Sharmik Ekta
-
सामाजिक
नऊ दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; मराठा समाजाला केलं ‘हे’ आवाहन
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ९ दिवस उपोषण केल्यानंतरबुधवारी उपोषण मागे घेतलं. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत, असंजरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारालाही इशारा दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले की, माझं उपोषण सुरु असताना लोकांचा त्रास मला सहन होत नाहीये, कोर्टाचा मीसन्मान करतो.. उपोषण करुनही आता काही फायदा नाही. आता उपोषण स्थगित करत आहोत. “सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर नाही देऊ द्या, आपण सत्तेत जाऊ, आपले लोक सत्तेत गेलेपाहिजेत. आपण सरकारला संधी दिली होती, पण आता त्यांनी वेळ चुकवली आहे. समाजाच्या महिला, मुलं, श्रीक्षेत्र नारायणगड हे सकारपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे.” मनोज जरांगे पुढे म्हणाले, सरकार मला बदनाम करु शकतं, पण ते मला मॅनेज करु शकत नाहीत. उपोषणसुटलं की मराठा समाजाला सांगतो, दवाखान्यात कुणी येऊ नका. मी उपचार घेऊन पुन्हा अंतरवालीमध्येयेतो, तेव्हाच आपण भेटूया. डॉक्टरचाच दवाखाना असून त्याला म्हणतेत बाहेर हो. आता माझं शरीर संपलंआहे, चार–पाच दिवस आरामाची गरज आहे. फडणवीसांचं नाव घेऊन जरांगे म्हणाले की, फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्यकरा. मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या जाळ्यात अडकू नये.. तुम्हाला संधी आहेआमचं ओबीसीमधलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तरमराठ्यांना खचून जायची गरज नाही. सरकारने आपल्या लेकरांशी धोका केला तर तम्ही तमच्या मलाशीधोका करु. नका.. या सरकारला धडा शिकवा. काय म्हणाले मनोज जरांगे? मराठ्यांनो भोळे राहू नका मी जातीयवादी आहे, अशी टीका केली जाते. मराठ्यांच्या विरोधात माधव पॅटर्न कुणी आणला होता? जातीयवाद मी आलो म्हणून झाला का? • यापूर्वी जातीयवाद नव्हता का. पन्नास–शंभर वर्षांपूर्वी जातीयवाद नव्हता का? जातीयवाद काय असतो हे आता मी दाखवतो
Read More » -
Uncategorized
मुक्रमाबाद येथील आरोग्य कर्मचा-यावर आली उपासमारीची वेळ;सात महीण्याचे मानधन रखडले
मुक्रमाबाद (प्रतिनिधी )मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मार्च २०२४ पासुनचे मानधन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर…
Read More » -
सामाजिक
विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
शेतकऱ्यांसह कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग …! नांदेड प्रतिनिधी:- शेख मोहमद रफीक किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.२३ सप्टेबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यासाठी धडक मोर्चाकाढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांना किसान जनआंदोलन, भारतच्या वतीने विविध मागण्यांचेनिवेदन देण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मोर्चाची सुरूवात कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे चौकापासून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे डॉ. बाबासाहेबआंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यातआला.दुपारी एक वाजता कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करूनमोर्चाची सुरवात करण्यात आली. यावेळी किसान जनआंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल,मुख्य समन्वयक कॉ.गंगाधरगायकवाड, बालाजी आबादार पाटील,मारोती सवंडकर, अजित पाटील, भारत सूर्यवंशी,सुनीलअनंतवार,गोविंद पाटील,सूरज कौऊटकर आदींनी अण्णा भाऊ साठेना पुष्पहार घालून अभिवादन करूनशेतकरी – कामगार एकजुटीच्या गगनभेदी घोषणा देत मोर्चाची सुरवात केली.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वजीवनमरणाच्या मागण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शेतकरी सामील झाले होते. या मोर्चासपाठिंबा देत शकडो कामगारांनी देखील आपला सहभाग नोंदविला. उपरोक्त मोर्चात खालील प्रमुख मागण्याचे निवेदन केंद्रीय कृषीमंत्री ना.शिवराजसिंग चव्हाण,राज्याचेकृषीमंत्री ना.