सामाजिक
-
नांदेड जिल्ह्याला चार दिवस ‘यलो अलर्ट’; विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता!
नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़. 30 मार्च २६ प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३० व ३१ मार्च २०२६ तसेच १ व ३ एप्रिल २०२६ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिकशक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारीघ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असालआणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोकेघालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युतउपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. या गोष्टी…
Read More » -
बीएलओचे अथक परिश्रम: मुखेडमध्ये ७८% ‘मॅपिंग’ पूर्ण; उर्वरित २२% मतदारांनी तातडीने नोंदणी करा.
▫️ उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांचे आवाहन मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ३० मार्च २६ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात एप्रिल २०२६ मध्येमतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, ९१–मुखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या सध्याच्या मतदार यादीतील नावाची, सन२००२ मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अंतिम यादीतील नावाशी ‘मॅपिंग’ (Mapping)करून घ्यावी, असे आवाहन देगलूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अनुप पाटील यांनी केले आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त करण्यातआले आहेत. या कामासाठी बीएलओना त्यांच्या मूळ कर्तव्यातून २४ दिवसांची सुटी देण्यात आली असून, त्यांनी आतापर्यंत ७८ टक्के मतदारांच्या नावाचे मॅपिंग पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप २२ टक्के मतदारांचेकाम प्रलंबित आहे.…
Read More » -
पत्रकार मोहम्मद रफीक यांना ‘न्याय चक्र’ पुरस्कार जाहीर; उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २८ मार्च २६ पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड येथील पत्रकार मोहम्मद रफीक मोहम्मद खाजामिया यांना यावर्षीचा प्रतिष्ठित ‘न्याय चक्र पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. उद्या, रविवार दिनांक २९ मार्च रोजी एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोहम्मद रफीक यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सतत संघर्ष केला आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील निस्पृह योगदानाची दखल घेऊन ‘लोक जनजागृती बहुउद्देशीय…
Read More » -
बेटमोगऱ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर: श्री सिद्धदयाल महाराजांनी अदा केली ईदची नमाज!
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज २३ मार्च २०२६ संपूर्ण देशात रमजान ईदचा उत्साह असताना, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा या गावाने समाजा समोर जातीय सलोख्याचे आणि हिंदू–मुस्लिम ऐक्याचे एक अनोखे उदाहरण मांडले आहे. बेटमोगरा येथील प्रसिद्ध शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे प्रमुख पुजारी, परमपूज्य श्री सिद्धदयाल…
Read More » -
रमजान ईद : आत्मशुद्धीपासून सामाजिक एकतेकडे जाणारा प्रवास
मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २१ मार्च २६ (संपादकीय विशेष लेख) रमजान ईद, ज्याला ईद–उल–फित्र म्हणूनही ओळखले जाते, हा इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणिपवित्र सण आहे. संपूर्ण महिनाभर चाललेल्या रमजानच्या उपवासानंतर येणारा हा सण केवळ आनंदाचा नसून, तो आत्मशुद्धी, संयम आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. रमजान ईद म्हणजे आनंद, उत्साह आणि उत्सवाचा दिवस — पण त्यामागे दडलेला संदेश अधिक गहिरा आणि विचार करायला लावणारा आहे. महिना भराच्या कठोर साधनेनंतर येणारा हा सण माणसालाकेवळ धार्मिकतेकडेच नाही, तर माणुसकीकडेही नेतो. रमजान हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर आत्मसंयम, शिस्त आणि आत्मपरीक्षणाचा काळ आहे. दिवसातून अनेक वेळा प्रार्थना, गरीब–गरजूंना मदत, वाईट सवयींपासून दूर राहणे — या सर्व गोष्टींचा सराव रमजान मध्ये केला जातो. त्यामुळे ईद हा त्या साधनेचा आनंदोत्सव ठरतो. ईदचा खरा अर्थ “परत येणे” असा आहे — चांगुलपणाकडे, प्रामाणिकपणाकडे आणि सहानुभूतीकडे परत येणे. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात माणूस अनेकदा स्वतःपासून आणि समाजा…
Read More » -
चिमुकली फातेमा धुंदीचा पहिलाच रोजा; कुटुंबात अभिमानाचा क्षण
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २० मार्च २६ रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर अवघ्या ६ वर्षांच्या फातेमा मुजीब धुंदी हिने आपल्याआयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. लहान वयातच तिनेदाखवलेली श्रद्धा आणि संयम सर्वांसाठी कौतुकास्पद ठरत आहे. फातेमा ही भाजपचे युवा नेते खाजा धुंदी यांची पुतणी असून, तिच्या या पहिल्या रोज्याबद्दल कुटुंबातआनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक व परिसरातील नागरिकांकडूनतिचे कौतुक करण्यात येत आहे. रमजान महिन्यातील रोजा हा केवळ उपवास नसून संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा संदेश देणारा आहे. फातेमाने इतक्या लहान वयात हा अनुभव घेतल्याने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजोबा करीमसाब धुंदी व वडील मुजीब धुंदी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.
