क्राईम
-
शेतीच्या नावाखाली काळा धंदा; मुखेड तालुक्यात ५ किलो गांजासह शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात!
▫️पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचा दणका! मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६ मुखेड तालुक्यातील हिप्परगा (दे) शिवारात एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडच्या स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने या शेतावर छापा टाकून तब्बल ५ किलो १९०…
Read More » -
मुखेडचे माजी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे परभणीत थेट निलंबित; अवैध धंद्यांना खतपाणी घातल्याने एसपींची धडक कारवाई!
▫️पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे कडक आदेश; अवैध धंदे खपवून घेणार नाही, ठाणेदारांना थेट इशारा! मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २४…
Read More » -
मुखेड पंचायत समितीत ‘एसीबी’चा मोठा दणका! सिंचन विहिरीच्या हप्त्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल!!
▫️डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेत भ्रष्टाचार; प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी ‘एसीबी’च्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध! मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़…
Read More » -
मुखेडचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप; तात्काळ बडतर्फ करण्याची सामाजिक संघटनांची मागणी!
▫️अमानुष छळ, खंडणी आणि अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचा तक्रारीत उल्लेख; २८ मे रोजी नांदेड येथे उपोषणाचा इशारा मुखेड प्रतिनिधी : –…
Read More » -
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची धडक कारवाई; किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, एकाच दिवसात ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त
किनवट प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ मे २६ नांदेड परिक्षेत्रात सध्या अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र करण्यात आली असून या मोहिमेच्या सोळाव्या दिवशी पोलीस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने किनवट येथे सुरू असलेल्या मोठ्याजुगार अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३१ मे २०२६ दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अवैध व्यवसाय विरोधी मोहिमेदरम्यान परिक्षेत्रात गेल्या २४ तासांत विविध अवैध धंद्यांवरतब्बल १०३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १२६ इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५३,९३,११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगर गोकुंदा येथे ‘तिर्रट‘ नावाचा जुगारखेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ९ इसमांनारंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रकमेसह ३,८८,९०० रुपयांचामुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडक कारवाईसोबतच परिक्षेत्रात इतर ठिकाणीही अवैध धंद्यांवर मोठे प्रहार करण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या २ इसमांविरुद्ध कारवाई करूनत्यांच्याकडून १,०८,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर मटका आणि जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण ३३ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत १२ गुन्हे दाखल करून ११,८६,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या ७९ इसमांविरुद्ध ७८ गुन्हे दाखल करून ८,०४,२४६ रुपयांची दारू वइतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक पावले उचलली असून त्यांच्याविरुद्ध २ गुन्हे दाखल करून ३०,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व कारवायां…
Read More » -
मुखेडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! तहसील कार्यालयासमोरूनच विना नंबरच्या ‘हायवा’ गाड्यांची अवैध रेती वाहतूक; पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
▫️अनेकदा तक्रारी, बातम्या; पण कारवाई कागदावरच! मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ १७ मे २६ शहरात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र वाळूमाफियांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. आज रविवारची सुट्टी साधून मुखेड शहरातील मुख्य रस्ते आणि चक्क तहसील कार्यालय समोरून क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) अवैध रेती घेऊन जाणाऱ्या, विना नंबरच्या ‘हायवा‘ टिपर गाड्यांची सर्रास वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, जागरूक कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांना प्रत्यक्ष माहिती देऊनही कारवाई मात्र‘शून्य‘ असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुखेड शहरात सुरक्षेच्या आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या नावाखाली प्रत्येक मुख्य चौकात…
Read More » -
स्विमिंग पूलमध्ये सुरक्षा रक्षकांचा अभाव? ९ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू; परिसरात हळहळ
नांदेड – (हिमायतनगर) :- श्रमिक एकता न्यूज़ १४ मे २६ स्विमिंग पुलमध्ये पोहोण्यासाठी आलेल्या 9 वर्षाच्या चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू…
Read More » -
लातूरमध्ये NEET पेपर फुटीचे पडसाद; नामांकित क्लासेसवर संशयाची सुई, पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश
लातूर प्रतिनिधी:- १३ मे २०२६ NEET (UG)-2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमधील खाजगी क्लासेस पर्यंत पोहोचल्याची शक्यता निर्माण झालीआहे. एका पालकाने दिलेल्या खळबळ जनक तक्रारीनंतर लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनीया प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? आज दिनांक १२ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात एका विद्यार्थिनीच्या पालकांनी प्रत्यक्षहजर राहून तक्रार नोंदवली. त्यांच्या दाव्यानुसार, लातूरमधील एका नामांकित कोचिंग क्लासेसने परीक्षेपूर्वी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक ‘मॉक टेस्ट‘ (सराव परीक्षा) घेतली होती. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या NEET (UG)-2026 च्या मुख्य परीक्षेत या मॉक टेस्ट मधील तब्बल ४२ प्रश्नजसेच्या तसे आले होते. NEET परीक्षा पेपर फुटीमुळे आधीच रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सदर क्लासेसचा यापेपर फुटीच्या रॅकेटमध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. तक्रारीचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तातडीने…
Read More » -
लग्नात डीजेवर नाचल्याच्या रागातून पत्नीची हत्या, पतीचीही आत्महत्या; तीन चिमुकली पोरकी
हिमायतनगर प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ मे २६ नाती जोडली जातात ती विश्वासाने आणि प्रेमाने, मात्र संशयाचं भूत डोक्यात शिरलं की होत्याचं नव्हतंहोतं, याचाच प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात आला आहे. चुलत मेहुण्याच्या लग्नातपत्नी डीजेवर नाचली, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे बोरगडी तांडा परिसरात खळबळ उडाली असून तीन लहान मुलांचे छत्र हरपले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मयत पायल विनोद राठोड (२७) आणि विनोद रंगराव राठोड (४०) हे दाम्पत्य भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथील रहिवासी होते. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथेचुलत भावाच्या लग्नासाठी ते आले होते. १० मे रोजी लग्नामध्ये पायल यांनी डीजेवर नृत्य केले, जे पती विनोदला आवडले नाही. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. लग्नानंतर पायल मुलांसह माहेरीच राहिल्या होत्या, मात्र विनोदचा राग शांत झाला नव्हता. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संधी साधून विनोदने धारदार चाकूने पायल यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने गावाच्या शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेत आपलीही जीवनयात्रा संपवली. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर हा रक्तरंजित प्रकार उघडकीस आला.…
Read More » -
अहमदपूर-अंबेजोगाई रस्त्यावर भीषण अपघात; बुलेटस्वार तरुण जागीच ठार
अहमदपूर :- ११ मे २६ अहमदपूर-अंबेजोगाई रस्त्यावरील भागीरथी फार्म हाऊस जवळ आज सायंकाळी कार आणि बुलेटचा भीषण अपघात झाला. या…
Read More »