Sharmik Ekta
-
शहर
उद्घाटनापूर्वीच मुखेडच्या शासकीय विश्रामगृह इमारतीच्या भिंतींना मोठ्या भेगा
▫️निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे; भिंतींना पडल्या मोठ्या भेगा, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०५ सप्टेंबर…
Read More » -
सामाजिक
प्रवाशांच्या सोयीसाठी मुखेड बसस्थानकात ‘सुप्रभात मित्र मंडळा’कडून सिमेंटच्या बाकांचे लोकार्पण
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:०५ सप्टेंबर २६ प्रवाशांची, विशेषतः वृद्ध, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने ‘सुप्रभात…
Read More » -
क्राईम
देगलूरमध्ये अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीवर कारवाई
▫️चार आरोपींवर गुन्हा दाखल; ₹७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त श्रमिक एकता न्यूज़ देगलूर : ०५ सप्टेंबर २६ जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत, देगलूर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ₹७,५८,६०० चामुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी देगलूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती…
Read More » -
सामाजिक
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश: राज्य सरकारकडून ५ प्रमुख मागण्या मान्य
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०३ सप्टेंबर २६ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांच्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. या चर्चेनंतर जरांगे यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना ४ सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले असून, अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याच्या सूचनामंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत. या बैठकीत सरकारने जरांगे यांच्या पाच प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, १० तारखेला प्रमाणपत्रा विषयी अधिकृत शासन निर्णय (GR) काढण्याची घोषणा केली आहे. तसेच, जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फी भरावी लागली आहे त्यांचे पैसे परत दिले जातील, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे सरकारने सांगितले. कुणबी प्रमाणपत्राचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी दर महिन्याला विशेष शिबिरे आयोजित केली…
Read More » -
सामाजिक
स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही भटका समाज मूलभूत कागदपत्रांपासून वंचित; विविध मागण्यांसाठी मुखेड तहसीलदारांना साकडे
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०३ सप्टेंबर २६ देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे उलटली असली तरी, भटक्या समाजातील नागरिकांना आजही आधारकार्ड, राशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी व जात प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत प्रशासकीय कागदपत्रांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विविध प्रमाणपत्रे मिळविताना आजही अनेकअडचणींचा सामना करावा लागत असल्याने, हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहा पासून कोसो दूर असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. या समस्येकडे लक्ष वेधत, प्रशासनाने ही कागदपत्रे सुलभतेने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता असणे अनिवार्य असते. मात्र, दप्तर दिरंगाई आणि क्लिष्ट प्रक्रियेमुळे भटक्या समाजातील नागरिक या योजनांपासून वंचित राहतआहेत. या पार्श्वभूमीवर, समाजातील नागरिकांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे विना अडथळा व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्यावीत, तसेच या उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तहसीलदारांना हे निवेदन देताना नगरसेवक विनोद दंडलवाड, भटक्या समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे, दिलीप बाबर, शिंदे बेटमोगरेकर यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने…
Read More » -
क्राईम
गांजा तस्करांवर नांदेड पोलिसांची धडक कारवाई: मुखेड तालुक्यातून सव्वा किलो गांजासह एक अटकेत
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : ०३ सप्टेंबर नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत देगलूर उपविभागीय पोलीस पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई करत मौजे उंद्री पं.दे (ता. मुखेड) येथे एका घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ११५ ग्रॅम वाळलेला गांजा (अंदाजे शासकीय किंमत₹२५,०००) आणि १२५ ग्रॅम वजनाचे गांजाचे जिवंत हिरवे रोपटे जप्त केले असून, बेकायदेशीररीत्या गांजा साठवून त्याची विक्री करणारा आरोपी सुधाकर संतुकराव वडजे (वय ३५ वर्षे, रा. उंद्री) याला बेड्या ठोकल्या आहेत. देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांना मिळालेल्या पक्क्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:१५ च्या सुमारास अत्यंत पारदर्शक पद्धतीने शासकीय पंच, राजपत्रित अधिकारी व फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत ही धाड टाकण्यात आली. घराच्या अंगणात झडती घेतली असता गांजाचे शेंडे, चुरा आणि मातीत लावलेले रोपटे आढळून आले. याप्रकरणी आरोपीवर मुखेड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २०(२)(ब) अन्वये (गुन्हा क्र. ३१०/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) आणि सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी किरण पोपळघट, मुखेडचे पोनि. चिंताबर कामठेवाड, पोउपनि. अभिजीत तुतुरवाड, देगलूरचे पोउपनि. म्हैसनवाड यांच्यासह पोलीस अंमलदार रवींद्र भुले, अमोल सुंडगे, प्रवीण कुरे, विशाल आटकोरे, माधव मरगेवाड व महिला अंमलदार रिहाना शेख यांच्यापथकाने बजावली. जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर…
