क्राईम

  • फेसबुक वर महिलेबद्दल अपशब्द लिहीणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा

    मुखेड पोलीस ठाण्यात महिला एकवटल्या मुखेड शहरातील फुलेनगर येथील महिला बद्दल एका भाजप कार्यकर्त्यांनी फेसबुक वर फुले नगरच्या बाया ३०० रुपये असा मानहानीकारक लिखाण केल्यामुळे बुधवारी पोलिस ठाण्यात किशोर मस्कले मंग्याळकर या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन पोलीस स्टेशनला दि. ६ नोव्हेंबर रोजी बहुसंख्यानी महिला एकवटल्या.    लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे रंगीत तालीम सुरू झाले असून आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते सोशल मीडियाचा सर्रास वापर करीत असून आपल्या उमेदवारांना खुशकरण्यासाठी कधी जातीय रूप देत आहे तर कधी कामाचा लेखाजोखा दाखवीत आहेत तर काही कार्यकर्तेत्याला वेगळे वळण देऊन जातीय तेढ निर्माण होणारे व महिला बद्दल अपशब्द बिनधास्त लिहीत आहेतअसाच एक प्रकार मुखेड मध्ये घडला असून  भाजप कार्यकर्ता व सोशलमिडिया  प्रमुख फेसबुकवर महिलाबद्दल अपशब्द लिहिला आहे.     दरम्यान या शब्दाबद्दल येथील महिला पोलीस स्टेशन गाठून संबंधित कार्यकर्तावर कारवाई करण्याचीमागणी केली आहे.

    Read More »
  • मुखेड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल

    मुखेड : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यातगटविकास अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध मुखेडपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार दि. २५ रोजी सायंकाळी घडली. मुखेड पंचायत समिती कार्यालय परिसरात बचत गटाचे कार्यालयात अभियान व्यवस्थापक नंदकिशोरवसंतराव मार्गे व संतोष दाजी सोनवणे हे आचारसंहिता भंग करत बचत गटाच्या महिलांना साड्या, सन्मानपत्र लखपती योजना माहिती रजिस्टर इत्यादी साहित्य वाटप करत होते. हा प्रकार शुक्रवार दि.२५रोजी पंचायत समिती मुखेडच्या बचत गटाच्या कार्यालय आवारात सायंकाळी घडला. दोघेजण मिळूनउपरोक्त साहित्य वाटप करत असल्याचे आढळून आले. यामुळे संबंधितांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचेस्पष्ट झाले. गटविकास अधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख चंद्रशेखर रामोड यांनी दिलेल्याफिर्यादीवरून नंदकिशोर वसंतराव मार्गे व संतोष दाजी सोनवणे यांच्याविरुद्ध पोलिसांनी आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे

    Read More »
Back to top button