शैक्षणिक

  • हायकोर्टाचा मोठा दिलासा! आरटीई प्रवेशाला मुदतवाढ, जुन्याच नियमांनुसार प्रक्रिया

    मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्थात आरटीई द्वारे शाळा प्रवेशासाठी १ किमीच्या अटीला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली असून पूर्वीच्या नियमांप्रमाणेच प्रवेश देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. आज आरटीई अंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख होती. सरकारनं यंदा या कायद्यात नवी नियमावली लागू करत पूर्वीच्या ३ किमी ऐवजी १ किमीच्या परिसरातीलच शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल असे आदेश काढले होते. याविरोधात पालकांनी तीव्र विरोध केला, त्याअनुषंगानं नागपूरच्या खंडपीठात याविरोधात याचिका देखील झाल्या. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत काल खंडपीठानं या १ किमीच्या अटीला स्थगिती दिली. ‏दरम्यान, आजच्या सुनावणीत खंडपीठानं आजची प्रवेशाची शेवटची तारीखही पुढे ढकलली. तसंचआरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर १ किमीचा नियम काढून पूर्वीप्रमाणे ३ किमीचा नियम अपडेट करण्यासाठी १२ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवर हे अपडेशन झाल्यानंतरच आरटीई अंतर्गत ऑनलाईन नोंदणीच्या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सरकारने जाहीर करावा, असे आदेश नागपूरखंडपीठानं दिले आहेत. यामुळं १ किमीच्या अटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना शाळा उपलब्ध नसल्यानं नोंदणी होऊ शकली नाही अशा लाखो विद्यार्थ्यांना यामुळं दिलासा मिळाला आहे. आरटीई अंतर्गत एक किलोमीटरच्या अटी विरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अॅड. दीपकचटप, अॅड. बोधी रामटेके यांच्यासह आशिष फुलझेले आणि अनिकेत कुत्तरमरे यांनी दोन वेगवेगळ्या…

    Read More »
  • मुखेडात शिष्यवृत्ती परीक्षेत ‘सावळा गोंधळ’; मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी तर इंग्रजीच्यांना मराठीचे पेपर!

    मुखेड (प्रतिनिधी): २३ फेब्रुवारी २६ दि २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मुखेड येथील परीक्षा केंद्रावरप्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे, तरइंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचे पेपर वाटप झाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. याप्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. मात्र, काही वेळातच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, त्यांना त्यांच्या माध्यमाचे पेपर मिळालेले नाहीत. मराठीमाध्यमाच्या वर्गात इंग्रजीचे पेपर गेले, तर सेमी–इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमाध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. ही चूक लक्षात येईपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. १५ मिनिटे उशिरा मिळाले पेपर हा गोंधळ निस्तरताना आणि योग्य प्रश्नपत्रिकांची जुळवाजुळव करताना परीक्षेच्या वेळेतील तब्बल १५ मिनिटे…

    Read More »
  • प्रशासनाच्या कडक निगराणीत नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्रावर शालांत परीक्षा सुरळीत

    मुखेड: प्रतिनिधी २२ फेब्रुवारी २६ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालांतप्रमाणपत्र इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा सध्या सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जनता शिक्षण प्रसारकमंडळ नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथील परीक्षा केंद्रावर प्रशासनाच्या कडक निगराणीत आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान‘ अंतर्गत उमरदरी केंद्रावर विशेष खबरदारी घेतलीजात आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र संचालक आणिपर्यवेक्षकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची कसून तपासणीकेल्यानंतरच त्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जात आहे. विश्वासनीय सुत्रांकडून सांगण्यात आले की काही असामाजिक तत्त्वांद्वारे व शाळेतील हकालपट्टी केलेल्या एका माजी मुख्याध्यापकाला हाताशी धरून खंडणीखोर तोतया पत्रकार हा या केंद्रावर मोठ्यारकमा घेऊन परीक्षा केंद्रावर काॅपी चालवण्यासाठी आटापिटा करत कर्मचाऱ्यांवर दबाव आणत होता पण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी कुठलाही दबाव न  घेता पोलिस आणि शिक्षण खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची मदत घेऊन संबंधितांचे गैरकारभार करण्याचे मनसुबे उधळून लावले आहेत.सदरील परीक्षा सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत सुरू असल्यामुळे शिक्ष  विभागातील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रशासनाच्या नियोजनामुळे पालकांनी समाधान व्यक्त…

    Read More »
  • परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

    नांदेड दि. २० फेब्रुवारी :- आज दि २० फेब्रुवारी रोजी इयत्ता १० वीची परीक्षा जिल्ह्यातील १७८ केंद्रांवर सुरू झाली. मराठी…

    Read More »
  • सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यात सेंट मेरी इंग्लिश स्कूलला द्वितीय पारितोषिक

    ◽️सामुहिक नृत्य स्पर्धेत बक्षीस मिळवणारी एकमेव इंग्लिश स्कूल मुखेड प्रतिनिधी:- २० फेब्रुवारी २६अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज…

    Read More »
  • जि.प.मुलींचे हायस्कूल गुणवत्तेसह विविध उपक्रम राबविणारी सर्वोत्तम शाळा – डॉ.दिलीप पुंडे.

