Sharmik Ekta

  • राजकीय

    वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुखेडमध्ये समविचारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीचे आयोजन

    ▫️सोनम वांगचुक मृत्यूशी झुंज देतायत, मात्र सरकार बघ्याच्या भूमिकेत!  ▫️आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १६…

    Read More »
  • सामाजिक

    लातूर रोड-जळकोट-मुखेड-बिलोली-बोधन रेल्वेचा प्रश्न ऐरणीवर; विधिमंडळात आवाज उठवण्याची आमदारांकडून अपेक्षा

    ▫️विकासासाठी रेल्वे आवश्यक! आमची मागणी – रेल्वे द्या, विकास घडवा! श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड १५ जुलै २६ :  लातूर रोड–जळकोट–मुखेड–बिलोली–बोधन या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाची मागणी आता पुन्हा एकदा जोरधरत आहे. परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रेल्वेचा प्रश्न आगामी विधिमंडळअधिवेशनात उपस्थित केला जावा, अशी तीव्र अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.…

    Read More »
  • सामाजिक

    उदगीरमध्ये पावसासाठी साकडे: ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांनी अदा केली ‘नमाज-ए-इस्तिस्का’

    ▫️पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह नागरिक चिंतेत; वरुणराजाच्या कृपेसाठी अल्लाहकडे विशेष दुवा श्रमिक एकता न्यूज नेटवर्क उदगीर:- १५ jule पावसाळ्याचे दिवस सुरू होऊनही उदगीर शहर आणि परिसरात अद्याप समाधानकारक पाऊसन झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या कठीण…

    Read More »
  • क्राईम

    मुखेड पोलिसांची मोठी कारवाई: ३५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध वाळू आणि गुटखा माफियांवर धडक कारवाई

    ▫️३५ लाखांचा मुद्देमाल जप्त: पो.उप.नि. अभिजीत तुतूरवाड यांच्या माहितीवरून गुटख्यावर छापा, तर हायवा टिप्परही पकडला. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १२…

    Read More »
  • देश-विदेश

    पर्यटक बोट उलटली: १५ भारतीयांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नवी दिल्ली: ११ जुलै २६  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिएतनाममध्ये झालेल्या…

    Read More »
  • क्राईम

    मुखेडमध्ये शेतकऱ्याची फसवणूक: ‘सफल गोल्ड’चे बियाणे बोगस? कृषी विभागाकडून पंचनाम्यास टाळाटाळ

    ▫️एकीकडे पावसाची दडी, त्यात बोगस बियाण्यांचा फटका! चांडोळा येथील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचेसंकट श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- १० जुलै २६ पावसाच्या लपंडावामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या माथी आता बोगस बियाणे मारलेजात असल्याचा संतापजनक प्रकार मुखेड तालुक्यात उघडकीस आला आहे. तालुक्यातील चांडोळा येथे तब्बल दोन एकरांवर (८० आर) पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यावर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाकडे तक्रार करूनही पंचनाम्यासाठी चालढकल होत असल्याने शेतकऱ्याने आता थेट ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे. नेमका प्रकार काय? चांडोळा येथील शेतकरी हनिफाबी निजामोद्दीन यांच्या मालकीच्या गट क्र. ९२१ मध्ये एकूण १ हेक्टर ७४ आर जमीन आहे. यापैकी ८० आर (दोन एकर) क्षेत्रात त्यांनी ३० जून रोजीमोठ्या आशेने ‘३३५ सफल गोल्ड‘ या कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. मात्र, पेरणीला बरेच दिवस उलटूनही शेतात केवळ १० टक्केच बियाणे उगवले, तर ९० टक्के बियाणे मातीतच कुजूनगेले. या बोगस बियाण्यांमुळे ऐन खरीप हंगामात शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या फसवणुकीबाबत शेतकऱ्याच्या वतीने शेख चांदपाशा निजामोद्दीन यांनी मुखेड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि संबंधित बियाणे विक्रेत्या कृषी सेवा केंद्राकडे रीतसर तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार देऊनही कृषी विभागाचे कर्मचारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ आणि विलंबकरत आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शेतकरी आणखीच चिंतेत सापडला आहे.…

    Read More »
  • सामाजिक

    भ्रष्टाचाराचा प्रताप! अवघ्या वर्षभरातच नांदेड-नागपूर-तुळजापूर महामार्ग खचला; उड्डाणपुलाचा भाग कोसळून निष्पापांचा जीव धोक्यात.

    ▫️विष्णुपुरीतील भीषण अपघातात दोन मुली गंभीर जखमी; निकृष्ट कामामुळे एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती! श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड | ०९ जुलै २०२६ विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा एक भयंकर चेहरा आज नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. केवळ एका वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालेल्या नांदेड–नागपूर–तुळजापूर महामार्गाचा आणि विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा काही भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. याभीषण अपघातात दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून, एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विष्णुपुरी जवळील श्री गुरुवंशी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अचानक रस्ता खचला आणि पुलाचा बाजूचा भाग कोसळला त्यामुळे…

    Read More »
  • सामाजिक

    मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचा थरार! हिंगोली, नांदेडसह परभणीत सलग तीन धक्के

    ▫️हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील ‘शिरली’ गाव; नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ०९ जुलै २६ हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना ९ जुलै २६  मध्यरात्री भूकंपाच्या सलग तीन धक्क्यांनी हादरवून सोडले. मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असताना अचानक जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली होती. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली या गावात होता. पहिला आणि सर्वाधिक तीव्रतेचा धक्का मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटांनी जाणवला, ज्याची रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंद झाली. त्यानंतर काही वेळातच, पहाटे २:१५आणि २:१७ वाजता अनुक्रमे ३.६ आणि ३.९ तीव्रतेचे आणखी दोन सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्रीच्या वेळेस बहुतांश नागरिक झोपेत असताना हे धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक असे तीनधक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवूनअसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी. राहुल कर्डिले यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलेआहे. भूकंपाची पूर्वकल्पना मिळणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसते, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवतानागरिकांनी पूर्णपणे सतर्क राहावे. तसेच, पुन्हा असे धक्के जाणवल्यास तात्काळ घराबाहेर पडूनसुरक्षित आणि मोकळ्या जागेत थांबावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

    Read More »
  • सामाजिक

    नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती; एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

    श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, नांदेड ०७ जुलै २६ जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR – २०२६) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, तसेच एकही अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. तसेच, या मोहिमेच्या प्रभाव  अंमलबजावणीसाठी माध्यमांनी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित ही मोहीम राबवली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण २७ लाख ७७ हजार ०७३ मतदारांच्या माहितीची अचूक पडताळणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ३०८८ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO प्रत्येक घरी…

    Read More »
  • सामाजिक

    टिईटी परीक्षा घोटाळ्यांविरोधात नांदेडमध्ये एसएफआयचे आंदोलन

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड : ०६ जुलै २६ ‘नीट’ व ‘टीईटी’ परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ एसएफआय जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी…

    Read More »
Back to top button