक्क गटारासारखे काळेकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महापालिका प्रशासनाच्या या अत्यंत बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या…

    Read More »
  • शासकीय आदेशाला केराची टोपली! मुखेड दुय्यम निबंधक कार्यालयात अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी न केल्याने समाजबांधव आक्रमक; तलाठी-पेशकारांच्या समक्ष जागेवरच पंचनामा!

    मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ३१ मे २६ शासकीय आदेशांना पायदळी तुडवत मुखेड शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली नसल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. राज्य शासनाचे कडक निर्देश असतानाही एका जबाबदार शासकीय कार्यालयात महापुरुषांची जयंती साजरी न करणे, हा थेट शासकीय आदेशाचा अवमान आणि समाजाच्या भावनांशी खेळ असल्याचा आरोप होत आहे. या गंभीर प्रकारामुळे मुखेड तालुक्यातील समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी थेट कार्यालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. घटनेची माहिती मिळताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसील प्रशासनाने तातडीने पावले उचलली. मुखेडचे तलाठी देशमुख आणि पेशकार हक्के यांनी तात्काळ दुय्यम निबंधक कार्यालयात धाव घेतली. उपस्थित समाजबांधवांच्या आणि अधिकाऱ्यांच्या समक्ष या संपूर्ण लाजिरवाण्या प्रकरणाचा जागेवरच‘पंचनामा’ करण्यात आला. शासकीय कार्यालयात जयंती न साजरी झाल्याचे पंचनाम्यातून अधिकृतपणे समोर आले आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुय्यम निबंधक…

    Read More »
  • भाई आसद बल्खी यांच्या ‘रोखठोक’ इशाऱ्याला यश! मुखेड प्रभाग क्र. ९ मध्ये नाल्यांची सफाई आणि बंद पथदिवे दुरुस्तीचे काम अखेर सुरू

    ▫️३ दिवसांत आंदोलनाचा ‘अंतिम इशारा’ मिळताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागे मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २९ मे २६ प्रभाग क्रमांक ०९ मधील नागरी समस्यांवरून नगर परिषद प्रशासनाला ३ दिवसांचा ‘अंतिमइशारा‘…

    Read More »
  • डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आक्रमक; मुखेड-लातूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन!

    ▫️मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी संतप्त; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत मुख्यालय प्रतिनिधी, मुखेड: मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असतानाच, गेल्या काही दिवसांपासून परिसरात डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. हक्काचे डिझेल वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज अचानक  मुखेड–लातूर महामार्गावर एकत्र येत जोरदार १५ मिनिट ‘रास्ता रोको‘ आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती.…

    Read More »
  • तुपदाळ खु. येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे कडब्याला भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

    मुखेड/ तुपदाळ खु प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २६ मे २६  तालुक्यातील तुपदाळ खु. येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील कडब्याच्या गंजीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत हणमंत रघुनाथ बोडके, जळशिंग मारोती बोडके आणि दादाराव नामदेव दोमाटे या शेतकऱ्यांच्या जवळपास १५ ते २० हजार कडबा पेंढ्या जळून खाक झाल्या असून, अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. याच कडक उन्हामुळे तुपदाळ खु. येथील शेतात साठवून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीने अचानक पेट घेतला. वाळलेला कडबा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ढीग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वर्षभर जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून साठवून ठेवलेला चारा डोळ्यादेखत जळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. आगीची माहिती मिळताच तुपदाळचे सरपंच संदिप चंद्रकांतराव घाटे…

    Read More »
  • लग्नातील वायफळ खर्चाला फाटा! पेठकर कुटुंबाने लग्नकार्यातून काढला संपूर्ण गावाचा ‘अपघाती विमा’

    ▫️धोंड्याच्या महिन्या’त जपली पुरोगामी विचारधारा कंधार प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ मे २६ लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा बडेजाव, अवाढव्य खर्च आणि पैशांची उधळण हे समीकरण आताठरलेलं असतं. पण याच थाटामाटाला फाटा देत, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरायेथील पेठकर कुटुंबाने समाजासमोर एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहे. आपल्या घरातीलविवाहसोहळ्याचे औचित्य साधत या कुटुंबाने गावातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांचा अपघातीविमा उतरवला असून, त्यांच्या या पुरोगामी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामान्यतः ‘धोंड्याचा महिना‘ (अधिक मास) हा शुभकार्यासाठी वर्ज्य मानला जातो. या काळात लग्नकिंवा इतर मंगल कार्ये करण्याचे अनेकजण टाळतात. मात्र, अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी–परंपरांना छेददेत पेठकर कुटुंबाने याच महिन्यात विवाहसोहळा संपन्न केला. केवळ लग्न उरकले नाही, तर त्यालासामाजिक भान आणि कर्तव्याची अनोखी जोड दिली. लग्नात मानपान, अवाजवी रोषणाई किंवा जेवणावळींवर लाखो रुपयांचा चुराडा करण्याऐवजी, पेठकरकुटुंबाने गावातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचा विचार केला. बहाद्दरपुरा गावातील सुमारे ३,५००लोकांचा अपघाती विमा काढून त्यांनी एकाच वेळी संपूर्ण गावाला सुरक्षिततेचे कवच बहाल केले आहे. आजकाल लग्नांमध्ये होणारा बडेजाव कर्जबाजारीपणाला कारणीभूत ठरत असताना, पेठकर कुटुंबानेघेतलेला हा निर्णय डोळे उघडणारा आहे. “लग्न असावं तर असं!” अशीच भावना आता परिसरातीलनागरिकांमधून व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही या ‘विमा लग्नाची‘ जोरदार चर्चा सुरू असून, हापुरोगामी विचार इतर कुटुंबांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. “लग्नाचा आनंद फक्त आमच्यापुरता मर्यादित न राहता, त्याचा फायदा संपूर्ण गावाला व्हावा आणिसंकटाच्या काळात गावकऱ्यांना मदत मिळावी, याच भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला.” — पेठकर…

    Read More »
  • काम पोलिसांसारखं, मग दर्जा मजुरासारखा का? राज्यातील ४० हजार होमगार्ड्सच्या व्यथा!

    ▫️वर्षातून केवळ ९० दिवसांचे काम; कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? ▫️१९४७ चा तो जुलमी कायदा बदला! होमगार्ड पोलिसांना ‘स्वयंसेवक‘ नव्हे, नियमित कर्मचारी घोषितकरा मुखेड प्रतिनिधी (श्रमिक एकता न्यूज): २१ मे २६  सण–उत्सव असो, कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न असो की निवडणुकांचा काळ; पोलिसांच्या खांद्याला खांदालावून चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील ४० हजारांहून अधिक होमगार्ड (गृहरक्षक दल) पोलिसांचे जगणे सध्या अत्यंत हलाखीचे बनले आहे. वर्षातील केवळ २ ते ३ महिनेच काम आणि त्यातही भत्त्याची अनिश्चितता, यामुळे हे रक्षक आज स्वतःच्या हक्कांसाठीच प्रशासनाशी संघर्ष करत आहेत. ब्रिटीशकालीन विचारांवर आधारलेला ‘बॉम्बे होमगार्ड…

    Read More »
Back to top button