Sharmik Ekta

  • राजकीय

    ठाकरे सेनेच्या मुखेड विधानसभा प्रमुखपदी मन्मथअप्पा खंकरे यांची निवड

    ∆ खंकरे यांची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्यात ओळख मुखेड -(ता. प्रतिनिधी) २६ जून मुखेड तालुक्यात अनेक वर्षापासून शिवसेना पक्षाचे निष्ठावंतपणे…

    Read More »
  • राजकीय

    मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायत साठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

    मुखेड प्रतिनिधी :- २६ जून २५ मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम २ (अ) २ अन्वये शासन ग्रामीण विकासविभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी नांदेड यांच्या पत्रानुसार मुखेड तालुक्यातील१२१ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीतील पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदांचेआरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आरक्षण प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पारपाडण्यासाठी दि. १ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, मुखेड येथे आरक्षण सोडतकाढण्यात येणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, निवडणूक अधिकारी, व संबंधितविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुखेड तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी ४, इतरमागासवर्गीयांसाठी ३५ व खुल्या प्रवर्गासाठी ६७ सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत. त्यापैकीमहिलांसाठी अनुक्रमे ७, २, १८ व २९ जागा आरक्षित आहेत. आरक्षण प्रक्रियेबाबत ग्रामस्थांनी मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे

    Read More »
  • क्राईम

    नांदेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास थेट गुन्हा दाखल; पोलिसांचा इशारा

    नांदेड | २५ जून २५सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी…

    Read More »
  • राजकीय

    नांदेड मधील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत बैठक १ जुलै रोजी

    नांदेड दि. २४ जून २५ नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष २०२५ ते २०३० साठी आरक्षण सोडत १ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा. तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेडयांच्या बैठक कक्षात दुसरा मजला) येथे काढण्यात येणार आहे. सरपंच पदाचे आरक्षणात नांदेडतालुक्यात एकुण राखीव ७३ पदांपैकी ३७ महिलांसाठी राखीव पदे आहेत. सर्व संबंधीतानी तसेच माजीजिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या सोडतीसउपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे  नांदेड जिल्हाधिकारी यांची अधिसूचना २३ जून २०२५ नुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियायांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम१९६४ च्या नियम २अ चे पोटनियम ३ व ४ अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढील तपशिला नुसार अधिसूचीत करुन दिले आहे. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी एकुण राखीव पद १८ त्यापैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव ९, अनुसूचित जमाती १ पैकी महिलासाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्गएकुण राखीव पद २० पैकी महिलांसाठी १०, खुला प्रवर्ग एकुण राखीव पद ३४ पैकी ५० टक्के महिलांसाठी १७ राखीव ठेवण्यात आली आहेत. आरक्षण हे सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अमलात राहील. सदरप्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सोडत पद्धतीने तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला) येथे मंगळवार १ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वा. करण्यात येईल. सर्वसंबंधीतानी असेही आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

    Read More »
  • सामाजिक

    विकलांग विधवा सेवा समिती च्या मराठवाडा उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे सलगरकर यांची निवड.

    मुखेड प्रतिनिधी :- २४ जून २५ राष्ट्रीय विकलांग विधवा सेवा संघटना ही विकलांग व विधवा महिला भगिनी दिव्यांग बांधव यांच्या…

    Read More »
  • Uncategorized

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्या – डिजिटल मिडिया संपादक पत्रकारसंघटनांची मागणी

    नांदेड प्रतिनिधी:- २३ जून २५ नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आणि दुर्दैवी बाब आहे. ही बैठक केवळ शासकीय आणि राजकीय वर्तुळापुरती मर्यादित न राहता सामान्य जनतेसाठी खुलीअसावी यासाठी पत्रकारांची उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. माध्यमांचा सहभाग म्हणजे केवळ वृत्तसंकलन नव्हे तर निर्णयप्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विकास आराखड्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. अशा निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. मात्र पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळे प्रशासनावरील विश्वासाला तडा गेला आहेआणि प्रशासन काही लपवू इच्छित आहे का असा प्रश्न निर्माण होतो असे निवेदनात म्हटले आहे. ही घटना फक्त पत्रकारांचा अपमान नसून जनतेचाही अपमान आहे असेही संघटनेचे म्हणणे आहे. यापुढील सर्व जिल्हा नियोजन समितीच्या बैठका खुल्या ठेवाव्यात, अधिकृत पत्रकार प्रतिनिधींना प्रवेशद्यावा आणि पारदर्शकतेसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासन जर विकास प्रक्रियेत प्रामाणिक असेल तर माध्यमांची उपस्थिती टाळण्याचे कारण नाही असेसांगत, माध्यमे टीका करत असली तरी प्रशासनाचे सकारात्मक काम देखील लोकांपर्यंत पोहोचवतात, हेलक्षात घेऊन प्रशासनाने याप्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशा मागणीचे निवेदन डिजिटल मिडीयासंपादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण खंदारे, जावेद शेख, महेंद्र देमगुंडे, प्रविण देशमुख, कवरचंद मंडेल, शिवाजी हंबर्डे, गंगाधर गच्चे, मोहमर रफिक, शेख मौला, नितीन नरवाडे, सदाशिव गच्चे, भेय्यासाहेब गेडबोले आदीनी दिले आहे.

    Read More »
  • शैक्षणिक

    मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.

    मुखेड / प्रतिनिधी २१ जून २५ महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत मुखेड येथील शशांक शिरूरकर याने ९९ टक्के गुण मिळवुन…

    Read More »
  • Uncategorized

    जिल्हा परिषद वांगी शाळेचा विद्यार्थी बनला हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर..