Read More » -
सामाजिक
मनोज जरांगेंच्या आंदोलनात शोककळा; अंतरवाली सराटीत ४० वर्षीय आंदोलकाचा मृत्यू
◽️आंदोलनस्थळी अचानक प्रकृती खालावल्याने दुर्दैवी अंत श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क बीड:- ०३ सप्टेंबर २६ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या ४० वर्षीय दशरथ रायकर यांचाअंतरवाली सराटीत मृत्यू झाला. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावादिवस आहे. दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे, तर राज्यभरातूनहजारो समाजबांधव पाठिंबा दर्शवण्यासाठी अंतरवाली सराटी येथे येत आहेत. मराठा आरक्षणाच्याआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय मराठा आंदोलकाचा उपोषणस्थळीच दुर्दैवीमृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत आंदोलकाची ओळख दशरथ रायकर (वय ४०, रा. संगम, जिल्हा बीड) अशी आहे. प्राथमिकमाहितीनुसार, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अंतरवाली सराटी आणिसंपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दशरथ रायकर हे देखील आंदोलनात सहभागी होण्यासाठीआणि जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आले होते. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणी असताना रायकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खालीकोसळले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती आणि पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका निष्ठावान आंदोलकाचा मृत्यू, यांमुळे अंतरवाली सराटी येथे अत्यंत भावूक आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या बातमीमुळे बीड जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव आणि मराठा आंदोलक समुदायावर शोककळा पसरली आहे.
Read More » -
क्राईम
मुखेड भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरी; १५ हजारांची लाच स्वीकारताना शिपाई रंगेहाथ अटकेत
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- ०३ सप्टेंबर २६ मुखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला शिपाई विवेकानंद पांडुरंग खुडे (वय ३५) याला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ७२ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतजमिनीची मोजणी करून त्याचा अहवाल न्यायालयात पाठवण्यासाठी आरोपी शिपाई खुडे आणि निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल यांनी या लाचेची मागणी केली होती. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदाराने कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, पैसे दिल्याशिवाय अहवाल पाठवला जाणार नाही असे सांगत १५ हजार रुपयांची मागणीकरण्यात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत शिपाई खुडे आणि निमतानदार सय्यद इमरान यांनी लाच घेण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले. याच दिवशी दुपारी भूमी अभिलेख कार्यालय, मुखेड येथे सापळा रचून तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारताना शिपाई खुडे याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, मुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई नांदेड एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप व उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले, सय्यद खदीर व प्रकाश मामुलवार यांनी केली. कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भयपणे एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नोट:-…
Read More » -
शहर
नांदेडमध्ये डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- ०२ सप्टेंबर २६ आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि पोळा सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शांतता, सौहार्द व सर्व धर्म समभाव राखून उत्सव साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यंदा ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशोत्सव काळात मंडळांनी डीजेचा वापर पूर्णपणे टाळून डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी वाहत्या नदीऐवजी कृत्रिम तलावांमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नागरिक आणि गणेश मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनातर्फे एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार असून मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले. या आवाहनाला दुजोरादेत आमदार अमर राजूरकर आणि महापौर कविता मुळे यांनीही जास्तीत जास्त इको–फ्रेंडली बाप्पाबसवून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याची विनंती नागरिकांना केली. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील संदेशांची सत्यता पडताळून पाहावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊनये, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिला आहे. दुसरीकडे, महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करणे, निर्माल्य व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी संकलन व्यवस्था, पुरेसे पथदिवे आणि…
Read More » -
क्राईम
स्पा’च्या पडद्यामागे देहविक्रीचा बाजार! नांदेड पोलिसांची धडक कारवाई, सूत्रधारासह ७ महिला जाळ्यात
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :०२ सप्टेंबर २६ शहरातील अत्यंत गजबजलेल्या फुले मार्केट परिसरात ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल…
Read More »