    ▫️पिएमश्री योजनेतून प्रशालेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी. मुखेड / प्रतिनिधी. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड ही गुणवत्तेसह विविध उपक्रम राबविणारी…

    Read More »
  • शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार-राजकुमार मुक्कावार

     उप मुख्य कार्यकारी मुक्कावार  यांनी दिले  शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळास आश्वासन. नांदेड प्रतिनिधी:- १२ जुलै २५   जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षकपरिषदेचे शिष्टमंडळ शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न विज्ञान विषय शिक्षकांना   वेतनश्रेणी लागू करणे. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,पदोन्नत मुख्याध्यापक यांची पदे श पदोन्नती भरावी प्राथमिकशिक्षक,प्राथमिक  पदवीधर,पदोन्नत मुख्याध्यापक यांना सलग बारा वर्षानंतर मिळणारी चट्टोपाध्यायवेतनश्रेणी व 24 वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ  वेतन श्रेणी लागू करावी.  डीसीपीएस धारक शिक्षकांची कपातीची रक्कम एनपीएस खाती संबंधित त्याच्या खात्यावर जमाकरावी. जिल्हा बदलीने व जिह्यातील शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी खाते विवरण पत्रातील त्रुटी  दुरुस्त करावे.जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर “शिक्षक दिना“पूर्वी घोषित  करून आदर्श शिक्षकांना पाचसप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात यावे.जिल्ह्यातील वैद्यकीय रजेची देयके व सेवानिवृत्त शिक्षकांचीथकित देयके यासाठी निधी उपलब्ध करून देऊन प्रलंबित  देयके अदा करवीत.शालेय पोषण आहारयोजना त्रयस्थ  यंत्रणेमार्फत रावावेत व शिक्षकांना दररोज लागणारी अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये. ती कामे कमी करावीत. या मागण्याचे निवेदन देऊन सर्व प्रलंबित प्रश्ननांवर चर्चा करण्यात आली.   या प्रसंगी  शिष्टमंडळास  त्यांनी प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करूनप्रलंबित प्रश्न सोडवू आश्वासन दिले. तसेच वेतन सातव्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात प्राथमिक पदवीधर व  सर्व विभागातील त्रुटी संदर्भातविभाग प्रमुखांना आदेशित केल्याची माहिती दिली.  याप्रसंगी  शिष्टमंडळात शिक्षक परिषदेचे राज्य संघटन मंत्री  सुरेश दंडवते, विभागीय अध्यक्ष  संजयकोठाळे, जिल्हा नेते  दिगंबर पाटील कुरे, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार, जिल्हा प्रवक्ते रवि ढगे, जिल्हा कार्यालयीन मंत्री बळवंतमंगनाळे, जिल्हा संघटन मंत्री संजय मोरे,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संजय वाकोडे,जिल्हा उपाध्यक्ष संभाजीपावडे, जिल्हा सल्लागार विजयकुमार गबाळे,  जिल्हा संघटक हणमंत काऊलवार, जिल्हा संघटक संजिवमानकरी, नांदेड तालुका अध्यक्ष भगवान बकवाड, तालुका सरचिटणीस गणेश गजलवार, मुखेड तालुकापदाधिकारी नारायण गोडाजी, भोकर तालुका पदाधिकारी  राजेश्वर चक्रावार आदिजण उपस्थित होते.

    Read More »
  • श्री सद्गुरू सेवालाल महाराज कनिष्ठ महाविद्यालयात नीट, जे.ई.ई, एम एच- सि ई टी व विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गाचे भव्य उद्घाटन संपन्न

    मुखेड/प्रतिनिधी:- ०७ जुलै २५ मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव पीर येथील श्री सद्गुरू सेवालाल महाराज कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि. ७ जुलै…

    Read More »
  • बोगस शिक्षक भरतीसंदर्भात विशेष चौकशी समिती नेमणार : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

    मुंबई : ०४ जुलै २५ राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य समावेश करुन वेतन अदाकेले जात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेतामुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्यात आयएएस, आयपीएस, आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती नेम ली जाईल. तसेच या समितीच्या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरयांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सुधाकर अडबाले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे, संदीप जोशी, डॉ. परिणयफुके, डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, शिक्षकांची भरती प्रक्रिया हीनियमाप्रमाणेच होते. त्यास शासन नियम ाप्रमाणेच मान्यता देते. तथापि भरतीमध्ये आर्थिक व्यवहारहोऊन नियमबाह्य भरती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. तसेच असेप्रकरण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवले असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर देखीलकारवाई करण्यात येईल असेही त्यांनी याबाबतच्या उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले

    Read More »
  • मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.

    मुखेड / प्रतिनिधी २१ जून २५ महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत मुखेड येथील शशांक शिरूरकर याने ९९ टक्के गुण मिळवुन…

    Read More »
Back to top button