शैक्षणिक

  • दहावीच्या परिक्षेत श्रेया वाघमारेला मिळाले ९८.६० टक्के गूण

    मुखेड / प्रतिनिधी.     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील ब्राईटस्टार इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रेया संजय वाघमारे हिने ९८.६० % टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यशसंपादन करीत ब्राईट स्टार इंग्लिश स्कूलचा यश मिळविला आहे या यशाबद्दल श्रेयाचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.    नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल व विश्व हिंदु परिषदेचे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे याची कन्या श्रेया वाघमारे या विद्यार्थ्यांनीने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९८.६० टक्के गुण  मिळविले आहे.यात त्याला मराठी विषयात ९७,संस्कृत विषयात ९७, इग्लिंश ९३, गणित १००, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९६ व सामाजिकशास्त्रे ९६ गुणमिळाले आहेत. श्रेयाने या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या…

    Read More »
  • दहावीच्या परिक्षेत इमरान महेताब शेखने मिळविले ९३.२० टक्के. 

    गुरूदेव विद्यामंदीर माध्यमिक विद्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला . मुखेड / प्रतिनिधी.     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्यापरिक्षेचा निकाल दि.१३ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला.या निकालात मुखेड शहरातील गुरूदेवविद्या मंदिर माध्यमिक विध्यालयाचा विद्यार्थी इमरान महेताब शेख याने ९३.२० टक्के गुण मिळवूननेत्रदीपक यश संपादन करीत गुरूदेव विद्या मंदिर माध्यमिक विध्यालयातुन प्रथम येण्याचा बहुमानमिळविला आहे या यशाबद्दल इमरानचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.    नुकतच दिनांक १३ में रोजी दहावीच्या परिक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्याअधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला त्यामध्ये शहरातील गुरूदेव विद्यामंदीर विद्यालयाचा विद्यार्थी वराष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष महेताब शेख यांचे चिरंजीव इमरान महेताब शेख याविद्यार्थ्यांने परिक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन करीत ९३.२० टक्के गुण  मिळविले आहे.यातत्याला मराठी विषयात ८२,हिंदी विषयात ८७, इग्लिंश ७५, गणित ९४, विज्ञान आणी तंत्रज्ञान ९३ वसामाजिकशास्त्रे १०० गुण मिळाले आहेत.इमरानने या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, शिक्षिका,आजी,आई,वडील व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच गुरुजणांना दिले आहे.या यशाबद्दल आमदारडाॅ.तुषार राठोड,माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी आमदार अविनाश घाटे,माजी आमदारसुभाष साबणे,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड,माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटीलगोजेगावकर,माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, प.स.चे माजी उपसभापती सुभाष पाटील दापकेकर, माजी जि.प.सदस्य संतोष बोनलेवाड, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड,गटशिक्षण अधिकारी कैलासहोनधरणे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे,माजी नगरसेवक राहुललोहबंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पा.सकनुरकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजु पाटीलरावणगावकर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबुराव कदम,भाजपाशहर मंडळ अध्यक्ष नागनाथ लोखंडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड,शिक्षण विस्तारअधिकारी डाॅ.शिवाजी कराळे,शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव येवतीकर,शिक्षण विस्तारअधिकारी उत्तम चव्हाण, गुरूदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव गरुडकर,उपाध्यक्ष संजयगरुडकर,कोषाध्यक्ष डाॅ.बालाजी गरुडकर, मुख्याध्यापक बालाजी येवते,राष्ट्रीय अल्पसंख्याकपरिषदेचे मराठवाडा अध्यक्ष  आब्दुल बशीर माजीद, तालुकाध्यक्ष असद बल्खी, डोरनाळीचे सरपंचप्र.हुल्लाजी पाटील शिंदे,उपसरपंच प्र.प्रकाश पा.शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटीलकलबंरकर,राष्ट्रवादीचे जयभिम सोनकांबळे,प्रा.डाॅ.संतोष मंगनाळे,दिलीप चव्हाण,विकासराजुरकर,गजानन ढगे सह सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष,पदाधिकारी व विविध क्षेत्रातीलमान्यवरांनी इमरानचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

