क्राईम
-
कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोनजण गंभीर जखमी.
▫️पायाचे हाड तुटून कारच्या बोनेट मध्ये ▫️जखमींची प्रकृती चिंताजनक मुखेड / प्रतिनिधी. २८ जून २५ मुखेड–नरसी राज्य महार्गावरील बजरंगनगर शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाच्याजवळ एका दुचाकी वकारचा भिषण अपघात झाल्यामुळे दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२८ जुनरोजी अंदाजे १० वाजताच्या दरम्यान घडली आहे.गंभीर जखमी झालेले दोघे जांभळी व तांदळी येथीलरहिवाशी आहेत. सविस्तर वृत असे की मुखेड तालुक्यातील तांदळी येथील बालाजी गणपती गायकवाड व मारोती भुजंगजाभंळीकर राहणार जाभंळी हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२६ सीसी ६५२९ या दुचाकीवरुन मिस्त्री बांधकामासाठी रातोळी–टाकळी येथे जात होते तेव्हां मुखेड शहरालगत असलेल्या गरुडकर पेट्रोल पंपाजवळ…
Read More » -
धनादेश अनादरप्रकरणी एक वर्षाची शिक्षा; ६ लाखांची भरपाई करण्याचे न्यायालयाचे आदेश
◽️रक्कम एका महिन्यात भरली नाही, तर तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास मुखेड प्रतिनिधी:- २७ जून २५ पतीच्या पेन्शनमधून दिलेले ५ लाख…
Read More » -
१६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त
नांदेड, दि.२७ जून:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक आयुक्त संजय चट्टे व सहायक…
Read More » -
नांदेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास थेट गुन्हा दाखल; पोलिसांचा इशारा
नांदेड | २५ जून २५सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी…
Read More » -
दुर्दैवी घटना : खदानीत बुडून दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात सर्वत्र हळहळ
◽️लग्नासाठी मामाकडे आलेल्या संघर्षसोबत निखिलचाही अंत नांदेड प्रतिनिधी:- ३० मे २५ नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गावात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. खदानीतबुडून दोन शाळकरी अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे यांचा समावेश आहे. संघर्ष परघने हा आपल्या मामाच्या गावी, गारगव्हाण येथे, एका लग्नासाठी आलेला होता. रविवारी सकाळी संघर्ष आणि त्याचा मित्र निखिल दोघेही शेताकडे चालत जात होते. पावसामुळे रस्त्यात चिखल साचलेला होता. चालताना अचानक संघर्षचा पाय घसरून तो शेजारच्या खोल खदानीत पडला. संघर्षला वाचवण्यासाठी निखिल धावून गेला, पण तोही त्याच खदानीत बुडाला. स्थानिकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवर उशीर झाला होता. ही दुर्दैवी घटना गावासाठीअत्यंत धक्कादायक असून, दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक खदानींची तात्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read More » -
मुखेड-केरुर मार्गावर दुचाकी समोरासमोर धडकल्या, १ ठार ३ जखमी
मुखेड प्रतिनिधी:- ता.२९ मुखेड ते केरुर रस्त्यावरील तांदळी फाट्याजवळील उतारावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अॅड. राहुल चंद्रकांत सोनकांबळे वय ४१ वर्ष हे जागीच ठार झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमींना नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे . दुचाकी क्रमांक एम. एच. २६ सी. एस. ६६५१ मुखेड येथून केरुरकडे जात असताना समोरुन आलेल्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात राहुल सोनकांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक राहुल सोनकांबळे हे घरचे ते एकच…
Read More » -
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पीडित मुलीला भामट्यांनी फसवले ! मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल मुखेड प्रतिनिधी:- लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेऊन पीडित मुलीस गर्भवती करून जबरदस्तीने गर्भपात केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहितीअशी की, मुखेड तालुका येथील सुनील हणमंत बोडके (वय २६) या युवकाने एका मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक सबंधानंतर मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. यातून पीडित मुलगी गर्भवती झाली. पीडित मुलीस धमकी व भीती दाखवून उदगीर (जि. लातूर) येथीलखासगी रुग्णालयात गर्भपात करावयास लावले. ही घटना दि. २७ एप्रिल २०२३ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान झाली. याच्या विरोधात मुखेड पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिसनिरीक्षक अनुपमा केंद्रे या करीत आहेत.
Read More » -
नांदेड जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुक्कावार यांच्यासह २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
आरटीआय कार्यकर्ता शेख मकसूद शेख अहेमद लोहगांवकर यांनी न्यायालयात दाखल केली होती याचिका नांदेड प्रतिनिधी:- बिलोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठा ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या विविध घरकुल योजनेचेलाभार्थी घरकुलाचे बांधकाम करीत आहेत तर दुसरीकडे कुठलेही घरकुलाचे बांधकाम न करता शासनाच्या डोळ्यात धूळ झोकून सरपंच, ग्रामसेवक, इंजिनिअर, लेखाधिकारी, गटविकास यांच्या संगनमताने बिना घरकुलाचे बांधकाम करता प्रत्येक लेव्हलचे बनावट प्रमाणपत्र सादर करून बोगस(घरकुल लाभार्थ्यांनी शासनाच्या निधीची उचल केल्याचा धक्कादायक प्रकार बिलोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या कोठा ग्रामपंचायतमध्ये झाल्याने अधिकाऱ्यासह २० जणांवर फसवणूकीचा गुन्हा करण्यात आला आहे नांदेड–बिलोली तालुक्यातील कोठा येथील बारा लाभाथ्यर्थ्यांनी पूर्वीचे जुने पक्के घर असतानाही प्रधानमंत्री…
Read More » -
मुखेड तालुक्यात अवैध गौण खनिजाचा बोलबाला;तहसीलदारांचा याकडे कानाडोळा
मुखेड प्रतिनिधी:- दि ०८ एप्रिल २५ मुखेड शहरातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शासनाचे ठेके बंद असताना काळी रेती व लालरेती व विना नंबरच्या हायवा टिप्पर मध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात भरून वाहतूक होत असतानाच्या प्रशासनाकडे वारंवार सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्याकडून तक्रारी करण्यात येत होत्या तरी देखील तहसीलदारांनी कारवाई करत नसल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे मनोबल उंचावले त्याच बरोबर शहराच्या चारी बाजूला मुखेड ते कौठा रोडवर व मुखेड ते शिरूर ताजबंद रोडवर तसेच मुखेड ते हिप्पटरोडवर त्याचबरोबर मुखेड ते नरसी रोडवर खरब खंडगाव येथे अवैधरित्या दगड कटिंगच्या आरामशीन निर्माण झाल्या असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज साठवण केल्याचे दिसून येते याबाबत तहसील कार्यालय मुखेड यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करून देखील मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी कसल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याने शहरातील अवैधरित्या गौण खणीजचा व्यवसाय करणारे व्यवसाय हे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत आहेत या सर्व प्रकरणाला जबाबदार महसूल प्रशासन आहे नुकतीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अवैध वाहतूक यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे बावनकुळे यांनी आदेशित…
Read More » -
श्रमिक एकता न्यूज इफेक्ट एक लाखांचा गांजा जप्त तस्करांचे धाबे दणाणले
चक्क महिलेकडे सापडला तब्बल ४ किलो ३८ ग्रॅम गांजा मुखेड प्रतिनिधी:- शहरात व ग्रामीण भागात गांजाची विक्री होत असल्याची बातमी श्रमिक एकता न्यूज पोर्टल वर दि ५ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आली…
Read More »