सामाजिक

  • मुखेड तालुक्यातील जांब येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ समाधान शिबिर उत्साहात संपन्न; नागरिकांच्या समस्यांचे जागीच निवारण

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ दि १४ मार्च २६ शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर‘ टप्पा क्र. १ अंतर्गत, मुखेड तालुक्यातील जांब बु. येथील जिल्हा परिषद शाळेत आज दि. १४ मार्च २०२६ रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महसूल आणि इतर विभागांमार्फत नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करून त्यांच्या तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी प्रमोद बिराजदार यांनी केले. यावेळी मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अकृषिक (NA) परवानगी रद्दकरण्याबाबतच्या अद्ययावत सुधारणा आणि एकवेळचे अधिमुल्य भरण्याच्या नवीन व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना‘ आणि जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या नियमावलीवरही त्यांनी प्रकाश टाकला. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ त्वरित देण्यात आला. यामध्ये ७/१२ अभिलेखांमधील दुरुस्ती करून नवीन ७/१२ वाटप करण्यात आले.…

    Read More »
  • सोशल मीडियाचे ‘मायाजाल’: महाराष्ट्रातही लहान मुलांवर बंदीची गरज आहे का?

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ मार्च २६ विशेष लेख: सोशल मीडिया आणि बालपण आजचे युग हे डिजिटल युग आहे. हातातील स्मार्टफोन आणि त्यात असलेले सोशल मीडियाचे अथांगविश्व यात आजची पिढी पूर्णपणे गुंतलेली दिसते. नुकतेच आपल्या शेजारील आंध्र प्रदेश सरकारने १३ वर्षांखालील आणि कर्नाटक सरकारने…

    Read More »
  • कुटुंब व्यवस्थेचे जतन झाले तरच जीवनाची मूल्य टिकतील– युवराज पाटील

    ▫️मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प संपन्न मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ दि १३ मार्च २६ एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे…

    Read More »
  • मुखेडचे माजी नगराध्यक्ष द्वारकादास जाजू यांचे निधन

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ दि १२ मार्च २६ मुखेड येथील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष द्वारकादास जाजू यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन…

    Read More »
  • मुखेड मानवता विचार मंचाची नवीन कार्यकारिणी जाहीर 

    ▫️अध्यक्षपदी सदाशिव पाटील जाधव तर सचिवपदी पवनशेठ पोद्दार यांची बिनविरोध निवड मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६ शहरात सामाजिक कार्याला बळ देण्याच्या उद्देशाने मानवता विचार मंचाची महत्त्वपूर्ण बैठक सं. स. मस्कले सर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीत मानवता विचारमंचाच्या नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पाटील जाधव यांची मानवता विचार मंचाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थित सदस्यांनी स्वागतकरत पुढील काळात सामाजिक, व जनहिताच्या उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी संजय सावकार मुक्कावार, सचिवपदी पवनशेठ पोद्दार तर कोषाध्यक्षपदी एस. आर. करखेलवार यांची निवड करण्यात आली.…

    Read More »
  • ३८ वर्षांचा वनवास संपता संपेना, शासनाकडून घोषणांचा  पाऊस; लेंडी धरणग्रस्तासाठी मात्र दुष्काळ ! – जैनोदीन पटेल

    मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६: – महाराष्ट्र व तेलंगाना सुयक्त विद्यमाने ३८ वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यात हारीत क्रांती…

    Read More »
  • मुखेडमध्ये RTE प्रवेशाचा बाजार? ‘पैसे द्या आणि प्रवेश मिळवा’ची पालकांमध्ये चर्चा; प्रशासनाचे दुर्लक्ष

    ▫️RTE प्रवेश प्रकरणात नांदेड शिक्षण विभागातून कनेक्शन असल्याची चर्चा मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० मार्च २६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी सध्या पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. मात्र, मुखेड शहरासह परिसरात ‘पैसे देऊन काम होत असल्याच्या‘ चर्चांनी जोर धरला असून, यामुळे सर्वसामान्य आणि गरजू पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमका…

    Read More »
  • श्रमिक एकता न्यूजचा दणका! रस्त्यावर वाहणाऱ्या घाण पाण्याचा प्रश्न सुटला; मुख्याधिकारी जाधव यांची तात्काळ कारवाई

    मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज दि १० मार्च २६ येथील प्रभाग क्रमांक ९ मधील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यातील घाण…

    Read More »
  • लातूरच्या बालकलाकाराची किमया; सहावीच्या सलमान शेखने साकारले छत्रपती शिवरायांचे विलोभनीय चित्र