धनंजय मुंडे, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आदींना जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देखील संपूर्ण मागण्याचे निवेदन देण्यात आले.निवेदनात पीक संरक्षण कायदा करण्यात यावा , शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्तकरावा, शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मुल्यांकनाच्या किमान ५०% पिक कर्ज देण्यात यावे.पिक कर्जपरतफेडीचा कालावधी १० वर्ष करावा तसेच किमान आधारभूत किंमतीवरील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीनेकार्यान्वित करावेत व कापूस खरेदी करीता ते १ आक्टोबर २०२४ पुर्वी फेडरेशन सुरु करावेत. पंतप्रधान पिकविमा योजनेचा क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात देण्यात यावी.शेतकऱ्यांना झिरो बॅलन्सवर बँकेत बचत खाते काढण्याचा अधिकार देण्यात यावा. शेतकऱ्यांचे बँकेतील बचत खाते होल्ड करु नये.ऊस लागवड व तोडणी प्रोग्राम ऑनलाइन करून उसकारखान्याची दादागिरी व एकाधिकारशाही संपवा. फळे–भाजीपाला बाजारातील एकसारख्या गुणवत्तेच्यामालाचा भाव फरक, वजन वजावट, कमीशन इ. रद्द करा आणि शेतमाल विक्री नंतर पैसे (पट्टी) त्याचदिवशी देण्याची कारवाई करा.पेस्टीसाइड (कीटकनाशके) व केमिकल मधील ५००% पर्यंतची नफाखोरीसंपवा आणि शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपण्यांना शील ठोका.आदी शेतकरीहिताच्या मागण्यासह कामगारांच्या मागण्याचे वेगळे निवेदन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नांदेडतहसीलदार यांना देण्यात आले. १ ते ३ सप्टेंबर रोजी नांदेड शहरात अतिवृष्टी होऊन नदीकाठावरील व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या सर्वांना सरसगट सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच सीटूकामगार संघटनेच्या कामगारांनी मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे गृह पाहणी करून पंचनामे करण्यातयावेत यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्या सर्वांच्या घरी जाऊन पाहणी करावी व पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी. सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारावेत तसेच तलाठी व वसुलीलिपिक हे पीडिताच्या घरी नजाता दलाला मार्फत व्हाट्सअपवर नावे मागवून बोगस पूरग्रस्तांची यादी तयार करीत आहेत. त्याचे सायबरशाखे मार्फत व्हाट्सअप चॅट तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात सचिन कासलीवाल, कॉ.विजय गाभने, कॉ. गंगाधरगायकवाड, बालाजी आबादर पाटील, कॉ.उज्वला पडलवार, मारोती सवंडकर ,अजित पाटील,दिलीप कंधारेआदींनी मनोगतपर मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सामील झाले होते.मोर्चा यशस्वी करण्यासाठी सूरज कौऊटकर,श्यामसरोदे, जयराज गायकवाड,आदींनी परिश्रम घेतले.
Read More » -
सामाजिक
लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये कधी येणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे? तारीख ठरली
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हफ्त्यांचे 3 हजार रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्यामुहूर्तावर जमा झाले होते, यानंतर आता तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी जमा होणार? याची अनेक महिला वाटपाहत आहेत. सरकारकडून तिसऱ्या हफ्त्याच्या पैशांबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील, अशी माहिती महिलाव बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबरला रायगडमध्ये होत आहे. सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचे लाभ महिलांना वितरित करण्यात येतील. स्क्रुटिनीमुळे अद्याप लाभ प्राप्तझाला नाही त्यांचे सर्व लाभ दिले जातील. 2 कोटी महिलांना लाभ दिले जातील, असं आदिती तटकरे यांनीसांगितलं आहे. 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ एकत्रित जमाझाले आहे. मात्र 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तरज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीकरण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्यामहिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल, अशी ग्वाही आदिती तटकरे यांनीदिली आहे.