Read More » -
लातूर रोड-मुखेड-बोधन रेल्वे मार्गासाठी रेल्वे संघर्ष समिती आक्रमक; आमदार तुषार राठोड यांना दिले निवेदन
▫️रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणू”; आमदार तुषार राठोड यांचेआश्वासन मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १९ मार्च २६ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड – मुखेड – बिलोली – बोधन या १३४ कि.मी.च्यारेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे संघर्ष समितीने आता कंबर कसली आहे. या संदर्भात आज दि १९ मार्च रोजी समितीच्या शिष्टमंडळाने मुखेड–कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार गोविंदराव राठोडयांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. रामगुंडम ते कुर्डूवाडी या निजामकालीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले असून, बोधन पर्यंत पूर्वेकडे व लातूर रोड…
Read More » -
प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची उदासीनता; सलगरा-बेटमोगरा रस्ता बनला मृत्यूचा सापळा!
▫️सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या केराची टोपली मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ मार्च २६ तालुक्यातील सलगरा ते बेटमोगरा या दरम्यानचा रस्ता सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशा भीषण अवस्थेत असून प्रवाशांसाठी तो ‘जीवघेणा‘ ठरत आहे. विशेष म्हणजे, बेटमोगरा हे गाव तालुक्याचे नेतृत्व केलेल्या एका माजी आमदारांचे गाव असतानाही, या मार्गाचे नशीब अद्याप उघडले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. ज्या गावाने तालुक्याला आमदार दिले, त्या गावाचा मुख्य रस्ताच जर चिखल आणि खड्ड्यांच्या साम्राज्यात अडकला असेल, तर इतर गावांची काय अवस्था असेल? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी सत्तेत असताना आणि सत्ता गेल्यावरही या महत्त्वाच्या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षकेल्याचा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत.…
Read More » -
लातूर रोड–बोधन रेल्वेसाठी मुखेडात रणशिंग! संघर्ष समितीचा एल्गार; अध्यक्षपदी दिलीप कोडगिरे यांची निवड
▫️”मुखेड रेल्वे संघर्ष समितीचा ‘हुंकार‘; आता लढा थेट दिल्लीपर्यंत!” मुखेड: (प्रतिनिधी) श्रमिक एकता न्यूज़ १८ मार्च २६ गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गासाठी आता आर–पारची लढाई लढण्याचा निर्धार मुखेडकरांनी केला आहे. मंगळवार, १७ मार्च२०२६ रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या निर्णायक बैठकीत रेल्वे संघर्ष समितीचीघोषणा करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप श्रीराम कोडगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आता रेल्वेच्या लढ्याला नवी धारचढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारण बाजूला, आता केवळ विकास!…
Read More » -
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड
नांदेड दि. १६ मार्च २६ महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा…
Read More »