Sharmik Ekta

  • राजकीय

    जीर्ण अंगणवाड्यांच्या जागी नवीन इमारती मंजूर करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नायगाव ०६ ऑगस्ट २६ मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून तेथील जीर्ण झालेल्या इमारतींच्या जागी नवीन इमारती मंजूर कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नायगावचे गट विकास अधिकारी. वानखेडे यांना निवेदन दिले. यासोबतच, तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेले हप्ते व बिले तात्काळ त्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावीत, अशीही मागणी पांडुरंग शिंदे यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी वानखेडे यांच्याकडे लावून धरली. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, व्यंकट अण्णा शिंदे, विश्नभर शिंदे, मधुकर शिंदे, गणेश वाघमारे, रोहिदास नव्हारे आणि काशिनाथ बाळापुरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Read More »
  • राजकीय

    युवा शक्तीच्या जोरावरच ‘रासप’ राज्यात मोठी ताकद बनेल: युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील

    ▫️रासपची युवा संवाद बैठक संपन्न; आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबुतीचा एकमुखी संकल्प श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- ०५ ऑगस्ट २६…

    Read More »
  • राजकीय

    शेतकरी नेते राकेश टिकैत ५ ऑगस्टला नांदेडमध्ये; ‘भारत-अमेरिका व्यापारी करारावर’ करणार मार्गदर्शन

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ०४ ऑगस्ट २६ संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राष्ट्रीय नेते. राकेश टिकैत हे ५ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, ते एका विशेष शेतकरी मेळाव्यात भारत–अमेरिका व्यापारी करारा बाबत (ट्रेड डील) मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा शहरातील शंकरराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. देशभरात सध्या ‘भारत–अमेरिका ट्रेड डील‘बाबत मोठी चर्चा सुरू असून, या कराराचे देशावर आणि विशेषतः शेती क्षेत्रावर काय परिणाम होतील, याविषयी जनजागृती करण्यासाठी राकेश टिकैत हे संपूर्ण देशभरात मोहीम राबवत आहेत. या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये या विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड ‘महिला बाल कल्याण’ प्रकल्प कार्यालयाचीच दुरवस्था: गळके छत, चिखलाचे साम्राज्य आणिशौचालया अभावी महिलांची कुचंबणा!

    ▫️गळके छत आणि कार्यालयात बादल्या ठेवण्याची वेळ श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :-३ ऑगस्ट २६ एकीकडे शासन ‘स्वच्छ भारत‘, ‘महिला सन्मान‘ आणि सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारते, तर दुसरीकडे महिलांच्या हितासाठीच स्थापन झालेल्या ‘महिला बाल कल्याण विभागा‘च्या मुखेड प्रकल्पकार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कार्यालयाला गळती लागली आहे, जाण्यासाठी धड रस्ता नाही आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे कार्यालयात साधं शौचालय नसल्याने शेकडो अंगणवाडी सेविका आणि महिला कर्मचाऱ्यांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर बसावे लागतआहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचे आणि दुरवस्थेचे विदारक वास्तव छाया चित्रांमधून समोर आले…

    Read More »
  • शहर

    वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी नांदेडमध्ये राज्यस्तरीय सत्कार सोहळा 

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड: ०१ ऑगस्ट २६ वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ, नांदेड यांच्या वतीने वैश्य समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच NEET, CET 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘राज्यस्तरीय सत्कार सोहळा‘ रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वासवी मंगल कार्यालय, सिडको, नांदेड येथे आयोजितकरण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर नागरी सहकारी बँक, नांदेडचे माजी अध्यक्ष मा. एकनाथराव मामडेहे उपस्थित राहणार आहेत. तसेच, विशेष अतिथी म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. शहाजी उमाप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जलसंधारण अधिकारी (वर्ग १) मा. तेजस चिखलीकर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्य वैश्य महासभा महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, नांदेडमर्चंट बँकेचे अध्यक्ष दिलीपभाऊ कंदकुर्ते, नांदेड जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमारमुक्कावार, जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजयनलबलवार, मा. जि.प. सदस्य बालाजी बच्चेवार, नगरेश्वर मंदिराचे अध्यक्ष भागवत गंगमवार, सचिवसुरेश कोटगिरे, माजी अध्यक्ष सुभाष कन्नावार, प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम मेडेवार, काशी अन्न सत्रमतिरुपतीचे उपाध्यक्ष साईनाथ मेडेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गजानन पांपटवारआणि आर्यवैश्य महासभेचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कोकडवार यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्कार कार्यक्रमानंतर लगेचच सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ, नांदेड यांच्या वतीने देण्यात आली आहे.

    Read More »
  • शैक्षणिक

    शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार! मसलगा जि. प. शाळेची छत गळती; विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मसलगा/कंधार) :३० जुलै २६  कंधार तालुक्यातील मसलगा येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसाचे…

    Read More »
  • सामाजिक

    फुलवळ नदीच्या पुलावर दुचाकीचा भीषण अपघात; नगारवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क फुलवळ/कंधार: ३० जुलै २६ कंधार तालुक्यातील फुलवळ येथील नदीच्या पुलावर आज एक अत्यंत भीषण अपघात झाला.…

    Read More »
  • सामाजिक

    शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त नांदेडमध्ये शांतता समितीची बैठक; शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे आवाहन

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ३० जुलै २६ शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नांदेड शहरात आयोजित विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांसाठी शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहाचे वातावरण सुनिश्चित करण्याकरिता मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन हॉलमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी भूषवले. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर) रामेश्वर वांजणे, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी, नांदेड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तगिरीश कदम, समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध सरकारी विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, सामाजिक संघटनांचे अधिकारी, अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समित्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेला संबोधित करताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेऊन, जयंती सोहळा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात साजरा केला पाहिजे. त्यांनी सर्व आयोजक आणि नागरिकांना आवाहन केले की, कायदा…

    Read More »
  • सामाजिक

    सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प! रोटरी क्लब मुखेड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.

    डॉ. श्रीहरी बुडगेमवार अध्यक्ष तर पवन पोतदार सचिवपदी श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : २९ जुलै २६ मुखेड येथे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या ‘रोटरी क्लब मुखेड सिटी‘चानवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच शाही थाटात आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी नूतन अध्यक्षपदाची तर पवनपोतदार यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली, ज्यातून क्लबचापर्यावरणाप्रती असलेला दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.…

    Read More »
  • सामाजिक

    रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीहरी बुडगेमवार; आज पदग्रहण सोहळा

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २८ जुलै २६ ‘रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटी’च्या नूतन कार्यकारिणीचा (वर्ष २०२६-२७) पदग्रहण सोहळा आज,…

    Read More »
Back to top button