Sharmik Ekta

  • सामाजिक

    मुखेडचे माजी नगराध्यक्ष द्वारकादास जाजू यांचे निधन

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ दि १२ मार्च २६ मुखेड येथील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष द्वारकादास जाजू यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन…

    Read More »
  • संपादकीय

    मी एक सच्चा भारतीय मुसलमान

    मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ १२ मार्च २६ भारत ही केवळ एक जमीन नाही, तर ती आपल्या सर्वांची आई आहे.…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड मानवता विचार मंचाची नवीन कार्यकारिणी जाहीर 

    ▫️अध्यक्षपदी सदाशिव पाटील जाधव तर सचिवपदी पवनशेठ पोद्दार यांची बिनविरोध निवड मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६ शहरात सामाजिक कार्याला बळ देण्याच्या उद्देशाने मानवता विचार मंचाची महत्त्वपूर्ण बैठक सं. स. मस्कले सर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीत मानवता विचारमंचाच्या नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पाटील जाधव यांची मानवता विचार मंचाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थित सदस्यांनी स्वागतकरत पुढील काळात सामाजिक, व जनहिताच्या उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी संजय सावकार मुक्कावार, सचिवपदी पवनशेठ पोद्दार तर कोषाध्यक्षपदी एस. आर. करखेलवार यांची निवड करण्यात आली.…

    Read More »
  • सामाजिक

    ३८ वर्षांचा वनवास संपता संपेना, शासनाकडून घोषणांचा  पाऊस; लेंडी धरणग्रस्तासाठी मात्र दुष्काळ ! – जैनोदीन पटेल

    मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६: – महाराष्ट्र व तेलंगाना सुयक्त विद्यमाने ३८ वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यात हारीत क्रांती…

    Read More »
  • क्राईम

    “कलेक्टरांची कारवाई नांदेड शहरपुरतीच का? मुखेडमध्ये रेती माफियांना प्रशासनाचे अभय!”

    ▫️“तक्रारी, बातम्या सगळे व्यर्थ; मुखेडमध्ये रेती माफिया बेधडक” मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ११ मार्च २६ नांदेड जिल्ह्यात अवैध रेती तस्करीवर जिल्हाधिकारी यांनी शहरात कडक कारवाई सुरू केली असली, तरी मुखेड तालुक्यात मात्र रेती माफियांना जणू मोकळे रान मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज तब्बल ३० ते ४० हायवा गाड्या अवैध रेती घेऊन थेट तहसील…

    Read More »
  • शहर

    रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कबरस्तानची स्वच्छता करा; भाई आसद बल्खी यांची नगर परिषदेकडे मागणी”

    मुखेड : पवित्र रमजान महिन्याचा शेवट आणि ईदुल फितरचा सण जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक कबरस्तानची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेकाप राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वत्यांच्यासाठी प्रार्थना (दुआ) करण्यासाठी कबरस्तानमध्ये जातात. मात्र, सध्या अनेक ठिकाणच्याकबरस्तानमध्ये लाईट नसल्याने व मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना तिथे वावरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्वच्छता आणि सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याची गरज या संदर्भात बोलताना भाई आसद बल्खी म्हणाले की,…

    Read More »
  • शैक्षणिक

    हायकोर्टाचा मोठा दिलासा! आरटीई प्रवेशाला मुदतवाढ, जुन्याच नियमांनुसार प्रक्रिया

    मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्थात आरटीई द्वारे शाळा प्रवेशासाठी १ किमीच्या अटीला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली असून पूर्वीच्या नियमांप्रमाणेच प्रवेश देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. आज आरटीई अंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख होती. सरकारनं यंदा या कायद्यात नवी नियमावली लागू करत पूर्वीच्या ३ किमी ऐवजी १ किमीच्या परिसरातीलच शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल असे आदेश काढले होते. याविरोधात पालकांनी तीव्र विरोध केला, त्याअनुषंगानं नागपूरच्या खंडपीठात याविरोधात याचिका देखील झाल्या. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत काल खंडपीठानं या १ किमीच्या अटीला स्थगिती दिली. ‏दरम्यान, आजच्या सुनावणीत खंडपीठानं आजची प्रवेशाची शेवटची तारीखही पुढे ढकलली. तसंचआरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर १ किमीचा नियम काढून पूर्वीप्रमाणे ३ किमीचा नियम अपडेट करण्यासाठी १२ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवर हे अपडेशन झाल्यानंतरच आरटीई अंतर्गत ऑनलाईन नोंदणीच्या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सरकारने जाहीर करावा, असे आदेश नागपूरखंडपीठानं दिले आहेत. यामुळं १ किमीच्या अटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना शाळा उपलब्ध नसल्यानं नोंदणी होऊ शकली नाही अशा लाखो विद्यार्थ्यांना यामुळं दिलासा मिळाला आहे. आरटीई अंतर्गत एक किलोमीटरच्या अटी विरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अॅड. दीपकचटप, अॅड. बोधी रामटेके यांच्यासह आशिष फुलझेले आणि अनिकेत कुत्तरमरे यांनी दोन वेगवेगळ्या…

    Read More »
  • क्राईम

    ZP शाळेत धक्कादायक प्रकार: नराधम शिक्षकाकडून ५ चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

    मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६ भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ज्या शिक्षकावर मुलांच्या भविष्याची जबाबदारी असते, त्याच शिक्षकाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पवनी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्याच शाळेतील पाच लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे. एका पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. अनिल राऊत असं अटक केलेल्या नराधम शिक्षकाचं नाव आहे. तो मागील पाच वर्षांपासून पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने याच शाळेतीलपाच निष्पाप मुलींसोबत अश्लील आणि लैंगिक कृत्य केलं. इतकेच नाही, तर या कृत्याबाबत कुणालाकाहीही सांगितल्यास ‘जीवे मारण्याची धमकी‘ देऊन त्याने मुलींना घाबरवलं होत  आरोपीच्या या कृत्यामुळे मुली प्रचंड दहशतीखाली होत्या. मात्र, अत्याचार सहन न झाल्याने अखेर एका पीडित मुलीने आपल्या पालकांकडे धाडसाने सर्व हकीकत सांगितली. आपल्या मुलीसोबत घडलेला हाप्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. याबाबत अधिक चौकशी केली असता नराधमाने अशाप्रकारे शाळेतील इतर मुलींचं देखील शोषण केल्याचं समोरआलं. या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळा गाठून आरोपी शिक्षक अनिल राऊतयाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर तात्काळ पवनी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शाळेत धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी अनिल राऊत याच्यावर बाल लैंगिकअत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो – POCSO) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेडमध्ये RTE प्रवेशाचा बाजार? ‘पैसे द्या आणि प्रवेश मिळवा’ची पालकांमध्ये चर्चा; प्रशासनाचे दुर्लक्ष

    ▫️RTE प्रवेश प्रकरणात नांदेड शिक्षण विभागातून कनेक्शन असल्याची चर्चा मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १० मार्च २६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी सध्या पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. मात्र, मुखेड शहरासह परिसरात ‘पैसे देऊन काम होत असल्याच्या‘ चर्चांनी जोर धरला असून, यामुळे सर्वसामान्य आणि गरजू पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमका…

    Read More »
  • सामाजिक

    श्रमिक एकता न्यूजचा दणका! रस्त्यावर वाहणाऱ्या घाण पाण्याचा प्रश्न सुटला; मुख्याधिकारी जाधव यांची तात्काळ कारवाई

    मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज दि १० मार्च २६ येथील प्रभाग क्रमांक ९ मधील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यातील घाण…

    Read More »
Back to top button