    Read More »
  • आज दहावी परीक्षेचा निकाल

    दुपारी १ वाजता अधिकृत संकेत स्थळावर पाहता येणार निकाल मुखेड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज १३ जाहीरहोणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. राज्यमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकालजाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकतालागली होती.  अखेर ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिकशिक्षण मंडळाकडून आज १३ मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १वाजता पाहता येणार आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाकडून नियोजन केलेल्या कालावधीत आपापल्याशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुळेगुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. फेब्रुवारी–मार्च २०२५ महिन्यातदहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर केलाजाणार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. येथे पाहा निकाल ?  https:// results.digilocker.gov. in, https://sscresult. mahahsscboard.in, http:// sscresult.mkcl.org, https:// results.targetpublications.

    Read More »
  • मुखेड तालुक्याचा निकाल ९५.२० टक्के; ३ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण

    मुखेड प्रतिनिधी  इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल दि.५ मे रोजी दुपारी बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर झाला. यामध्ये मुखेड तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.२० टक्के लागला असल्याची माहिती मुखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे यांनी दिली. मुखेड तालुक्यात २ हजार ३८४ मुले व १ हजार ६४१ मुली असे एकुण ४ हजार २५ विद्यार्थी व विद्याथीर्नी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी २ हजार २३३ मुले तर १ हजार ५९९ मुली असे एकुण ३ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे. तालुक्यात एकुण १० केंद्रावर बारावीच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी तहसिलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी सी.एल.रामोड, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, परिक्षक बाळासाहेब कदम, सायलु करेवाड यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते. सर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे 

    Read More »
  • मुखेड जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

    मुखेड/प्रतिनिधी:- येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक बॅच शाळेतील इयत्ता पाचवीतील १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतउत्तीर्ण होवून शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. पात्र विद्यार्थी संख्या व मिळालेले गुण पुढील प्रमाणे : मनस्वी आशिष कुलकर्णी (२४८ गुण), बालाजीमनोहर चौधरी (२३० गुण), बालाजी बसवराज इंद्राळे (२२८ गुण), वरद गणेश पिठलेवाड (२२० गुण), ऋतुजा प्रताप शिंदे (२१४ गुण), मारुती वैजनाथ इंगोले (२१४ गुण), सूरया इफत मस्तान शेख (२१०गुण), सोहम माधव चाबरे (२०८ गुण), कात्यायनी नागेश पालमकर (२०२ गुण), विनोद विवेक तांबोळी(१९८ गुण), आर्या विकास बंडे (१९८ गुण), तनुजा मलकाजी मुखेडकर १९०, सृष्टी गणेश बेंद्रे १८६ गुण, जान्हवी शिवानंद उमाटे १७० गुण, पल्लवी चंद्रकांत ताटे १७० गुण, आदित्य गजानन १५९ गुण, प्रथमेशशिवराज वडजे १५६ गुण. या विद्यार्थ्यांना काळवणे, कैलास कोंडलवाड, अत्तार शेख यांनी मार्गदर्शनकेले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शिवाजी कराळे, मुख्याध्यापक माधव माधसवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास पाटील, उपाध्यक्ष अॅड. आशिष कुलकर्णीसह अनेकांनी कौतुक केले आहे.

