Sharmik Ekta

  • सामाजिक

    नाशिक नर्सिंग अत्याचार प्रकरण: दोषी प्राचार्याचं रजिस्ट्रेशन व कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करण्याची शासनाकडे मागणी

    नांदेड प्रतिनिधी :- १ जून २५ नाशिकमधील गणपतराव आकडे खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये काही विद्यार्थिनींनी प्राचार्या विरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केल्यानंतर शिक्षण क्षेत्र हादरून गेलं आहे. संबंधित प्राचार्यावर पोक्सो, एट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात असे प्रकार होणं म्हणजे विद्यार्थिनींच्या भविष्यातला अंधार आहे. हा प्रकार फक्त नाशिकपुरता मर्यादित नाही, संपूर्ण राज्यातील नर्सिंग शिक्षण संस्थांमध्ये याची चौकशी झाली पाहिजे. आदी बनसोडे यांनी इंस्टाग्राम , ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावरही आवाज उठवला असून, त्यांचा आवाज राज्यभरात विद्यार्थिनी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. या गंभीर प्रकारावर आरोग्य समितीचे आदी बनसोडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी शिक्षणआ णि आरोग्य विभागाकडे दोन ठोस मागण्या केल्या आहेत प्रमुख मागण्या खालील…

    Read More »
  • शैक्षणिक

    महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरळीत

    मुखेड प्रतिनिधी:- ०१ जून २५येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या उन्हाळी…

    Read More »
  • अधिक

    दु:खद वार्ता; पत्रकार मिलिंद कांबळे यांचा मुलगा इंजि.पवन कांबळे यांचा ह्दयविकाराच्या  झटक्याने दु:खद निधन

    मुखेड प्रतिनिधी:- ३१ मे २५ पत्रकार अॅड.मिलिंद कांबळे येवतीकर यांचा मुलगा इंजि.पवन मिलिंद कांबळे येवतीकर (वय २७) यांचे शुक्रवारी दि.३० मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ह्दयविकाराच्या  झटक्याने पुणे येथे दु:खद निधन झाले आहे  त्यांच्या पश्चात आई ,वडील ,एक बहीण ,असा परिवार आहे. मिलिंद कांबळे आपल्या कठीण परिश्रमातून मुलाला अभियांत्रिकी शिक्षण दिले होते अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर पुणे…

    Read More »
  • शैक्षणिक

    मुखेड तालुक्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदावर हमीद दौलताबादी रुजू

    मुखेड -(ता. प्रतिनिधी) ३० मे २५ मुखेड तालुक्यात तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी होनधरणे कैलास कार्यरत होते. त्यांची बदली किनवट तालुक्यात झाल्याने…

    Read More »
  • क्राईम

    दुर्दैवी घटना : खदानीत बुडून दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात सर्वत्र हळहळ

    ◽️लग्नासाठी मामाकडे आलेल्या संघर्षसोबत निखिलचाही अंत नांदेड प्रतिनिधी:- ३० मे २५ नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गावात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. खदानीतबुडून दोन शाळकरी अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे यांचा समावेश आहे. संघर्ष परघने हा आपल्या मामाच्या गावी, गारगव्हाण येथे, एका लग्नासाठी आलेला होता. रविवारी सकाळी संघर्ष आणि त्याचा मित्र निखिल दोघेही शेताकडे चालत जात होते. पावसामुळे रस्त्यात चिखल साचलेला होता. चालताना अचानक संघर्षचा पाय घसरून तो शेजारच्या खोल खदानीत पडला. संघर्षला वाचवण्यासाठी निखिल धावून गेला, पण तोही त्याच खदानीत बुडाला. स्थानिकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोवर उशीर झाला होता. ही दुर्दैवी घटना गावासाठीअत्यंत धक्कादायक असून, दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक खदानींची तात्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    Read More »
  • क्राईम

    मुखेड-केरुर मार्गावर दुचाकी समोरासमोर धडकल्या, १ ठार ३ जखमी

    मुखेड प्रतिनिधी:- ता.२९ मुखेड ते केरुर रस्त्यावरील तांदळी फाट्याजवळील उतारावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अॅड. राहुल चंद्रकांत सोनकांबळे वय ४१ वर्ष हे जागीच ठार झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमींना नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे . दुचाकी क्रमांक एम. एच. २६ सी. एस. ६६५१ मुखेड येथून केरुरकडे जात असताना समोरुन आलेल्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात राहुल सोनकांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक राहुल सोनकांबळे हे घरचे ते एकच…

