Sharmik Ekta
-
सामाजिक
मुखेड दुयम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; जादा पैसे घेतल्याशिवाय खरेदीखत होईना!
▫️पैसे न दिल्यास खोट्या त्रुटींचा बाऊ; पैशांची मागणी पूर्ण होताच खरेदीखत तत्काळ! श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड ०४ जुलै २६ खरेदी खत करण्यासाठी नियमा…
Read More » -
सामाजिक
मुखेडच्या पीएमश्री शाळेसमोर अस्वच्छतेचे साम्राज्य; राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाची कारवाईला बगल.
▫️शाळेच्या दारात मटणाची दुकाने, आजी माजी नगरसेवक व नेत्यांना मिळतोय भाड्याचा मलिदा ▫️१३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम; उपोषणाचा इशारा श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड ०३ जुलै २६ शहरातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल‘च्या परिसरात सध्या अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शाळेच्या आवारात चिकन–मटनच्या दुकानांमुळे…
Read More » -
सामाजिक
संजीव डोईबळे यांना रोटरी फाउंडेशनचा मानाचा ‘पॉल हॅरिस फेलो’ (PHF) सन्मान
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड ०२ जुलै २६ रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीचे सदस्य रोटेरियन संजीव डोईबळे यांना रोटरी फाउंडेशनतर्फे…
Read More » -
शहर
मुखेड येथील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते शेख रजाक यांचे दुःखद निधन; आज सायंकाळी होणार अंत्यविधी
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०१ जुलै २६ भारतीय जनता पक्षाचे अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मुखेड येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व शेख रजाक उर्फ पाशा पटेल यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मुखेड परिसरातील भाजप कार्यकर्ते आणि व्यावसायिक वर्गात मोठी शोककळा पसरली आहे. शेख रजाक हे गेल्या अनेक वर्षांपासून मुखेड पंचायत समिती परिसर येथे चहा–पाण्याचा व्यवसाय करत होते. आपल्या कष्टाळू, मनमिळाऊ आणि प्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांशी आणि प्रशासकीय वर्गाशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी नेहमीच सक्रिय योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, ३ मुली आणि १ मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मरहूम शेख रजाक यांच्यावर आज (बुधवार) बाद…
Read More » -
शहर
नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत मोठी चुरस; संचालक पदासाठी मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह दिग्गजांची उडी!
▫️आमदारांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींची उडी; उमेदवारांच्या यादीत उद्या आणखी बड्या नावांची भर पडणार? ▫️२३ जागांसाठी आतापर्यंत ८० अर्ज दाखल; २६ जुलैला…
Read More » -
सामाजिक
माझ्या लेकाला वाचवा!’ म्हणत ६४ वर्षांच्या आईने दिली स्वतःची किडनी
▫️या माऊलीने दाखवलेल्या हिमतीला, त्यागाला आणि ममतेला आज सर्वत्र सलाम केला जात आहे. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- २९ जून २६ जगात आईची माया सर्वात श्रेष्ठ मानली जाते. या मातृत्वाची आणि अथांग प्रेमाची प्रचिती मुखेड तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. एका ६४ वर्षीय माऊलीने मृत्यूच्या दाढेत असलेल्या आपल्या ३० वर्षीय मुलाला स्वतःची किडनी दान करून अक्षरशः पुनर्जन्म दिला आहे. कमलबाई रामकांत शिंदे असे या धाडसी आणि प्रेमळ मातेचे नाव आहे. मुक्रमाबाद सेवा सहकारी सोसायटीचे माजी संचालक रमाकांत पा. शिंदे यांचा मुलगा उमेश (वय ३०) याची प्रकृती काही दिवसां पासून बरी नव्हती त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय तपासणी अंती उमेशच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाच्या आजाराची ही धक्कादायक बातमी जेव्हा ६४ वर्षीय आई कमलबाई यांना समजली, तेव्हा त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, क्षणाचाही विलंब न लावता स्वतःची किडनी मुलाला देण्याचा धाडसी निर्णय घेतला.…
Read More » -
सामाजिक
९१ मुखेड विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम; अचूक मतदार यादीसाठी BLA-2 ची भूमिका महत्त्वाची – अनुप पाटील