    नांदेड प्रतिनिधी:- १९ जून २५ नांदेड पासून अवघ्या बारा किलोमीटर वरती गोदावरीच्या काठावर वसलेले अवघ्या 1500 लोकवस्ती वांगी गावातील शेतकरी…

    Read More »
  • आरोग्य

    रोबोटिक प्रक्रियेने ब्रेन ट्यूमरवर उपचार! यशोदा हॉस्पिटल सिंकदराबादच्या डॉक्टरांचे यश

     अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्ण बरा होण्याचाकालावधी कमी ः न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण नांदेड  प्रतिनिधी :- १९ जून २५ ३० वर्षीय तरुणावर रोबोटिक असिस्टेड ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करीत यशोदा हॉस्पिटलसिंकदराबाद येथील डॉक्टरांनी मेंदूविकार शस्त्रक्रियेत रोबोटिक तंत्रज्ञान वापरत ४ सेमी च्या ब्रेन टयुमरनेग्रस्त तरुणाला शस्त्रक्रियेमध्ये अचूकता साधत, कमीत कमी छेद देण्यावर भर दिला यामुळे रक्तस्त्रावकमी होऊन रुग्ण बरा होण्याचा कालावधीही कमी झाला अशी माहीती सिंकदराबाद चे न्युरोसर्जनडॉ.के.एस.किरण यांनी पत्रकार परिषेदेत दिली नांदेड जिल्हयातील पाळज ता. भोकर येथील श्रीकांत आलेवाड या तरुणांस गाडीवरून पडल्यानेडोक्याला मार लागल्यामुळे नांदेड येथील डॉक्टरांच्या सल्यानुसार यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथेदाखल करण्यात आले होते. त्यांच्या तपासणीत ४ सेमी आकाराच्या ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. त्यातीलगुंतागुंत आणि ट्यूमरचे ठिकाण लक्षात घेता न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीयपथकाने रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. या अत्याधुनिक तंत्राद्वारे ट्यूमरला अचूकतेनेलक्ष्य करणे शक्य झाले. याचबरोबर आजूबाजूच्या पेशींना होणारे नुकसान कमी झाले. या प्रक्रियेसाठी९० मिनिटांचा वेळ लागला. ही प्रक्रिया पारंपरिक ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियांपेक्षा खूपच कमी वेळात पार पडली. पारंपरिक प्रक्रियेमध्येअनेकदा मोठे छेद समाविष्ट असल्याने रुग्णाचे रूग्णालयातील वास्तव्य जास्त असते. परंतु रोबोटिकअसिस्टेड तंत्रामुळे कमीत कमी छेद आणि अधिक कार्यक्षम शस्त्रक्रिया प्रक्रिया करणे शक्य झाले आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर बारकाईने देखरेख ठेवण्यात आली. रुग्णाला २ आठवड्यानंतर रुग्णालयातूनघरी सोडण्यात आले. रोबोटिक असिस्टेड प्रक्रियेमुळे रुग्णाची प्रकृती जलदरित्या सुधारत आहे. न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण म्हणाले की, रोबोटिक प्रणालीने शस्त्रक्रियेतीलअचूकता लक्षणीयरित्या वाढवता येते. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सक मेंदूच्या नाजूक संरचनेतूनअचूकतेने मार्ग काढू शकतात व यामुळे प्रक्रियेची एकंदर कार्यक्षमता सुधारते. अधिक अचूकतेमुळेगुंतागुंतीचा धोका कमी होतो व रुग्णांना असुरक्षित व चांगले परिणाम मिळतात. याशिवाय रोबोटिकप्रणालीमुळे कमीत कमी छेद, कमी वेदना, रुग्णालयात कमी वास्तव्य शक्य होते. यामुळे रुग्ण लवकरबरा होऊ शकतो.

    Read More »
  • क्राईम

    मुखेड शहरातील घटना दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने पळविली ७ लाख ७० हजारांची रक्कम

    मुखेड प्रतिनिधी:- १९ जून २५ मुखेड शहरातील नांदेड मर्चेंट बँकेच्या बाहेर चोरट्याने भरदिवसा दुचाकीची डिक्की काढूनत्यातील ७ लाख ७० हजार रुपयांची रक्कम पळविली घटना दि. १८ जून रोजी सकाळी ११: ३० वाजताघडली. फिर्यादी देवीप्रसाद संभाजी वडजे वय २९ वर्ष रा. अशोक नगर व्यवसाय गोविंद स्टोन क्रेशर वर्ताळा तांडा. ता. मुखेड येथील व्यवस्थापक यांनी सकाळी ११ वाजता मुखेड शहरातील एसबीआय बँकेत जाऊन ७लाख ७० हजार रुपये उचलले. त्यात १०० व २०० च्या नोटा असल्याने बदलून घेण्यासाठी दुचाकी वाहनक्रमांक एमएच २६ ए एक्स ६७९६ या गाडीवर शहरातील असलेल्या नांदेड मर्चेंट बँकेसमोर गाडी लावून५०० रुपयांच्या नोटा बदलून मिळेल का ? म्हणून विचारण्यासाठी बँकेत गेले होते. बँकेतुन परतआल्यावर डिक्कीतील रक्कम नसल्याचे समजले. यावेळी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ७ लाख ७० हजार रुपयांची पिशवीदोन युवक मोटार सायकलवर येऊन डिक्कीतून पिशवी काढून पळ काढताना दिसत आहेत. या प्रकरणीफिर्यादी देवीप्रसाद वडजे यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) अन्वये दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसउपनिरीक्षक मंचक फड हे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता देगलूरचे पोलीस उपविभागीय अधिकारीसंकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली व नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे टीम यांनी सुद्धाघटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे

    Read More »
Back to top button