Sharmik Ekta
-
सामाजिक
लातूरच्या बालकलाकाराची किमया; सहावीच्या सलमान शेखने साकारले छत्रपती शिवरायांचे विलोभनीय चित्र
मुखेड प्रतिनिधी:- ९ मार्च २६ लातूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयाचा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी सलमान शेख याने आपल्याकुंचल्याच्या जादूने शिवरायांचे एक अप्रतिम रूप कागदावर उतरवले आहे. केवळ कलर पेन्सिलचा वापरकरून त्याने रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतअसून, त्याच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सलमानने अत्यंत सूक्ष्म तपशीलांसह हे चित्र साकारले आहे. महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज, करारी नजरआणि कपाळावरचा टिळा या गोष्टी त्याने कलर पेन्सिलच्या माध्यमातून अत्यंत जिवंतपणे मांडल्या आहेत. वयाच्या मानाने सलमानची ही कलाकृती त्याच्यातील उपजत प्रतिभा आणि मेहनतीची साक्ष देते. कोणत्याही कलेला योग्य वळण मिळण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. सलमानला त्याच्या शाळेतील कला शिक्षक ज्ञानेश्वरजी बेंबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बेंबडे सरांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच सलमानने हे आव्हानात्मक चित्र पूर्ण केले आहे. विद्यार्थ्याच्या यशात शिक्षकाचा वाटाकिती महत्त्वाचा असतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. सलमानच्या या कलेची दखल शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक आणि पालकांनी घेतली आहे. “एका छोट्या वयोगटातील मुलाने इतक्या सफाईदारपणे रेखाटलेले हे चित्र थक्क करणारे आहे,” अशाशब्दांत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. “सलमानच्या…
Read More » -
सामाजिक
उद्या मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचे आयोजन.
▫️युवराज पाटील गुंफणार ‘चला कुटुंब जपूया’ विषयावर १४ वे पुष्प. मुखेड / प्रतिनिधी. श्रमिक एकता ०९ मार्च २६ मातोश्री भिमाई पांडुरंगराव पुंडे व्याख्यानमाला तसेच गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे दि.१० मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजता शांतीनगर मुखेड येथे आयोजन करण्यात आलेआहे.याप्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गारगोटी (कोल्हापूर) येथील युवराज पाटील यांचे ‘चलाकुटुंब जपूया’ या विषयावर व्याख्यान होणार असून व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प पाटील गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र येवती मठसंस्थानचे मठाधिपती सदगूरू नराशाम महाराज हे राहणार असून आमदार डॉ.तुषार राठोड, नगराध्यक्ष विजया देबडवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या शानदार सोहळ्यात ‘ग्लोबल एक्सपर्ट इमर्जन्सी मेडिकल फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड,मुंबई‘ येथीलडॉ.संदीप बालनराव गोरे यांना ‘गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात येणार आहे. मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे यांच्या पुढाकारातून मातोश्री भिमाई व्याख्यानमाला सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य व वैचारिक प्रबोधनाचे कार्य करत आहे. यापूर्वी या व्याख्यानमालेत तेरा व्याख्यान पुष्पे यशस्वीपणे संपन्न झाली आहेत.पहिल्या पुष्पात कवी प्रा.प्रशांत मोरे (मुंबई) यांनी ‘आई’ याविषयावर व्याख्यान दिले,दुसरे पुष्प प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी ‘सुंदर जगण्यासाठी’, तर तिसरे पुष्पडॉ.