Sharmik Ekta
-
शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. १६ जून २५ राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईइ , नीट, एमएचसीईटी, एनडीए तसेच अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक…
Read More » -
शैक्षणिक
मी जिल्हा परिषदेच्या शाळेतलाच विद्यार्थी-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड प्रतिनिधी:- १६ जून २५आज संपूर्ण जिल्ह्यात सुट्टी संपून शाळा चालू झाली. यावर्षी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने इयत्ता…
Read More » -
सामाजिक
काँग्रेसच्या मागणीला यश, आंदोलनाचा इशारा देताच मुखेड आगारात पाच बसेस दाखल
मुखेड प्रतिनिधी :- १५ जून २५मुखेड आगार हे नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्नाचे असूनही नवीन बसेस नव्हते म्हणून काँग्रेस पक्षाने…
Read More » -
सामाजिक
हिमायतनगर येथील 33 केव्ही उपकेंद्र महावितरण चे एकमेव कर्तव्यदक्ष कमर्चारी ( लाईणमैन ) ढगे देतात 24 तास सेवा
हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी हिमायातनगर महावितरण च्या निष्काळजी पणा बद्दल नेहमीच चर्चा हिमायतनगर च्या नागरिकांकडून ऐकव्यास मिळते उन्हाळा आला की…
Read More » -
राजकीय
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयातशिरण्याचा इशारा
▫️फडणवीसांनी एक दिवसाचा उपवास करावा – नयना कडू ▫️बावनकुळेंचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन धुडकावले अमरावती:- शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबरप र्यंतची मुदत नाही तर २ ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडूयांनी आता परवापासून म्हणजे १६ तारखेपासून जलत्याग करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने कर्जमाफीच्या मुद्यावर वेळीच निर्णय घेण्याची गरज होती. आता या प्रकरणी सरकार एक समिती नेमणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती आहे. पण सरकारने आज निर्णय घेतला नाही तर मी १६ जूनपासून जलत्याग उपोषण करेल, असे ते म्हणालेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत ७ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविद मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत आहेत. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटानेपुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. ते शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, खरे तर लवकरनिर्णय व्हायला हवा होता. सरकारने आता यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतलाआहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. पण या समितीची अहवाल केव्हा येणार? कोणत्या तारखेला कर्जमाफीची घोषणा करणार? हे काहीहीस्पष्ट नाही. या मुद्यावर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत एखादा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम राखावा. कोणतेही अनुचित कृत्य करू नये. पण माझी मानसिकता आहे की, १६ तारखेपासून पाणीही सोडून द्यावे, असे बच्चू कडू म्हणालेत.
Read More » -
राजकीय
नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत राहणार ६५ गट
मुखेड तालुक्यात सर्वाधिक सात गट तर किनवट, हदगाव, लोहा आणि कंधार तालुक्यात प्रत्येकी सहा गटांचा समावेश, २०११ च्या जनगणनेनुसार होणार निवडणूक नांदेड प्रतिनिधी:- १३ जून २५ राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्यासार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात ६५ गटांमध्ये निवडणूक होणार असून या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे असे एकूण १३० गण निवडले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७ गट मुखेड तालुक्यात राहतील तर किनवट, हदगाव, लोहा आणि कंधार यातालुक्यात प्रत्येकी ६ गटांचा समावेश करण्यात आला आहे. या गटांची रचना आता करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आता स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या या प्रभाग रचना, वॉर्डरचना, गट आणि गण रचनेकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार हीनिवडणूक होणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या ही २४ लाख १६ हजार १८४ इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचीलोकसंख्या ही ४ लाख ७७ हजार २३ आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या २ लाख ४० हजार २७४इतकी आहे. या लोकसंख्येवर आधारित गट आणि गण रचना तयार करून त्याबाबतचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे. जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभागामध्ये आणि पंचायत समीक्षक समिती क्षेत्राचे निर्वाचन गणांमध्ये विभाजन करणे, त्यांच्या सीमा निश्चित करून त्यांचे प्रारूप तयार करणे याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला तहसीलदार अशा अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी राहणारआहे. निर्वाचक गणरचनेचे प्रारूप जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणरचनेच्या प्रारूपावरील हरकती आणि सूचना जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार दर्जापेक्षा कमी नाही असेअधिकारी स्वीकारतील. जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचनया संबंधी प्रारूप प्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनावर सुनावणी घेऊन राज्य निवडणूकआयोगाने किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषद क्षेत्राचेनिवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचक गण अंतिम करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे राहणार आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचकगणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. हे सर्व आदेश राज्याचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांनी दिले आहेत.
Read More » -
अधिक
एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले.