Read More » -
राजकीय
एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी : मुखेड धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन
मराठा समाज बंद व धनगर समाज रास्ता रोको पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली मुखेड प्रतिनिधी:- एसटी आरक्षण अंमलबजावणीची पूर्तता लवकरात लवकर करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरुअसलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने मुखेड तहसील कार्यालय समोर रास्तारोको आंदोलन केले. मुखेड बंद आणि रास्तारोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवतांनापोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली एकीकडे मराठा समाजाने बंद पुकारलेला असताना दुसरीकडेधनगर समाजाला एसटी आरक्षण सवलतीची अंमलबजावणी व्हावी म्हणून मागील १५ दिवसापासूनपंढरपूर येथे धनगर समाज बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामधील अनेक उपोषणकर्त्यांचीतब्येत खालावली आहे. हि सर्व मंडळी धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावून लढतआहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एसटी आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यावर आलेलीआहे. पंढरपूर येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सोमवारी (ता. २३) रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असोव येळकोट येळकोट जय मल्हार आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणा देतमुखेड तहसील कार्यालय समोर सकल धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सकल धनगर समाजाच्या आंदोलनात…
Read More » -
राजकीय
भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, माजी मंत्री खा.भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसवासी
नांदेड प्रतिनिधी:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटकाबसताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्कररावपाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केलीआहे. भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपातप्रवेश केला होता. पण आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचेज्येष्ठ नेते अमित देशमुख यांना मोठं यश आलं आहे. त्यामुळे भास्करराव खतगावकर यांनी आज अखेरकाँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णायांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचे आता ताकद वाढली आहे. कारण याबड्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश केल्यानंतरभास्करराव खतगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली
Read More » -
सामाजिक
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात 19 सप्टेंबर चे सकाळी 6 वाजेपासून ते 3 ऑक्टोंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व…
Read More » -
Uncategorized
मुखेडमध्ये पैगंबर मोहम्मद स.अ यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.
• शहरात जागोजागी पाणी,फळे, मिठाई वाटप,जुलुसवर पुष्पवृष्टी मुखेड प्रतिनिधी:- ईद–ए–मिलाद–उन–नबीचा सण आज दि १९ सप्टेंबर रोज गुरुवारी मुखेड शहरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी मस्तानशाह वली दरगाह येथे प्रार्थना…
Read More » -
क्राईम
धक्कादायक पोलिसानं पत्नीवर झाडल्या गोळ्या, हत्येनंतर स्वत:च झाला ठाण्यात हजर
नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पोलिसानेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे. नांदेड, प्रतिनिधी : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यानं गोळ्या झाडून आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो स्वत: ग्रामीण पोलीस ठाण्यातहजर झाला. अफजल पठाण असं या आरोपीचं नाव आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातल्या धनेगाव परिसरातघडली आहे. आरोपी हा नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॅन्स्टेबर म्हणून कार्यरत आहे. घटनेबाबतअधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कुटुंबातील किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊलउचललं आहे. त्याने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. अफजल पठाण असं या आरोपीचंनाव आहे. तो नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॅन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. तर नाजीम बेगम असंहत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. अफजल पठाण यांचे त्यांची पत्नी नाजीम बेगम यांच्यासोबत काही कारणामुळे भांडण झालं. भांडणाचा रागमनात असल्यामुळे त्यांनी आपल्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत गंभीरजखमी झालेल्या नाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर अफजल पठाण हा स्वत: ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरूअसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Read More » -
राजकीय
विधानसभेसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला आचारसंहिता लागणार; शिंदे गटाच्या नेत्याने उघड केलीरणनीती
मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक कधी लागणार, याची संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी थेट आचारसंहिता लागू होण्याचीतारीखच सांगून टाकली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या काही दिवसांतनिवडणूक आयोगाकडून फुंकले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होत असते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी केवळ हरियाणाविधानसभेचीच निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर राज्यातील विरोधीपक्षाकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. सत्ताधारी पक्षाच्या सोयीसाठी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे, असा गंभीर आरोपविरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर लावण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचे कारण देऊन विधानसभेची निवडणूक जाहीर केली नाही, असेस्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्याच वेळी दिले होते.दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी माध्यमाशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येत्या पाच…
Read More »