Uncategorized

शेतकरी व कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुखेड तहसीलवर आंदोलन 

मुखेड / प्रतिनिधी ०१ ऑगस्ट २५

      शेतकरी व कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायात खंडणीखोर गावगुंड अडथळे निर्माण करीतआहेत. स्वंयघोषित समाजकंटकाकडून होत असलेली अडवणूक व कायदा हातात घेत होणारी लुटमार ताबडतोब बंद करावी. कुरेशी समाजावरील अन्याया विरोधात समाजाने जनावरे खरेदी– विक्री बेमुदत बंद आंदोलन सुरु केले असून विविध मागण्यांसाठी मुखेड येथे शेतकरी बांधव व कुरेश काॅन्फ्रन्स मुखेडच्यावतीने तहसील कार्यालयात गुरुवार (दि.३१) दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळीशासनाकडून मुद्दाम अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.  शेतकरी, व्यापाऱ्यांच्या विरोधात शासन काम करत आहे. त्याविरुद्ध संघटितपणे लोकशाही मार्गाने लढाउभारण्याचा निर्धार उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला. यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात हाफिज अब्दुल गफार,शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर, शेतकरी कार्यकर्ते सुभाष पा.गवते, माजी नगरसेवक नासरखा पठाण,युवा नेते खाजा धुंदी,शोकत होंनवडजकर,अब्दुल सय्यद,बबलू मुल्ला ,कुरेश काॅन्फ्रन्स जिल्हा सदस्य हसन खुदाबक्श कुरेशी, तालुकाध्यक्ष शफी कुरेशी, शहराध्यक्ष ईमरान मौलाना कुरेशी, तालुका उपाध्यक्ष मुजीब ताहेर कुरेशी, शहर उपाध्यक्ष गफार मदारसाब कुरेशी यांच्यासह मुखेड, मुक्रमाबाद, बेटमोगरा, सावरगाव, जांब, आंबुलगा, बाऱ्हाळी सह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button