Sharmik Ekta

  • सामाजिक

    लेंडी प्रकल्पग्रस्तांचे अखेर जलसमाधी आंदोलन! प्रशासनाची धावपळ, आठ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, मुखेड : १८ ऑगस्ट २०२६ लेंडी मध्यम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या हसनाळ (प.मु.) व परिसरातील नागरिकांनी शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध करत आज, १८ ऑगस्ट रोजी आधी दिलेल्या इशाऱ्यानुसार थेट धरणात उतरून ‘जलसमाधी‘ आंदोलन छेडले. संतप्त ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची मोठीधावपळ उडाली. अखेर प्रशासनाने पुढील आठ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शासनाने “आधी पुनर्वसन, मग धरण” हे धोरण राबवणे बंधनकारक असतानाही, पुनर्वसन पूर्ण नकरताच धरणात पाणीसाठा (गळभरणी) करण्यास परवानगी कशी दिली? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पामुळे आतापर्यंत पाच जणांचा नाहक बळी गेला असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. या दुर्दैवी घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरीही प्रकल्पग्रस्तांना अद्यापन्याय मिळालेला नाही. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ (समानतेचा अधिकार) आणि २१ (सन्मानाने जगण्याचा अधिकार) नुसार प्रकल्पग्रस्तांना सुरक्षित पुनर्वसन व मूलभूत सुविधा देणे ही शासनाची वैधानिक जबाबदारीअसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. प्रशासनाला शेकडो निवेदने देऊनही निराशाच पदरीपडत असल्याने, ७ ऑगस्ट रोजी नागरिकांनी जल समाधीचा इशारा दिला होता. आज झालेल्या जलसमाधी आंदोलना दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये…

    Read More »
  • सामाजिक

    राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेची जम्बो कार्यकारणी जाहीर.

    ▫️मराठवाडा,नांदेड जिल्हा,शहर व मुखेड तालुका पदाधिकाऱ्यांची निवड. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १७ ऑगस्ट२६   राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मान्यतेनुसार मराठवाडा अध्यक्ष आब्दुल माजीद बशीर,नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद मराठवाडा,जिल्हा, नांदेड शहर व मुखेड तालुका कार्यकारणी मध्ये नव्याने पदाधिका–यांच्या निवडी जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.निवडिबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन होत आहे.     राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद आयोजित समिक्षा बैठक व कार्यकारणी निवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जेष्ठ पत्रकार संपादक अलताफ सानी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून  मराठवाडा अध्यक्ष आब्दुल माजीद…

    Read More »
  • क्राईम

    ‘हिट अँड रन’: भरधाव कारच्या धडकेत ३१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

    ◽️निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या शिक्षकावर मुक्रमाबाद पोलिसांत गुन्हा दाखल श्रमिक एकता न्यूज़ मुखेड/बाराहाळी : १७ ऑगस्ट २६ पायी चालणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाला भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बाराहाळी–वडगाव राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या ‘हिट अँड रन‘ प्रकरणी बेफिकीरीने कार चालवणाऱ्या एका शिक्षकावर मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फयाज जावेदसाब शेख (वय ३१, रा. बाराहाळी) असे मयत तरुणाचे नाव असून ते मुंबईत पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे बाराहाळी (ता. मुखेड) येथील रहिवासी असलेले फयाज…

    Read More »
  • सामाजिक

    ॲड. सुनील पौळकर यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १६ ऑगस्ट २६ नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मुखेड येथील ‘दैनिक सकाळ’चे बातमीदार…

    Read More »
  • क्राईम

    बाह्राळी जवळ भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा बळी; शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    ▫️सुट्टीवर गावी आलेल्या तरुण पोस्टमास्टरचा भीषण अपघातात मृत्यू श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड / बाह्राळी: १६ ऑगस्ट २६  स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा भरधाव कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना बाह्राळी (ता. मुखेड) येथे घडली. शेख फय्याज जावेदसाब (वय ३०) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव असून, ते मुंबई येथे पोस्टमास्टर म्हणून कार्यरत होते. हा दुर्दैवी अपघात शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडला. शेख फय्याज हे मुंबईत पोस्टमास्टर पदावर कार्यरत होते व त्यांच्या नोकरीला नुकतीच तीन वर्षे पूर्ण…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचा धुरा यशवंतराव बोडकेंच्या हाती!

    ▫️नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा; पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे लढण्याचा नवनिर्वाचित अध्यक्षांचा निर्धार श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- १४ ऑगस्ट २६…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड शहरात शादीखान्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्या! 

    ◽️जागेअभावी निधी परत जाण्याची खंत; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सामाजिक संघटनेची मुख्याधिकारीकडे निवेदनाद्वारे मागणी श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: १४ ऑगस्ट २६ मुखेड शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय असूनही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मंगल कार्यासाठी हक्काचा ‘शादीखाना‘ उपलब्ध नाही. शादीखान्याच्या बांधकामासाठी यापूर्वी आलेला प्रशासकीय निधी जागे अभावी परत गेला आहे. ही अडचण दूर करण्यासाठी शहरात उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर शादीखान्यासाठी जागा आरक्षित करून त्वरित ना–हरकत दाखला द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सामाजिक…

    Read More »
  • सामाजिक

    सैनिक रत्न पुरस्काराने सन्मानित माजी सैनिकांचा राजे छत्रपती अकॅडमी येथे भव्य सत्कार

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- १४ ऑगस्ट २६ भारतीय सैन्याच्या शौर्याचा व पराक्रमाचा गौरव करणारा कारगिल विजय दिवस दरवर्षी 26…

    Read More »
  • शहर

    पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; हल्लेखोर जसपालसिंग अटकेत, सखोल चौकशीचे आदेश

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: १३ ऑगस्ट २६ शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात कृपाणाने हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, तेथील सुरक्षा यंत्रणेच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा हल्ला वेळीच निष्फळ ठरवण्यात यश आले. या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या जसपालसिंग नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी घटनास्थळावरून तात्काळ ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता? आरोपीचा काही पूर्वइतिहास आहे का? आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाजूंनी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. या अत्यंत गंभीर घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, सुखबीरसिंग बादल यांच्यावर झालेल्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बादल यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    Read More »
  • सामाजिक

    प्रशासनाला पैशाची मस्ती की नियमांची ॲलर्जी? विद्यार्थ्यांच्या मार्गावरच वाईन शॉपला ग्रीन सिग्नल!

    ▫️बाराहाळी नाक्यासारख्या संवेदनशील मार्गावर वाईन शॉपला नियमबाह्य ‘NOC’ दिलीच कशी? तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १३ ऑगस्ट २६ मुखेड शहरात आधीच बारची संख्या मोठी असताना, आता शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘बाराहाळी नाका‘ परिसरात नवीन वाईन शॉप सुरू करण्याचा घाटघातला जात आहे. विशेष म्हणजे, शाळा, रुग्णालये आणि विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल असलेल्या यामार्गावर वाईन शॉप थाटण्यासाठी मुखेड नगर परिषदेने चक्क ‘ना–हरकत प्रमाणपत्र‘ (NOC) दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतप्त नागरिकांनी या निर्णया विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा दिला आहे. बाराहाळी नाका हा मुखेड शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायम गजबजलेला मार्ग आहे. याच रस्त्यावर अनेक शाळा, रुग्णालये, खाजगी क्लासेस आणि संगणक प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यामुळे दिवसभर या भागात शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. अशा शैक्षणिक आणि वैद्यकीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात मद्याचे दुकान सुरू झाल्यास, परिसरातील शांतता भंग पावेल…

    Read More »
Back to top button