Sharmik Ekta
-
Uncategorized
“अंधश्रद्धेवर मात: गर्भवती मातेने ग्रहणकाळात भाजी चिरून जेवण केले”
▫️अंनिसचा ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा उपक्रम यशस्वी! पुणे:- ०४ मार्च २६ काल चंद्रग्रहणा निमित्त महाराष्ट्र निर्मूलन समितीने ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा अभिनव उपक्रम राबवला. ग्रहण काळात गर्भवती महिलांना ग्रहण पाळण्याची सक्ती केली जाते. त्यामध्ये गर्भवती महिलेने भाजीचिरू नये, कात्रीने काही कापू नये, नाहीतर बाळाचे ओठ फाटतात. अशी मोठी अंधश्रद्धा आज ही आपल्या समाजात आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नांदेड सिटी, सिंहगड रोड पुणे येथील सौ. चांदणीप्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने आज ग्रहण काळात भाजी चिरली, कात्रीने कागद कापले, जेवण केले. “ग्रहणात गरोदर स्त्रियांनी भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात” या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्याभ्रामक कल्पनेला आज सौ. चांदणी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने छेद दिला. आजच्या चंद्रग्रहणाच्याकाळात स्वतः या गरोदर मातेने भाजी चिरून, फळे खाऊन या जुनाट अंधश्रद्धेवर प्रहार केला. पुणे येथेग्रहणाचा वेध सुरू झालेवर, या गरोदर मातेने विविध भाज्या चिरल्या. “माझ्या होणाऱ्या बाळावरकोणत्याही अंधश्रद्धेचा नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावा, यासाठी मी हे धाडसी पाऊलउचलले आहे, या माझ्या छोट्या कृतीने गरोदर महिलांना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास बळ मिळेल अशीमला आशा आहे. तसेच माझे माहेरचे आणि सासरचे कुटुंबीय पुरोगामी आणि विज्ञानवादी असल्यामुळे मीहे धाडस करू शकले” असे मत सौ.चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. सौ. चांदणी याअंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्या वहिनी आहेत. या उपक्रमाचे महत्त्व सांगताना अंनिस चे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, “खगोलशास्त्रीय दृष्टीनेग्रहण ही केवळ सावल्यांचा खेळ असलेली एक खगोलीय घटना आहे. मात्र, आजही समाजातील मोठावर्ग, विशेषतः गरोदर महिलांना या काळात अनेक जाचक अंधश्रद्धा पाळण्याची सक्ती केली जाते. “भाजी चिरल्याने बाळाला इजा होते, ओठ फाटतात” या अंधश्रद्धेला कोणताही शास्त्रीय आधार नाही, हीअंधश्रद्धा दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हा ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. स्री रोग तज्ञ आणि खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे म्हणाले की, “बाळाचे ओठ फाटणे हे जनुकीयकारणांमुळे किंवा गर्भावस्थेतील पोषणाच्या अभावामुळे होते. त्याचा ग्रहणाशी किंवा भाजी चिरण्याशीदुरान्वयेही संबंध नाही.” महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या ग्रहणा संबंधीभीतीदायक अफवांमुळे गरोदर महिला विनाकारण मानसिक तणावाखाली येतात. हा तणाव बाळासाठीघातक ठरू शकतो. त्यामुळे अशा फोल समजुतींना फाटा देऊन महिलांनी मुक्तपणे वावरावे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या अभिनव उपक्रमात सहभाग घेतलेल्या आणि ग्रहण काळातभाजी चिरून अंधश्रद्धा नाकारणाऱ्या सौ. चांदणी प्रफुल थोरात या गर्भवती मातेचे अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, श्रीपालललवाणी, अनिल वेल्हाळ यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
Read More » -
सामाजिक
मुखेड बसस्थानकात प्रवाशांचे हाल; भिंतीवर ‘पिण्याचे पाणी’ फक्त नावालाच!
▫️प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल; प्रवाशांना विकतचे पाणी घेण्याची वेळ. मुखेड (प्रतिनिधी): ४ मार्च २६ राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना मुखेड बसस्थानकात मात्र प्रवाशांना पिण्याच्यापाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. बसस्थानकाच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘पिण्याचे पाणी‘ असे फलक लावण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र तिथे थेंबभरही पाणी उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.…
Read More » -
सामाजिक
दुबईत अडकलेल्या मुखेडच्या नागरिकांची माहिती द्या; तहसीलदार राजेश जाधव यांचे आवाहन
मुखेड (श्रमिक एकता न्यूज): दि ०२ मार्च २६ कामानिमित्त किंवा अन्य कारणास्तव संयुक्त अरब अमिराती (दुबई) येथे गेलेले मुखेड तालुक्यातील नागरिक जर सद्यस्थितीत तिथे अडकून पडले असतील, तर त्यांची माहिती तातडीने प्रशासनाकडे सादर करण्याचे आवाहन मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने एका विशिष्ट गुगल शीटचा (Google Sheet) फॉरमॅट उपलब्ध करून दिला आहे. मुखेड तालुक्यातील संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या फॉरमॅटमध्ये आपली पूर्ण माहितीभरणे आवश्यक आहे ते खाली…
Read More » -
राजकीय
मुखेड नगरपालिकेत राजकीय भूकंप: भाजप-शिवसेनेचे ७ नगरसेवक वादाच्या भोवऱ्यात!
