क्राईम

  • हिमायतनगर हादरलं! राजकीय वैमनस्यातून दोन गट भिडले; उमर चौकात ‘रक्तरंजित राडा’

    हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी  श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या शुक्रवारी झालेल्या गँगवॉरच्या जखमा ताज्या असतानाच, आता हिमायतनगर शहरात भरदिवसा दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. राजकीय वैमनस्य आणि पैशांच्या वादातून झालेल्या या राड्यातचक्क तलवारींचा वापर करण्यात आला असून, यामध्ये ४ जण रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. हिमायतनगरमधील गजबजलेल्या उमर चौकात बुधवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. गेल्याकाही दिवसांपासून दोन गटांमध्ये राजकीय कारणावरून धुसफूस सुरू होती. बुधवारी या वादाचा स्फोट झाला. दोन्ही गट समोरासमोर आले आणि बघता बघता लाठ्या–काठ्यांसह धारदार तलवारी उपसल्या गेल्या. भरबाजारात सुरू असलेल्या या थरारामुळे व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची मोठी पळापळ झाली. विष्णूपुरीत उपचार सुरू…

    Read More »
  • लादगा येथे माणुसकीला काळीमा: तहानलेल्या महिलेवर अत्याचार, पीडितेची आत्महत्येने जीवनयात्रा संपवली

    मुखेड ( प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६ माणुसकीला लाजवेल अशी एक संतापजनक घटना लादगा (ता. मुखेड) येथे घडली आहे. पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका असहाय्य महिलेवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून आरोपीच्या विरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला आपल्या शेतात काम करत होती. कडक उन्हामुळे तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी शेजारच्या शेतात गेली. मात्र, तेथे असलेल्या रमेश्वर शिवाजी कोंडलवाडे याने तिला एकटे पाहून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या अघोरी कृत्यामुळे पीडितेच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. झालेल्या प्रकारामुळे कमालीच्या मानसिक दडपणाखाली असलेल्या या महिलेने अखेर टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरात गळफास घेण्या पूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. “आरोपीने…

    Read More »
  • मुंबई ते नरसी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! बिलोली DYSP पथकाचा ‘राज बार’वर छापा; ६ महिलांची सुटका, ४ जणांवर गुन्हा दाखल

    नायगाव/नरसी (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६) अनैतिक मानवी व्यापार आणि देहविक्रीच्या काळ्या व्यवसायाला चपराक देण्यासाठी बिलोली विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांच्या (DYSP) विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. नायगाव तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘राज बार अँड हॉटेल’ वर टाकलेल्या छाप्यात चक्क मुंबईहून महिलांना आणून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेआहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक मानवी व्यापारावर आळा घालण्यासाठी बिलोली DYSP च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे…

    Read More »
  • संसाराचा मांडव विखुरला! निर्दयी पतीने साडीच्या पदराने पत्नीचा गळा आवळून घेतला जीव; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६)  मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथे एका निर्दयी पतीने किरकोळ घरगुती वादातून आपल्या पत्नीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पती–पत्नीच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत स्वाती मारुती खांडेकर (वय ३० वर्ष) ही तिचा पती मारुती बाबुराव खांडेकर याच्यासोबत बेडरूममध्ये असताना दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात मारुतीने स्वातीच्या…

    Read More »
  • नांदेडमध्ये ‘रक्ताची होळी’ सुरूच! ७० तासांत ५ हत्या; गुन्हेगारांसमोर पोलीस हतबल, आता पुढचा बळी कोणाचा?

    ▫️आज पहाटे श्रीनगरमध्ये सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या; गुंडांच्या धुमाकूळाने नांदेड हादरले नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०६ एप्रिल २०२६)  नांदेड शहरात कायद्याचे राज्य संपून गुंडांची दहशत सुरू झाली आहे की काय? असा संतप्त सवाल आता…

    Read More »
  • नांदेडमध्ये रक्ताची होळी सुरूच! तिहेरी हत्याकांडानंतर २४ तासांत पुन्हा एक खून; शहरात दहशतीचे सावट

    ▫️मुर्मुरा गल्लीत रज्जूसिंगची तलवारीने वार करून निघृण हत्या; वजिराबाद पोलिसांकडून दोघांना बेड्या नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०५ एप्रिल २०२६)…

    Read More »
  • नांदेड हादरले! गँगवारमधून तिघांची निघृण हत्या; शासकीय रुग्णालयात घुसून हल्लेखोरांचा थरार

    ▫️ई-स्क्वेअर परिसरात एकाचा खून, तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांना संपवले; शहरात दहशतीचे वातावरण नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज (०४ एप्रिल…

    Read More »
  • सावधान! ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा: मुंबईतील तरुणीला ३२ लाखांचा गंडा; नांदेडचे ४ तरुण अटकेत

    नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ३० मार्च २६ डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईतील २१ वर्षीय तरुणीला दहशतवादाशी संबंध असल्याची भीती दाखवून…

    Read More »
  • नांदेड जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; बातमी छापल्याच्या रागातून पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पाच जण अटकेत

    अर्धापूर (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २८ मार्च २६ सत्य बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून एका पत्रकाराला धक्काबुक्की करून, त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या अर्धापूर पोलिसांनी आवळल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे समजते. नेमकी घटना काय? आंबेगाव (ता. अर्धापूर) येथील रहिवासी आणि ‘दैनिक श्रमिक लोकराज्य‘चे प्रतिनिधी रामचंद्र ऊर्फ मनोज माणिकराव मनपुर्वे यांनी २५ मार्च २०२६ रोजी एक धाडसी बातमी प्रसिद्ध केली होती. “लहानगावात भोंगा–डीजे बंदीचा निर्णय, पण अवैध दारूवर गावकऱ्यांचा रोष कायम“ अशा मथळ्याखाली हीबातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते.…

    Read More »
  • “कलेक्टरांची कारवाई नांदेड शहरपुरतीच का? मुखेडमध्ये रेती माफियांना प्रशासनाचे अभय!”

    ▫️“तक्रारी, बातम्या सगळे व्यर्थ; मुखेडमध्ये रेती माफिया बेधडक” मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६ नांदेड जिल्ह्यात अवैध रेती तस्करीवर जिल्हाधिकारी यांनी शहरात कडक कारवाई सुरू केली असली, तरी मुखेड तालुक्यात मात्र रेती माफियांना जणू मोकळे रान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज तब्बल ३० ते ४० हायवा गाड्या अवैध रेती घेऊन थेट तहसील…

    Read More »
Back to top button