Sharmik Ekta
-
सामाजिक
पुरोगामी अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.ए.जे.शेख यांची बिनविरोध निवड
◽️उपाध्यक्षपदी ॲड.ए.पी.लष्करे तर सचिवपदी ॲड.टी.एम.वाघमारे मुखेड प्रतिनिधी:- ०४ फेब्रुवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय,मुखेड येथील पुरोगामी अभिवक्ता संघाची २०२६-२०२७ साठीची…
Read More » -
आरोग्य
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एका बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
मुखेड | प्रतिनिधी २ जानेवारी मुखेड शहरालगत असलेल्या उमरदरी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातझाला. या अपघातात एका युवक बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. या अपघातात १) अरमान युसुफ पठाण (वय १५, रा. फुले नगर, मुखेड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर प्रथमोपचार मुखेड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नांदेड येथील मुख्य जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. २) अयान साजीद शेख (वय १८, रा. वाल्मीक नगर, मुखेड) या युवकाचा मात्र अपघात स्थळीच मृत्यू झाला. अपघाता नंतर मुखेड उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश रायकोडे व आधी परिचारिका पूजा वाघमारे यांनी जखमी युवकावर तात्काळ उपचार केले. तसेच जखमीला नांदेड येथे हलवण्यासाठी लखन पवार, कक्षसेवक माऊली धनगे, अमर सूर्यवंशी, ऋषिकेश गुट्टे व हनुमंत नागरगोजे यांनी मोलाची मदत केली. या घटनेमुळे मुखेड शहरात हळहळ व्यक्त होत असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडूनपुढील तपास सुरू आहे.…
Read More » -
राजकीय
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्तझाली. ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी राजभवनातील लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीत्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती. तसेच सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र खातेवाटप पुढीलकाळात होणार असून सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलंहोतं. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणालेहोते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलंगेलं. मात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. एकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं.
Read More » -
आरोग्य
आए.डि.ए. नांदेड शाखेच्या वतीने मेगा रक्तदान शिबिर: २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले
नांदेड | प्रतिनिधी ३० जानेवारी इंडियन डेंटल असोसिएशन,नांदेड शाखेच्या वतीने दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी श्री.गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँक, नांदेड येथे रक्तदान शिबिराचे…
Read More » -
क्राईम
मुखेड शहरात व्यसनाच्या विळख्यात अडकले कमी वयातील मुलं.
▫️शहरालगत असलेले ले आऊट बनले अय्याशीचे अड्डे ▫️१३ वर्षांखालील मुलांमध्ये गांजा व तंबाखूचे वाढते व्यसन मुखेड प्रतिनिधी:- २९ जानेवारी २६ मुखेड शहरात अल्पवयीन मुलं व्यसनाच्या अधीन असल्याचे एक चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. शहरातील विविध शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये ड्रग्स, गांजा आणि अन्यव्यसनांचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. सरासरी किराणा दुकानावर गुटखा, मावा, तंबाखूयासारखे व्यसनाचे पदार्थ सहज उपलब्ध असल्याने अल्पवयीन मुलं व्यसनाचे अधीन होत आहेत. शहरात गुटखा, गांजा सारखे अमली पदार्थ चौका चौकात सहज मिळत असल्याने तरुणाई व अल्पवयीन मुलं मुली व्यसनाचे अधीन होत आहे. लपून छपून नशा करणाऱ्यांसाठी शहरालगत असलेले ले आऊट अय्याशीचे अड्डे बनले आहे. अंधार पडताच शहरातील कौठा रोड,जुनी…
Read More » -
महाराष्ट्र
अजित पवारांच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करा, ममता बॅनर्जी यांची मागणी
नवी दिल्ली:- २९ जानेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बारामती या ठिकाणी विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या विमान अपघाताची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममताबॅनर्जी म्हणाल्या कि इथे कोणीही सुरक्षित नाही. अजित पवार पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होणार होते, हे मी स्वतः पाहिलं होतं. अशा परिस्थितीत हा अपघात कसा झाला?, हा गंभीर प्रश्न असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली योग्य तपास व्हावी, अशी मागणीही त्यांनीकेली. या अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले कि आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे याविमान अपघाताची चौकशी नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होताकामा नये यासाठी हे गरजेचं आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पष्ट केलं आहेकी त्यांनी अद्याप कोणालाही समन्स बजावलेले नाहीत. या प्रकरणाचा अधिकृत तपास आताएअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे (एएआयबी) सोपवण्यात आला असून, पुढील सर्वचौकशी आणि निर्णय एएआयबी घेणार आहे. विमान लँडिंगला अवघे काही मिनिट शिल्लक असताना हा अपघात झाल्यामुळं या अपघाताविषयी एकसंभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक खळबजनक दावा करणारी पोस्ट एक्सवर केली आहे. त्यांनी या अपघाता बाबत विमान कंपनी व्हीएसआरकडे बोट दाखवलं आहे. सुहेल सेठ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,…
Read More » -
सामाजिक
मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू…
Read More » -
संपादकीय
बोगस दिव्यांग सावधान ; आता एसटी प्रवासातही होणार दिव्यांग तपासणी
