Sharmik Ekta

  • राजकीय

    ओबीसी जनगणनेसाठी मुखेडमध्ये एल्गार! २३ एप्रिलच्या ‘भारत बंद’साठी बामसेफ सज्ज

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०१ एप्रिल २६ देशातील ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या वतीने आरपारची लढाई लढली जाणार आहे. मा. वामन मेश्राम यांच्या…

    Read More »
  • सामाजिक

    “पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ निखळला!; ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे अपघाती निधन.”

    नांदेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ३१ मार्च २६ समाजप्रबोधनाचे शस्त्र हाती घेऊन जाती–पातीच्या भिंती तोडण्यासाठी आयुष्य वेचणारे, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि थोर विचारवंत ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकरयांचे आज मंगळवारी नांदेड शहरात झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर आणि पुरोगामी चळवळीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर भागात सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मधुकर महाराज हे आपल्या कामासाठी जात असताना MH 26 CH 4386 क्रमांकाच्या भरधाव टिपरने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महाराजांचाजागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. मधुकर महाराज बारुळकर हे केवळ एक कीर्तनकार नव्हते, तर ते एक प्रखर समाजसुधारक होते. आपल्या ओघवत्या भाषणातून समाज, राजकारण आणि दैनंदिन जीवनातील विसंगतीवर ते मार्मिक बोटठेवत असत. सर्वसमावेशक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली. त्यांच्या जाण्याने “पुरोगामी विचारांचा एक अनमोल हिरा” हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.…

    Read More »
  • सामाजिक

    नांदेड जिल्ह्याला चार दिवस ‘यलो अलर्ट’; विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता!

    नांदेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़. 30 मार्च २६ प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३० व ३१ मार्च २०२६ तसेच १ व ३ एप्रिल २०२६ या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिकशक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारीघ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असालआणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोकेघालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युतउपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. या गोष्टी…

    Read More »
  • क्राईम

    सावधान! ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा: मुंबईतील तरुणीला ३२ लाखांचा गंडा; नांदेडचे ४ तरुण अटकेत

    नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ३० मार्च २६ डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईतील २१ वर्षीय तरुणीला दहशतवादाशी संबंध असल्याची भीती दाखवून…

    Read More »
  • सामाजिक

    बीएलओचे अथक परिश्रम: मुखेडमध्ये ७८% ‘मॅपिंग’ पूर्ण; उर्वरित २२% मतदारांनी तातडीने नोंदणी करा.

    ▫️ उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांचे आवाहन मुखेड (प्रतिनिधी):  श्रमिक एकता न्यूज़ ३० मार्च २६ भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात एप्रिल २०२६ मध्येमतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, ९१–मुखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपल्या सध्याच्या मतदार यादीतील नावाची, सन२००२ मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अंतिम यादीतील नावाशी ‘मॅपिंग’ (Mapping)करून घ्यावी, असे आवाहन देगलूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अनुप पाटील यांनी केले आहे. मुखेड विधानसभा मतदारसंघात एकूण ३६६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त करण्यातआले आहेत. या कामासाठी बीएलओना त्यांच्या मूळ कर्तव्यातून २४ दिवसांची सुटी देण्यात आली असून, त्यांनी आतापर्यंत ७८ टक्के मतदारांच्या नावाचे मॅपिंग पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप २२ टक्के मतदारांचेकाम प्रलंबित आहे.…

    Read More »
  • सामाजिक

    पत्रकार मोहम्मद रफीक यांना ‘न्याय चक्र’ पुरस्कार जाहीर; उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान

    नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २८ मार्च २६  पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड येथील पत्रकार मोहम्मद रफीक मोहम्मद खाजामिया यांना यावर्षीचा प्रतिष्ठित ‘न्याय चक्र पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. उद्या, रविवार दिनांक २९ मार्च रोजी एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोहम्मद रफीक यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सतत संघर्ष केला आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील निस्पृह योगदानाची दखल घेऊन ‘लोक जनजागृती बहुउद्देशीय…

    Read More »
  • क्राईम

    नांदेड जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; बातमी छापल्याच्या रागातून पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पाच जण अटकेत

    अर्धापूर (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २८ मार्च २६ सत्य बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून एका पत्रकाराला धक्काबुक्की करून, त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या अर्धापूर पोलिसांनी आवळल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे समजते. नेमकी घटना काय? आंबेगाव (ता. अर्धापूर) येथील रहिवासी आणि ‘दैनिक श्रमिक लोकराज्य‘चे प्रतिनिधी रामचंद्र ऊर्फ मनोज माणिकराव मनपुर्वे यांनी २५ मार्च २०२६ रोजी एक धाडसी बातमी प्रसिद्ध केली होती. “लहानगावात भोंगा–डीजे बंदीचा निर्णय, पण अवैध दारूवर गावकऱ्यांचा रोष कायम“ अशा मथळ्याखाली हीबातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते.…

    Read More »
  • शहर

    दु:खद: माजी उपनगराध्यक्षा शाहजहान बेगम पठाण यांचे निधन

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २७ मार्च २६  माजी उपनगराध्यक्षा शाहजहान बेगम पठाण यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून, एका कर्तृत्ववान महिला नेतृत्वाला आपण मुकलो असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्या माजी नगरसेवक नासरखा पठाण आणि सामाजिक कार्यकर्ते अनवर पठाण यांच्या मातोश्री होत. आपल्या कार्यकाळात त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले होते. जनसामान्यांच्या प्रश्नांचीजाण असलेल्या आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळखहोती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर नमाजे जनाजा रात्री  १०…

    Read More »
  • शैक्षणिक

    आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास शाळांवर होणार कारवाई; राज्य सरकारचा मोठा निर्णय

    मुंबई: श्रमिक एकता न्यूज़ २५ मार्च २६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क, पुस्तके, गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने सर्व शाळांना दिले आहेत. अनेक खासगी शाळा आरटीई अंतर्गत प्रवेश देऊनही पालकांकडे विविध शुल्काची मागणी करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. शासनाच्या या आदेशामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण आता खऱ्या अर्थाने मोफत होणार आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या संदर्भात शाळांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेआहेत. “आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे नियमानुसार मोफत शिक्षणास पात्र आहेत. जर एखादी शाळा या विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेश किंवा इतर कोणत्याही साहित्यासाठी पैशांची मागणी करत असेल, तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही. ज्या शाळा पालकांकडून…

    Read More »
  • सामाजिक

    बेटमोगऱ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर: श्री सिद्धदयाल महाराजांनी अदा केली ईदची नमाज!

    मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज २३ मार्च २०२६  संपूर्ण देशात रमजान ईदचा उत्साह असताना, मुखेड तालुक्यातील बेटमोगरा या गावाने समाजा समोर जातीय सलोख्याचे आणि हिंदू–मुस्लिम ऐक्याचे एक अनोखे उदाहरण मांडले आहे. बेटमोगरा येथील प्रसिद्ध शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे प्रमुख पुजारी, परमपूज्य श्री सिद्धदयाल…

    Read More »
Back to top button