राजेंद्र पवार यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर गुंफले.,चौथे पुष्प प्रा.डॉ.तेज निवळीकर यांनी‘२१व्या शतका समोरील आव्हाने’ या विषयावर,पाचवे पुष्प डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पायातुका झालासे कळस’ या विषयावर सादर केले,सहावे पुष्प डॉ.अविनाश सावजी अमरावती यांनी‘शतायुषी व्हा! पासवर्ड आरोग्याचा’, तर सातवे पुष्प डॉ. सचिन देशमुख औरंगाबाद यांनी ‘स्वभावालाही औषध असतं’ या विषयावर गुंफले.,आठवे पुष्प जगन्नाथ दीक्षित औरंगाबाद यांनी ‘विनासायास वेटलॉस’, नववे पुष्प डॉ.श्रीराम राठोड नांदेड व माजी आयुक्त आर.के. गायकवाड यांनी ‘विपश्यना : परिचयव अनुभूती’ या विषयावर सादर केले,दहावे पुष्प प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी ‘जीवन त्यांना कळले हो’, अकरावे पुष्प इंद्रजीत देशमुख (कराड) यांनी ‘पसायदान’ या विषयावर गुंफले,बारावे तपपूर्ती पुष्पडॉ.अनंत सूर्यवंशी (नांदेड) व डॉ.गौरव दिलीप पुंडे (मुखेड) यांनी ‘हृदयरोग जनजागरण अभियान’ याविषयावर सादर केले तर तेरावे पुष्प प्रा.श्रीहरी वेदपाठक (लातूर) यांनी ‘ताण–तणावाचे व्यवस्थापन’ याविषयावर गुंफले.याच परंपरेत मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात युवराज पाटील यांचे ‘चला कुटुंब जपूया’ हे व्याख्यान समाजाला सकारात्मक दिशा देणारे ठरणार आहे.आधुनिक जीवनशैलीत कुटुंबव्यवस्था,नातेसंबंध व मूल्यांचे जतन कसे करावे, यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमास…
Read More » -
क्राईम
नांदेडमध्ये खळबळ: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या त्रासाला कंटाळून भावी डॉक्टरची आत्महत्या;गुन्हा दाखल !
नांदेड प्रतिनिधी:- ०८ मार्च २६ नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊनआत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असंया तरुणीचं नाव आहे. “वसतीगृहाची फीस थकल्याने वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली,” असाआरोप पीडित कुटुंबीयाने केला. त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकचखळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिकम हाविद्यालयातील द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती. आई वडील वीट भट्टीवर मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेश चिटणीस जीवन घोगरेपाटील यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीत त्यांनी कॉट बेसिसवर सुरू केलेले वसतीगृह आहे. मागील दोन वर्षांपासून आकांक्षा ही कॉट बेसिसवर राहत होती. शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहाच्या खोलीतपंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले. आठ महिन्यापासून फीस थकल्याने जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास सुरु होता, त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. दरम्यान, या वसतीगृहात ४० हून अधिक मुली कॉट बेसेसवर राहतात. महिन्याला प्रत्येकी अडीच हजाररुपये वसतीगृह चालकाकडून घेतले जायचे. या वसतीगृहाला परवानगी नसल्याचे बोलले जात आहे. दजीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाणमांडले होते. त्यानंतर पोलिसांकडून घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More » -
क्राईम
मुखेडकरांमध्ये भीतीचे वातावरण; दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरटे पसार.