    Read More »
  • सामाजिक

    एसएफआयचे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन मुखेड येथे संपन्न

    जिल्हा अध्यक्ष विजय लोहबंदे तर जिल्हा सचिव म्हणून मीना आरसे यांची निवड मुखेड (ता. २९) प्रतिनिधी :  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन दि.२८ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात संपन्न झाले. या वेळी शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली.  अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते आणि डीवायएफआयचे अंकुश माचेवाड यांनी केले. अधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले तर शेतमजूर युनियनचे नेतेकॉ. विनोद गोविंदवार यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशन उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानीविजय लोहबंदे होते तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल कऊडकर यांनी केले. अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक आणि शैक्षणिकपरिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. त्याआधी शोक ठराव घेऊन आदरांजलीवाहण्यात आली. अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्दकरा, सर्व विद्यार्थ्यांना बस प्रवास निशुल्क करा, शासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबवा, जिल्हापरिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र करा, विद्यार्थिनी व महिला अत्याचार विरोधी लढा तीव्र करा, यासहित विविध ठराव एकमताने या अधिवेशनात पारित करण्यात आले. या अधिवेशनाने एसएफआयची १८ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटीची निवड केली. यामध्येएसएफआयचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय लोहबंदे आणि जिल्हा सचिव म्हणून मीनाआरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर व स्वप्नील बुक्तरेतसेच जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार व विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. जिल्हाकमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरे, साहेबराव सोनसाळे, नितीन सोनकांबळे, अमोल गायकवाड, सोनलपाईकराव, नेहा कऊडकर, भारत पवार, शरद खंदारे, भीमराव सोनकांबळे यांची निवड करण्यात आलीआहे. ३ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. अधिवेशनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातून ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा सचिव आणि अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हम होंगे कामयाब‘ या गीताने अधिवेशनाचा समारोप झाला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातीलएसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. 

    Read More »
  • सामाजिक

    शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातुनच खत, बियाणे खरेदी करावे:- कृषी अधिकारी नारनाळीकर

    ▫️मुखेड कृषी विभागाचे शेतकरी बांधवांना आवाहन ! ▫️बोगस बियाणे व खते विक्रीचा बाब निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधा मुखेड -(ता. प्रतिनिधी) चालू वर्षातील खरीप…

    Read More »
  • सामाजिक

    सतत सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्यांचे मोठे नुकसान :-

    मुक्रमाबाद/प्रतिनिधी मागील चार दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्ता उत्पादनावर संक्रांत ओढावली असूनया मुळे तेंदु पत्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. मुखेड तालुका हा डोंगराळ तालुका असून या तालुक्यात डोंगराळ भाग व जंगल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तालुक्यात तेंदु पत्ता उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेंदूपत्ता जमा करणारे मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. या तेंदु पत्ता उत्पादनामुळे अनेक कुटुंबातील लोकांना भर उन्हाळ्यात काम मिळत असते व त्यांना चांगले उत्पादनही होत असते त्यामुळे प्रत्येक तेंदू पत्ता जमा करणाऱ्या मजुरांच्या घरात चांगली कमाई होते. भल्या सकाळी डोंगरात जाऊन तेंदू पत्ता जमा करून घेऊन यायचे व दिवसभर घरी बसून जुळवून, त्याचेपुडे बांधून मग सायंकाळी तेच तेंदू पत्ता संकलन केंद्रावर नेऊन देऊन घ्यायचे यामुळे शेकडो मजुराच्या हाताला भर उन्हाळ्यातही चांगलं काम मिळत असते. मुखेड तालुक्यातील हाळणी येथे मोठ्या प्रमाणात तेंदु पत्ता संकलन केले जाते या गावात दीडशे पेक्षाजास्त मजूर तेंदु पत्ता संकलन करतात पण मागील चार दिवसा पासून सुरू असलेल्या पावसामुळे तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावरही संक्रांत ओढावली असून त्यांनाही काम नसल्याने ते मजूर घरीच बसून आहेत. एकीकडे तेंदू पत्ता संकलन केंद्रावर जमा झालेल्या तेंदू पत्त्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तेंदु पत्त्याचे लाखो रुपयाचे नुकसान होत असून पाऊस पडत असल्याने मजुरांच्या हातालाही काम मिळत नाही त्यामुळे मजूरही हताश झाले आहेत. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे तेंदू पत्ता संकलन  करणाऱ्यांची मोठी पंचायत झाली असून या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

    Read More »
  • सामाजिक

    शासनाच्या दर्लक्षामुळे राशन दुकानदारांचे नऊ महिन्यांचे कमिशन रखडले!

    मुखेड प्रतिनिधी :-  अन्नधान्य वितरणा बाबतचे कमिशन न मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार आर्थिक अडचणीत आला आहे. शासनाने त्यांची आर्थिक कोंडी नकरता त्वरित निर्धारित कमिशन द्यावे, अशी अपेक्षा स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजनाचे लाभार्थी व शिधापित्रका धारकांना, कुटुंब संख्येच्या आधारावर अन्नधान्य पुरवठा केला जातो. त्यासाठी गाविनहाय व शहरात प्रभाग निहाय स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत शिधापित्रका धारकांना अन्नधान्य वाटप केले जाते. ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन म्हणून सरकारकडून काही रक्कम देण्यात येते. याच कमिशनवर स्वस्त धान्य दुकानदारांच्या संसाराचागाडा चालतो. गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य वितरण प्रणाली सक्षमपणे काम करतांना दुकानदारांची दमछाक होत असली तरी मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक दुकानदारांचे उदरिनर्वाहाचे साधन आहे. दुकानाचे भाडे, लाईट बिल यासर्व गोष्टीसाठी पैसे लागतात. पण…

    Read More »
Back to top button