Sharmik Ekta

  • सामाजिक

    आजचे एक झाड, उद्याची हिरवीगार भेट”; सावली फाउंडेशनचा बेटमोगऱ्यात वृक्षलागवडीचा धडाका

    ▫️मागील दोन वर्षांत ६०० झाडांचे यशस्वी संवर्धन; यंदा ३०० नवीन वृक्षांचा संकल्प श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १३ ऑगस्ट २६ पर्यावरण संवर्धना बरोबरच गावात निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने ‘सावली फाउंडेशन, बेटमोगरा‘ यांच्या वतीने यंदाही व्यापक वृक्षलागवड चळवळ हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत यावर्षी तब्बल ३०० झाडे लावण्याचा संकल्प फाउंडेशनने केला असून, या उपक्रमाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून सावली फाउंडेशनच्या माध्यमातून बेटमोगरा परिसरात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनआणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मागील दोन वर्षांत फाउंडेशनने ६०० हून अधिक झाडांची लागवड केली असून, त्यांचे योग्य संगोपन केल्याने आज ती झाडे चांगल्या स्थितीत बहरली आहेत. याच कार्याचा वसा पुढे नेत यंदा ३०० नवीन झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली आहे. या वृक्षलागवड मोहिमेचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ झाडे लावून न थांबता, लावलेल्या रोपांचे दैनंदिन संगोपन व संवर्धन करण्यावर फाउंडेशनचा विशेष भर असतो.…

    Read More »
  • राजकीय

    महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा गदारोळ: वंचित व काँग्रेस नगरसेवकांनी विषय पत्रिका हवेत उडवून केला सभात्याग

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड : ११ ऑगस्ट २६  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचे विषय घेतले जात नसल्याचा आणि शहरातील मूलभूत प्रश्नांवर बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस ववंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मोठा गोंधळ घातला. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीचा निषेध करत संतप्त नगरसेवकांनी चक्क विषय पत्रिका हवेत उडवून देत थेट सभात्याग केला. मंगळवारी सकाळी महापालिकेच्या इमारतीमधील कै. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दीपकसिंह रावत आणि नगरसचिव अजित पालसिंह संधू मंचावर उपस्थित होते. सभेचे कामकाज सुरू होताच वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. वंचित बहुजन आघाडीचे गटनेते इंजिनिअर प्रशांत इंगोले यांनी प्रशासनावर कडाडून टीका केली. विरोधीपक्षांच्या नगरसेवकांचे ठराव घेतले जात नाहीत, तसेच मूलभूत प्रश्नांवर सभागृहात नगरसेवकांना बोलू दिले जात नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्या अगोदर शहरातील मूलभूत प्रश्नांवर सभागृहात चर्चा करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. प्रशासना…

    Read More »
  • नो लँड सिडिंगच्या समस्येमुळे हजारो शेतकरी ‘पीएम किसान’ योजनेपासून वंचित.

    ▫️कृषी आणि महसूल विभागाच्या किचकट प्रक्रियेत शेतकरी अडचणीत. श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- ११ ऑगस्ट २६ मागील दोन ते तीन…

    Read More »
  • शैक्षणिक

    हणेगाव आश्रमशाळेत जेवणातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; भोजनाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

    ◽️चिकनच्या जेवणानंतर मळमळ व उलट्यांचा त्रास श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क देगलूर : १० ऑगस्ट २६ देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी (९ ऑगस्ट) रात्री जेवणातून तब्बल ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, सर्वांना उपचारासाठी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र याघटनेमुळे आश्रम शाळेतील भोजन व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हणेगाव येथील या निवासी आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांसाठी रात्रीच्या जेवणात चिकनचा बेत आखण्यात आला होता. मात्र, जेवण झाल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अनेक विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्री दहा वाजता सर्व ३२ बाधित…

    Read More »
  • क्राईम

    अवैध रेती माफियांवर पोलिसांची कारवाई: ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पण ‘ही’ कारवाई फक्त एका दिवसापुरतीच का?