▫️काँग्रेस आक्रमक; अपात्रतेसाठी जिल्हाधिकारी आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार मुखेड (प्रतिनिधी): ०२ मार्च २६ मुखेड नगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या एकूण ७ नगरसेवकांनी बेकायदा मार्गाने निवडणूक जिंकल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी केला आहे. मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशसरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी संबोधित केले. यावेळी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर, शेकाप राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ. रॅपनवाड यांनी सांगितले की सक्षम पुराव्यांसह या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी आता काँग्रेस रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढा देण्यास सज्ज झाली आहे ते ७…
Read More » -
सामाजिक
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्याकडून ईदगाहचे सर्वेक्षण
हिमायतनगर प्रतिनिधी:- २७ फेब्रुवारी २६ अजीम हिंदुस्तानी आगामी रमजान ईदच्या तयारीसाठी हिमायतनगरमध्ये प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज, २७ फेब्रुवारी रोजी हिमायतनगरचे नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी शेख रफिक सेठ यांनी स्थानिक ईदगाहला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ईदगाहच्या परिसराची स्वच्छता आणि इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला. ईदच्या निमित्ताने ईदगाहला नवीन रंगरंगोटी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगराध्यक्षांनी यावेळी घेतला, जेणेकरून सणाच्या…
Read More » -
देश-विदेश
AI क्रांती – मानवी अस्तित्वासाठी वरदान की एक अदृश्य संकट?
मुखेड प्रतिनिधी :- २७ फेब्रुवारी २०२६ आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगात Artificial Intelligence (AI) म्हणजेचकृत्रिम बुद्धिमत्तेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची आणि निर्णयघेण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानाने प्रगतीचे नवे आयाम उघडले आहेत. मात्र, जसजसा AI चा वापरवाढत आहे, तसतशी एक भीतीही जोर धरत आहे: हे तंत्रज्ञान मानवाचा मित्र आहे की शत्रू? 🌟 वरदान: प्रगतीचा वेगवान मार्ग…
Read More » -
सामाजिक
मुखेड तालुक्यात अवकाळीचा तडाखा; रब्बी पिके आडवी, बळीराजा संकटात
मुखेड (प्रतिनिधी): २४ फेब्रुवारी २६ तालुक्यात सोमवारी (दि. २३) दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाच, सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊण ते एक तास चाललेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा आ ,आणि करडई ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणीज्वारी काढणीला आली होती, तर गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत होता. मात्र, वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमिनीला लागली आहेत. पावसामुळे हरभऱ्यालाही फटका बसला असून पिकांचा दर्जा घसरण्याची भीतीव्यक्त होत आहे. वादळी वाऱ्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याच्या आणि झाडेपडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडूनमदत जाहीर करावी, अशी मागणी मुखेड तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Read More » -
क्राईम
मुखेड वनविभाग ‘कोमात’, लाकूड तस्कर ‘जोमात’; अवैध वृक्षतोडीने पर्यावरणाचे मोठे नुकसान
मुखेड प्रतिनिधी: २४ फेब्रुवारी २६ निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकीकडे वृक्षारोपणाचे कोट्यवधींचे टार्गेट दिले जाते, तर दुसरीकडे मुखेड तालुक्यामध्ये वनविभागाच्या नाकाखाली वनसंपदेची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहे. मुखेड तालुक्यातील बारहाळी , मुक्रमाबाद, जाहुर, राजूरा, आंबुलगा , ईडग्याल ही गावे कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असल्यामुळे या भागातून दररोज सुमारे ५० हून अधिक ट्रॅक्टर आणि ट्रक लाकूड भरून राज्यात व परराज्यात लाकूड अवैध मार्गाने विकले जात आहे . विशेष म्हणजे, यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही वनविभाग ढिम्म असल्याने “वनविभाग कोमात आणि तस्कर जोमात” अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मुक्रमाबाद , बाऱ्हाळी , जाहूर , राजूरा, आंबुलगा , ईडग्याल अवैधरीत्या तोड करून ती लाकडे मोठ्यावाहनांतून वाहून नेली जात आहेत. (सोबतच्या छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे) लाकडांनी भरलेली हीवाहने मुख्य रस्त्यावरून बिनदिक्कतपणे जात असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. या तस्करांना कोणाचे अभय लाभले आहे? असा सवालआता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. हवे तसे परवाने? : एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाकूड वाहतूक होत असताना वनविभागाकडे याचे रीतसरपरवाने आहेत का? की केवळ अर्थपूर्ण तडजोडीतून हा ‘हिरवा‘ बाजार सुरू आहे?…
Read More » -
क्राईम
सावधान! दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार केल्यास होणार जेल; नांदेड जिल्ह्यात ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा’ लागू
नांदेड प्रतिनिधी:- २३ फेब्रुवारी २६ जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने…
Read More » -
शैक्षणिक
मुखेडात शिष्यवृत्ती परीक्षेत ‘सावळा गोंधळ’; मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी तर इंग्रजीच्यांना मराठीचे पेपर!
मुखेड (प्रतिनिधी): २३ फेब्रुवारी २६ दि २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मुखेड येथील परीक्षा केंद्रावरप्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे, तरइंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचे पेपर वाटप झाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. याप्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. मात्र, काही वेळातच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, त्यांना त्यांच्या माध्यमाचे पेपर मिळालेले नाहीत. मराठीमाध्यमाच्या वर्गात इंग्रजीचे पेपर गेले, तर सेमी–इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमाध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. ही चूक लक्षात येईपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. १५ मिनिटे उशिरा मिळाले पेपर हा गोंधळ निस्तरताना आणि योग्य प्रश्नपत्रिकांची जुळवाजुळव करताना परीक्षेच्या वेळेतील तब्बल १५ मिनिटे…
Read More »