◽️बनावट कार्ड आढळल्यास थेट गुन्हा दाखल होणार नांदेड:- प्रतिनिधी:- २८ जानेवारी २६ राज्यात दिव्यांग तपासणीच्या सूचना दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिल्यानंतर यातपासणी मोहिमेला गती आली आहे. आता राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही प्रवासात दिव्यांगांचे यूडीआयडी कार्ड तपासण्याच्या सूचना दिल्या असून, संशयास्पद कार्ड जप्त केली जाणार आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दिव्यांग प्रवाशांना एसटी बसमध्ये सवलत दिली जाते. मात्र, राज्यात अनेक बनावट दिव्यांग आढळत आहेत. काही कर्मचार्यांनी तर नोकरीत व बदल्यांमध्येही या दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे. दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी बनावट दिव्यांग शोधमोहीम सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून दिव्यांगांची तपासणी सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळालाही सूचना दिल्या आहेत.…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये सुनेनेच केला सासूचा खून; अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने काढला काटा
नांदेड प्रतिनिधी:- २८ जानेवारी २६ नांदेड: जिल्ह्यातील हदगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या सासूचा सुनेनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने गळाआवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत महिलेची सून, तिचा प्रियकर आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. कमलाबाई क्षीरसागर (वय ५४) असे मयत महिलेचे नाव आहे. नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कमलाबाई क्षीरसागर या हदगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होते. त्यानंतर त्या आपली विधवा सून सुनीता(वय ३५) आणि नातवासोबत राहत होत्या. मात्र, सून सुनीताचे तिच्यापेक्षा वयाने ८ वर्षे लहान असलेल्या परमेश्वर वानखेडे (वय २६) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पतीच्या निधनानंतर हे संबंध अधिकच वाढलेहोते. असा रचला हत्येचा कट कमलाबाई यांना सुनेच्या या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली होती आणित्यास त्यांचा सक्त विरोध होता. यावरून सासू–सुनेमध्ये वारंवार खटके उडत होते. आपल्या प्रेमात सासू अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुनीताने प्रियकर परमेश्वर सोबत मिळून सासूचा काटा काढण्याचे ठरवले. १० जानेवारीच्या रात्री कमलाबाई गाढ झोपेत असताना, सुनीता आणि परमेश्वरने स्कार्फने गळाआवळून त्यांची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीताने आपला भाऊ अमोल इटकरेआणि नातेवाईक अक्षय कदम यांची मदत घेतली. त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरून दुचाकीवरून नेलाआणि वाळकी फाटा येथील पैनगंगा नदीपात्रात फेकून दिला. सुरुवातीला सासू बेपत्ता असल्याची तक्रारनातवाने दिली होती, परंतु नदीपात्रात मृतदेह सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी लावला छडा हदगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने फिरवला. यात मयत महिलेची सून आणि तिच्या प्रियकराच्या हालचालीसंशयास्पद आढळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच सुनेने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read More » -
सामाजिक
मुखेड तहसील कार्यालयात पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न
▫️उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांनी दिल्या शुभेच्छा. मुखेड प्रतिनिधी:- दर्पण दिन व मकर संक्रांतीचे औचित्य साधून देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांच्या संकल्पनेनुसार मुखेड तहसील कार्यालयात दि. १६ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना शाल, पुष्पहार, डायरी, लेखणी व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ६ जानेवारी या दर्पण दिनाचे औचित्य साधून संबंध देशामध्ये फाकार दिन साजरा केला जातो त्याअनुषंगाने दि.१६ जानेवारी रोजी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनी मुखेड शहर व परिसरातील फाकारांचा यथोचित सन्मानकरून गौरव केला. यावेळी तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार एस. एस. मामीलवाड, निवासीनायब तहसीलदार शालिनी धुळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, नांदेड जिल्हा मराठीपत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप कामशेट्टे, जिल्हा संघटक सुनिल पौळकर, मुखेड तालुका मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष महेताब शेख, संपादक ज्ञानेश्वर डोईजड, असद बल्खी, बबल्ल मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार राजेश जाधव यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकारसंघाचे अध्यक्ष महेताब शेख यांनी केले. प्रशासनाच्या वतीने उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार शालिनी धुळे यांनी मानले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड व सचिव राजेश बंडे यांनी दर्पण दिनानिमित्त आपल्या मनोगतातुन पत्रकारितेचे महत्व व व्यथा व्यक्त केल्या. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटकएस. एस. हुड्डें, तालुकाध्यक्ष परमेश्वर वारे, सचिव यु.पी. सुभेदार, तलाठी संघटनेचे सचिव सतिश देशमुख, सहाय्यक महसुल अधिकारी मोईन शेख रुपेश मुधोळकर, महसूल सहाय्यक प्रशांत लिखेंकर, के. व्ही. महाडीवाले, संगिता वाडीकर, कमलावती कल्लेपवार, अनुराधा चिनसबवार, गंगागीर गिरी, दफेदारजि.एम. पिंगळे, गोविंद भास्करे, गौस शेख, राजेश जाधव, माधव गायकवाड, शरद नरबागे, संदीप गायकवाड, श्रीकांत श्रीरामे, रविना लुगारे, धम्मशिल्ला हणमंते यांच्यासह सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व तहसिल कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.
Read More »