    मुखेड प्रतिनिधी:- ९ मार्च २६ लातूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयाचा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी सलमान शेख याने आपल्याकुंचल्याच्या जादूने शिवरायांचे एक अप्रतिम रूप कागदावर उतरवले आहे. केवळ कलर पेन्सिलचा वापरकरून त्याने रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतअसून, त्याच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सलमानने अत्यंत सूक्ष्म तपशीलांसह हे चित्र साकारले आहे. महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज, करारी नजरआणि कपाळावरचा टिळा या गोष्टी त्याने कलर पेन्सिलच्या माध्यमातून अत्यंत जिवंतपणे मांडल्या आहेत. वयाच्या मानाने सलमानची ही कलाकृती त्याच्यातील उपजत प्रतिभा आणि मेहनतीची साक्ष देते. कोणत्याही कलेला योग्य वळण मिळण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. सलमानला त्याच्या शाळेतील कला शिक्षक ज्ञानेश्वरजी बेंबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बेंबडे सरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच सलमानने हे आव्हानात्मक चित्र पूर्ण केले आहे. विद्यार्थ्याच्या यशात शिक्षकाचा वाटाकिती महत्त्वाचा असतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. सलमानच्या या कलेची दखल शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक आणि पालकांनी घेतली आहे. “एका छोट्या वयोगटातील मुलाने इतक्या सफाईदारपणे रेखाटलेले हे चित्र थक्क करणारे आहे,” अशाशब्दांत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. “सलमानच्या…

    Read More »
  •  उद्या मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचे आयोजन.

    ▫️युवराज पाटील गुंफणार ‘चला कुटुंब जपूया’ विषयावर १४ वे पुष्प. मुखेड / प्रतिनिधी. श्रमिक एकता ०९ मार्च २६     मातोश्री भिमाई पांडुरंगराव पुंडे व्याख्यानमाला तसेच गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे दि.१० मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजता शांतीनगर मुखेड येथे आयोजन करण्यात आलेआहे.याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गारगोटी (कोल्हापूर) येथील युवराज पाटील यांचे ‘चलाकुटुंब जपूया’ या विषयावर व्याख्यान होणार असून व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प पाटील गुंफणार आहेत.       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र येवती मठसंस्थानचे मठाधिपती सदगूरू नराशाम महाराज हे राहणार असून आमदार डॉ.तुषार राठोड, नगराध्यक्ष विजया देबडवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या शानदार सोहळ्यात ‘ग्लोबल एक्सपर्ट इमर्जन्सी मेडिकल फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड,मुंबई‘ येथीलडॉ.संदीप बालनराव गोरे यांना ‘गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात येणार आहे. मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे यांच्या पुढाकारातून मातोश्री भिमाई व्याख्यानमाला सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य व वैचारिक प्रबोधनाचे कार्य करत आहे. यापूर्वी या व्याख्यानमालेत तेरा व्याख्यान पुष्पे यशस्वीपणे संपन्न झाली आहेत.पहिल्या पुष्पात कवी प्रा.प्रशांत मोरे (मुंबई) यांनी ‘आई’ याविषयावर व्याख्यान दिले,दुसरे पुष्प प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी ‘सुंदर जगण्यासाठी’, तर तिसरे पुष्पडॉ.राजेंद्र पवार यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर गुंफले.,चौथे पुष्प प्रा.डॉ.तेज निवळीकर यांनी‘२१व्या शतका समोरील आव्हाने’ या विषयावर,पाचवे पुष्प डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पायातुका झालासे कळस’ या विषयावर सादर केले,सहावे पुष्प डॉ.अविनाश सावजी अमरावती यांनी‘शतायुषी व्हा! पासवर्ड आरोग्याचा’, तर सातवे पुष्प डॉ. सचिन देशमुख औरंगाबाद यांनी ‘स्वभावालाही औषध असतं’ या विषयावर गुंफले.,आठवे पुष्प जगन्नाथ दीक्षित औरंगाबाद यांनी ‘विनासायास वेटलॉस’, नववे पुष्प डॉ.श्रीराम राठोड नांदेड व माजी आयुक्त आर.के. गायकवाड यांनी ‘विपश्यना : परिचयव अनुभूती’ या विषयावर सादर केले,दहावे पुष्प प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी ‘जीवन त्यांना कळले हो’, अकरावे पुष्प इंद्रजीत देशमुख (कराड) यांनी ‘पसायदान’ या विषयावर गुंफले,बारावे तपपूर्ती पुष्पडॉ.अनंत सूर्यवंशी (नांदेड) व डॉ.गौरव दिलीप पुंडे (मुखेड) यांनी ‘हृदयरोग जनजागरण अभियान’ याविषयावर सादर केले तर तेरावे पुष्प प्रा.श्रीहरी वेदपाठक (लातूर) यांनी ‘ताण–तणावाचे व्यवस्थापन’ याविषयावर गुंफले.याच परंपरेत मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात युवराज पाटील यांचे ‘चला कुटुंब जपूया’ हे व्याख्यान समाजाला सकारात्मक दिशा देणारे ठरणार आहे.आधुनिक जीवनशैलीत कुटुंबव्यवस्था,नातेसंबंध व मूल्यांचे जतन कसे करावे, यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमास…

    Read More »
Back to top button