विमानात २४२ प्रवासी होते. त्यापैकी ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. भावी डॉक्टरांच्या भरल्या ताटावर आला मृत्यू एअर इंडियाकडून आपत्कालीन नंबर जारी गुरूवारची दुपार संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखद ठरली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुपारी 1.30 च्यासुमारास लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथून एअरइंडियाच्या विमानाने टेकऑफ केलं खर पण अवघ्या १० मिनिटांतच हे विमान शहरातील नागरीवस्तीतील एक इमारतीला धडकून खाली कोसळलं आणि आगीचे लोळ उठले, प्रचंड मोठा स्फोट झाला आणि एकच कल्लोळ माजला यावेळी विमानात सुमारे २४२ प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आता या अपघातानंतर एअर इंडियाकडून एक आपत्कालीन संपर्क क्रमांक अर्थात हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. एअर इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइनक्रमांक १८०० ५६९१ ४४४ हा सुरू करण्यात आला आहे. या अपघातातत होरपळलेल्या लोकांना, जखमी प्रवाशांना जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे असे एअर इंडियाने सोशल मीडियासाइट एक्स वरील पोस्टमधये नमूद केलं आहे. अहमदाबादहून गुरूवारी दुपारी १ लाजून ३८ मिनिटांन निघालेल्या बोइंग ७८७-८ या फ्लाईटमध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिकआणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत असल्याचे एअरलाइननेम्हटले आहे. एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (https://x.com/airindia) आणिhttp://airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती प्रसिद्ध करणार आहे.
Read More » -
शैक्षणिक
सीबीएससी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करेल : हमीद दौलताबादी
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील पहिल्या वर्गास अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी नुकतेच तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण टप्पा – १ पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कुल मुलींचे मुखेड येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणा नुसार क्रमाने अभ्यासक्रम बदलत आहे. सुधारित अभ्यासक्रम सीबीएससी दर्जाचा असून विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करणारा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वशाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशिक्षण प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव येवतीकर, सहकारी पतपेढीचे संचालक दिलीपराव देवकांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शिवाजी कराळे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी यू.पी. चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी नागनाथ द्याडे, केंद्रप्रमुख श्रीपत वाडीकर, मधुकर गायकवाड यांच्याप्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण यशस्वितेसाठी वरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षणात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पहिल्या वर्गास अध्यापन करणारे २०० पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते. दि. ११ जुन रोजी या प्रशिक्षणाचा समारोप प्रशिक्षण प्रमुख शिवाजीराव येवतीकर, विस्तार अधिकारी वैजनाथ काळे, डॉ. शिवाजी कराळे, यू.पी. चव्हाण, जि.प. हा. मुलींचे मुखेड येथील मुख्याध्यापक दिलीप कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, केंद्रप्रमुख श्रीपतवाडीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून वैजनाथ काळे, बालाजीगरुडकर, शंकरराव कु–हाडे, डॉ. केरबा कांबळे, शरद डावकरे यांनी कार्य केले.
Read More » -
Uncategorized
सेवानिवृत्त मु. अ. विठ्ठलराव वाघजी भायेगावे अंबुलगेकर गुरुजी यांचे निधन!
मुखेड प्रतिनिधी : ११ जून २५ अंबुलगा बुद्रुक येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव वाघजी भायेगावे…
Read More » -
जन्म-मृत्यू नोंदीच्या प्रमाणपत्रासाठी तहसीलदारांना आदेश द्यावा:- बालाजी आईलवाड
मुखेड : प्रतिनिधी जन्म मृत्यू नोंदीचे प्रमाणपत्र देण्यासाठी तालुका दंडाधिकारी तहसीलदार यांना आदेश पारीत करावे अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे शिवसेनेचे मुखेड उपतालुका प्रमुख अॅड बालाजी आईलवाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून ई–मेलद्वारे केली आहे. जन्म व मृत्युचे प्रमाणपत्र यापूर्वी तहसिल कार्यालयातून तालुका दंडाधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांना दिल्या जात होते. पण मध्यतंरीच्या काळात शासनाच्या वतीने जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्थगिती देण्यात आली होती. या निर्णयामुळे नागरिकांची मोठी गोची झाली कारण आधार काढण्यासाठी, आधारमधील नाव दुरूस्ती, जन्मतारीख दुरूस्ती व इतर महत्वाच्या कामासाठी जन्मप्रमाणपत्र हे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे जन्म–मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिक संबंधित कार्यालयाभोवती चकरा मारत आहेत. याबबातीत शासनाने पुन्हा जीआर काढले आहे पण त्या जीआर(आदेशाची) अद्याप अमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही. जुन महिण्याच्या सुरुवातीला शैक्षणिक संस्थाना (शाळेत) प्रवेश घेण्यासाठी जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे. त्या करीता विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन आपण संबंधीत कार्यकारी तालुका दंडाधिकारी यांना तात्काळजन्म– मृत्यू नोंद प्रमाणपत्र देण्यासाठी आदेशीत करावे. कारण शासनाने यासंदर्भात जीआर काढले तोजिआर अद्याप अंमलात आले नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तहसीलदार यांना आदेशितकरण्याची मागणी शिवसेनेच तालुका उपप्रमुख बालाजी आईलवाड यांनी केली आहे. जर असेच यापुढेचालत राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कधी न भरुन येणारे होईल याची जाणीव ठेवून निर्णय घ्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर विद्यार्थ्यांना घेवून मोर्चा काढण्यात येईल असा इशा– राही आईलवाड यांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
Read More »