    ◽️मात्र रात्रंदिवस धावणाऱ्या असंख्य बेकायदेशीर टिप्परकडे दुर्लक्ष का? जनतेतून संतप्त सवाल श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०९ ऑगस्ट २६  मुखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका हायवा टिप्परवर धडक कारवाईकरत तब्बल ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या कारवाईनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “त्या दिवशी संपूर्ण तालुक्यात केवळ एकच गाडी रेतीची वाहतूक करत होती का?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. रात्रंदिवस राजरोसपणे सुरू असलेल्या असंख्य अवैध टिप्परकडे डोळेझाक करून केवळ एका दिवसापुरती केलेली ही कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. सविस्तर वृत्त असे की, नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी नरसी ते मुखेड जाणाऱ्या रोडवर एका हायवा टिप्परमधून (क्र. MH-04-JU-0486) अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन अडवले आणि पाहणी केली असता, त्यामध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती…

    Read More »
  • क्राईम

    नांदेड भरदिवसा पेट्रोल पंपावर थरार: गँगवारमधून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

    ▫️धनेगाव परिसरात खळबळ; दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी आला असताना अज्ञातांचा हल्ला श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- ०८ ऑगस्ट २६  धनेगाव परिसरातील एका पेट्रोल पंपावर भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदर सिंग बावरी (वय ३२) असे या मृत तरुणाचे नाव असून, ही हत्यागँगवार मधून (टोळीयुद्ध) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि भरदिवसा हा थरार घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदर सिंग बावरी हा आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर आला होता. तो पंपावर असतानाच अचानक तिथे आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर थेट जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, यात गंभीर जखमी झालेल्या इंदर सिंग बावरी याचा जागीच मृत्यू झाला. मृत इंदर सिंग बावरी हा मूळचा कौठा परिसरातील रहिवासी होता. या हत्ये मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुन्या वैमनस्यातून आणि गँगवार…

    Read More »
  • सामाजिक

    जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावे यासाठी मुखेड अभिवक्ता संघाचे तहसिलदारांना निवेदन!

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : ०८ ऑगस्ट २६ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी दाखल केलेले अर्ज दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने नागरिकांना मोठ्या…

    Read More »
  • सामाजिक

    लेंडी प्रकल्पग्रस्तांचा शासनाला थेट इशारा: प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १८ ऑगस्टला घेणार जलसमाधी!

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- ०७ ऑगस्ट २६  लेंडी मध्यम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या हसनाळ आणि परिसरातील नागरिकांनी शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाला शेकडो निवेदने देऊनही पदरी निराशाच पडत असल्याने, मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या १८ ऑगस्ट २०२६ रोजी थेट धरणात ‘जलसमाधी’ घेण्याचा अल्टिमेटम प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. शासनाने “आधी पुनर्वसन, मग धरण” हे धोरण राबवणे बंधनकारक असतानाही, पुनर्वसन पूर्ण नकरताच धरणात पाणीसाठा (गळभरणी) करण्यास परवानगी कशी दिली? याची स्वतंत्र व निष्पक्ष…

    Read More »
  • राजकीय

    संजय गांधी, श्रावणबाळ व दिव्यांग योजनांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करा! :- मुखेड काँग्रेसची मागणी

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ७ ऑगस्ट २६ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजनांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासनाने तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मुखेड तालुका आणि शहरकाँग्रेस कमिटीच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी आणि मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सर्वसामान्यांना आणि गरजूंना आर्थिक आधार देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या योजनांचे अनेक प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. यामुळे वृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना अनुदाना पासून वंचित राहावे लागत असून, त्यांना नाहक आर्थिक वमानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन प्रलंबित प्रस्तावांची लवकरात लवकर छाननी करावी आणि ते मंजूर करावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देते वेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, ओबीसी नेते विश्वनाथराव कोलमकर, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील आरगीळे, ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष एम. आर. गोपणर आणि राजुभाऊ बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.…

    Read More »
  • सामाजिक

    हृदयद्रावक! बियाण्यांसाठी ठेवलेले कीटकनाशक ठरले काळ; विषारी प्रभावाने दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क धर्माबाद :- ०६ ऑगस्ट २६  हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून घरात साठवून ठेवलेल्या कीटकनाशकाच्या विषारी…

    Read More »
Back to top button