▫️भरदिवसा झालेल्या चोरीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. मुखेड प्रतिनिधी: ( श्रमिक एकता न्यूज़) ०७ मार्च २६ शहरातील शारदानगर भागात गुरुवारी भरदिवसा घरफोडीची खळबळजनक घटना घडली. चोरट्यांनी बंदघराचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या–चांदीचे दागिने असा एकूण ५० हजारांहून अधिकचा ऐवज लंपास केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून शहरात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. फोटोग्राफर व व्यापारी असलेले ज्ञानेश्वर पडलवार हे गुरुवारी घरातून दुकानासाठी मुखेड येथे गेले. दुपारी१२ वाजेदरम्यान त्यांची पत्नी बाहेर गावाहून घरी परतल्या असता घराचा लाकडी दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळला त्यांनी पतीला फोन करून बोलावले व पाहणी केली असता कपाटाचे दार तोडून नगदी ५५ हजार रुपये, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले व अंदाजे एक तोळा चांदी असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरूननेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी नांदेड येथून श्वानपथक पाचारण केले. श्वानपथक प्रमुख महमंद आयुब व दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. बातमी साठी…
Read More » -
सामाजिक
केवायसी करूनही मिळेना ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा अनुदान; मुखेडमध्ये महिलांची नाराजी
मुखेड प्रतिनिधी:-( श्रमिक एकता न्यूज़ ) मार्च २६ शासनाच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत दरमहा मिळणारे अनुदान केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा होत नसल्याची तक्रार समोर आली आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुखेड तालुक्यातील काही महिलांनी अंगणवाडी केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून दिले होते. तसेच बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अनेक महिने उलटूनही त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. महिलांचे म्हणणे आहे की, सर्व कागदपत्रे वेळेत सादर करूनही अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काहींना अर्ज मंजूर झाला की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याचीतक्रार आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर प्रकरणांची चौकशी करून पात्र लाभार्थींना अनुदान वितरित करावे, अशी मागणी महिलांकडून होत आहे. सदर…
Read More » -
शहर
प्रभाग क्र.९ मध्ये नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर; नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा फज्जा
▫️कर भरतो आम्ही, नरकयातना भोगतोही आम्ही! तुंबलेल्या नालीमुळे प्रभाग ९ मधील नागरिक संतापले. मुखेड प्रतिनिधी:- ६ मार्च २६ शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला असून, येथील माजी नगराध्यक्ष कामजे यांच्या घराशेजारील मुख्य नाली कचऱ्याने पूर्णपणे तुंबली आहे. यामुळे नालीतील दुर्गंधीयुक्त काळे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात नरकयातना सोसाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक आणि नगर पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत…
Read More » -
सामाजिक
समता नगर–अशोक नगर येथे १३५ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी भीमा युवा एल्गार मंडळाची कार्यकारिणी जाहीर
▫️अध्यक्षपदी गोरूपाशा शेख तर सचिवपदी वैभव शिरसे यांची निवड मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता ०५ मार्च २६ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर व अशोक नगर परिसरात…
Read More » -
क्राईम
वनविभाग निष्क्रिय, लाकूड तस्कर सक्रिय; मुखेडमध्ये अवैध वृक्षतोड वाढली
▫️जंगलांची सर्रास कत्तल, वनविभाग मात्र ‘मूकदर्शक’ मुखेड प्रतिनिधी:- ०५ मार्च २६मुखेड तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना वनविभागमात्र अक्षरशः कोमात गेल्यासारखा निष्क्रिय दिसत आहे. वारंवार तक्रारी, बातम्या आणि स्थानिकनागरिकांचा आक्रोश असूनही या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मुखेड शहर सह तालुक्यातील बारहाळी, मुक्रमाबाद, जाहूर, राजूरा, आंबुलगा आणि…
Read More » -
सामाजिक
मुखेडमध्ये वाळू माफियांचा हैदोस; प्रशासन झोपेत? संयुक्त पथक नेमून तात्काळ कठोर कारवाईची मागणी
मुखेड (प्रतिनिधी) – ४ मार्च २६ मुखेड शहरातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन इंगोले यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात आज दि ०४ मार्च रोजी त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, मुखेड शहरातून लातूर, उदगीर, शिरूर ताजबंद, जांब बु., बाहेरहाळी रोड, सलगरा तसेच खरबखंडगाव–चांडोळा मार्गे शेकडो टिप्परद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. अनेक टिप्पर एकाच पावतीवर दोन–दोन वेळा दहा ते बारा ब्रास क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून शासनाचा महसूल बुडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर टिप्पर भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार वाळू वाहतूक सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापूर्वी या कालावधीतच करणे अपेक्षित असताना, संबंधितांकडून दिवसरात्र २४ तास वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूदकरण्यात आले आहे. काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. यासोबतच, मुखेड तहसील अंतर्गत महसूल विभागाने मौजे सलगरा फाटा, कमळेवाडी फाटा व जांब येथे…
Read More » -
राजकीय
इराणवरील कारवाईचा निषेध; माकपचे काळे झेंडे आंदोलन, युद्धविरामाची मागणी
सोलापूर, दि. ०४ मार्च २६ इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकप तर्फे आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर…
Read More »