    Read More »
  • फुले , शाहू , आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत सामाजिक समता प्रस्थापित करतो :-डॉ. अजय गव्हाणे

    मुखेड :-दि १८ एप्रिल २५शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभागाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

    Read More »
  • मज्योफुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान

    मुखेड /प्रतिनिधी:- येथील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांना महाराष्ट्र राज्य उच्च…

    Read More »
  • जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट;केंद्रसंचालक व कर्मचारी निलंबीत   

    · परीक्षा केंद्रावर अनावश्यक गर्दी · पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश  नांदेड दि. 7 मार्च : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज…

    Read More »
  • आज पासुन दहावीची परीक्षा; १४ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ८२३ विद्यार्थी देणार परीक्षा

    मुखेड प्रतिनिधी:-  माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत १० वी बोर्डचे परीक्षेस दिनांक २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असूनतालुका परीरक्षक कार्यालय अंतर्गत १४ परीक्षा केंद्रावर ३ हजार ८२३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून संपूर्ण कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पारपडण्यासाठी तयारी केली असल्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांनी सांगितले आहे. तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड येथे २५० विद्यार्थी, गुरुदेव माध्यमिक विद्यालय मुखेड२५०, नृसिंह विद्यालय उमरदरी २४३, शाहीर आण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड ३१५, विद्या विकास विद्यालयबाराहाळी ३३१, माध्यमिक आश्रम शाळा चव्हाणवाडी ३६१, विद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत २२३, निती निकेतन माध्यमिक विद्यालय जांब १५८, जिल्हा परिषद हायस्कूल बेटमोगरा २५७, जिल्हा परिषदहायस्कूल जाहूर २०३, सेवादास माध्यमिक विद्यालय वसंतनगर ३८७, गंगाबाई माध्यमिक विद्यालयसावरगाव पिर २८८, जीप माध्यमिक पेठवडज ३७१, जनता माध्यमिक विद्यालय कौठा २५२, या १४ परीक्षाकेंद्रावर परीक्षा होत आहेत. यासाठी १४ बैठे पथक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मुख्याध्यापक सहनियुक्त करण्यात आले आहेत तर भरारी पथक तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्ष णाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे पथक गठित करण्यात आले आहे. परिरक्षक म्हणून एस. एस. करेवाड कामपाहणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले आहेत. बैठे पथकामध्ये केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली असून भरारीपथकामध्ये राजेश जाधव तहसीलदार मुखेड, चंद्रशेखर रामोड गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेडयांची जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना तपासून परीक्षादालनात प्रवेश देण्याची सूचना केंद्र संचालक यांना देण्यात आली आहे. केंद्र संचालकाचे शिवायकोणालाही परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राचे नावेपुढीलप्रमाणे जि.प. हायस्कूल बेटमोगरा येथे केंद्र संचालक म्हणून मोरे.बी.एस, जिल्हा परिषद हायस्कूलमुलींचे मुखेड येथे कांबळे डी.जे, शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड येथे मास्टे बी.एस, गुरुदेवविद्यामंदिर माध्यमिक शाळा मुखेड येथे बालाजी पाळेकर, जि.प. माध्यमिक विद्यालय जाहूर येथे जी.के. कदम, नितीनिकेतन विद्यालय जांब बुद्रुक येथे संजय गोंड, सेवादास विद्यालय वसंतनगर येथे श्रीमती प्रेमलास्वामी, विद्या विकास विद्यालय बाहऱ्हाळी येथे पी.एस.मोरे, नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे व्ही.टी. जाधव, पोस्ट बेसिक आश्रम शाळा चव्हाणवाडी बी. एन. पवार, विद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत येथे दीपकठाकूर, गंगाबाई मुलींचे हायस्कूल सावरगाव पीर येथे अभय कर्णावट, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले विद्यालयराजुरा बु. येथे वाय.डी. भैरवाड, कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय मुक्रमाबाद येथे ए. आर. पंचगट्टे हे केंद्रसंचालक म्हणून काम पहाणार आहेत

    Read More »
  • शालेय गुणवत्ता वाढिसाठी मातापालकांचे योगदान महत्वाचे -व्यंकटेश चौधरी

    विद्यार्थी शाळेत आला तरच तो शाळेत शिकवले जाणारे घकट आत्मसात करु शकतो.यासाठी वडिल सकाळी कामावंर जातात. वडिला पेक्षा मातेला आपल्या…

    Read More »
Back to top button