▫️ ३० जून ते २९ जुलै दरम्यान BLO घरोघरी जाऊन करणार मतदार नोंदणी; राजकीय पक्षांच्या BLA-2 चीतहसील कार्यालयात बैठक संपन्न. मुखेड श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (२०२६) जाहीर केला आहे. या अनुषंगाने ९१ मुखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या अचूक करण्यासाठी राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या BLA-2 (Booth Level Agent) यांचीभूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मतदार नोंदणी अधिकारी अनुप पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी २७ जून २०२६ रोजी मुखेड तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्याBLA-2 ची विशेष बैठक पार पडली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दिनांक ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ९१मुखेड विधानसभा मतदारसंघातील ३६६ केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) घरोघरी भेटी देणार आहेत. याभेटीदरम्यान ते मतदारांना ‘Enumeration Form’ (परिगणन नमुना) वाटप करून ते भरून घेण्याचेकाम करणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि BLO सोबत समन्वय ठेवण्यासाठी विविधराजकीय पक्षांनी आपले BLA-2 नियुक्त केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीने ३६६, भारतीयराष्ट्रीय काँग्रेसने २८२, शिवसेनेने २६३ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने २२३ BLA-2 नियुक्त केले आहेत. तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीत, SIR कार्यक्रमात BLO आणि BLA-02 यांची नेमकीजबाबदारी काय असेल, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील एकही पात्र मतदारयादीतून वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट होऊ नये, यासाठीBLA-02 यांनी दक्ष राहावे. तसेच, तात्पुरत्या स्वरूपात बाहेरगावी स्थलांतरित असलेल्या मतदारांमध्येजनजागृती करून त्यांचेही ‘Enumeration Form’ भरून घेण्याचे आवाहन अनुप पाटील यांनी याप्रसंगीकेले. या महत्त्वपूर्ण बैठकीला राजकीय पक्षांच्या वतीने भाजपचे BLA-01 शिवाजी राठोड आणि शिवसेनेचेबालाजी पाटील कबनुरकर उपस्थित होते. तसेच, प्रशासनाच्या वतीने निवडणूक नायब तहसीलदारसतीश जोहरे, महसूल सहाय्यक संदीप भुरे, लिपिक सुनील कुलकर्णी, डाटा एंट्री ऑपरेटर बबलू आतार, दफेदार गोपीनाथ पिंगळे आणि गणेश बंडे आदींची उपस्थिती होती.
Read More » -
क्राईम
मुखेड महसूल विभागातील ‘नशाबहाद्दर’ टीमचा हैदोस! मद्यधुंद अवस्थेत वाहनधारकांकडून अवैध वसुली
▫️कार्यक्षेत्राबाहेर जाऊन पैशांची मागणी; अश्लील शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल! श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड २७ जून २६ मुखेड तालुक्यात…
Read More » -
संपादकीय
मोहर्रम, ताजिया आणि पडदा – श्रद्धेच्या नावावर शरियतशी तडजोड कुठवर?
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- २६ जून २६ मोहर्रमचा महिना हा इस्लामच्या इतिहासातील अत्यंत पवित्र आणि दुःखाचा महिना मानला जातो. हा महिना इमाम हुसैन आणि त्यांच्या ७२ निष्ठावान साथीदारांच्या अजोड हौतात्म्याची आठवण करून देतो. हे बलिदान संयम, सत्य, न्याय आणि इस्लामी तत्त्वांच्या रक्षणासाठी होते. पण आजच्या काळात, जेव्हा आपण रस्त्यांवर मोहर्रम किंवा ताजियांच्या मिरवणुका पाहतो, तेव्हा एक मोठा आणि अस्वस्थ करणारा विरोधाभास दिसून येतो. श्रद्धेच्या नावावर जे काही घडत आहे, ते खरोखरच इस्लामी शिकवणीच्या चौकटीत बसते का? हा प्रश्न आज प्रत्येक विचारशील मुस्लिमाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. नुकतेच मध्य प्रदेशातील मंदसौर सारख्या शहरांमध्ये (आणि आता इतरत्रही) असे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे की, महिला आणि तरुण मुली ताजिया पाहण्याच्या नावाखाली, नटून–थटून, बुरख्या शिवाय(बेपर्दा) रस्त्यांवर फिरत आहेत. या पवित्र आणि गंभीर दिवसाला एका ‘छंद‘ किंवा ‘जत्रेचे‘ स्वरूप प्राप्त झाले आहे. हे इस्लामी शरियत आणि कर्बलाच्या मूळ संदेशाच्या अगदी विरुद्ध आहे. कर्बलाची घटना केवळ तलवारींची आणि सत्तेची लढाई नव्हती; ती धर्माच्या (दीन) तत्त्वांना वाचवण्याची लढाई होती. या ऐतिहासिक युद्धात इमाम हुसैन यांच्या सोबत त्यांच्या घरातील महिलाही उपस्थित होत्या. कर्बलाचा इतिहास साक्ष देतो की, जेव्हा इमाम हुसैन यांचे तंबू जाळण्यात आले आणि महिलांना बंदी…
Read More » -
क्राईम
सत्तेचा माज! खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना भररस्त्यात जीवे मारण्याची धमकी; पोलिसांसमोरच उघड गुंडगिरी
▫️प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भाई आसद बल्खी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले पत्र!…
Read More »