Sharmik Ekta
-
Uncategorized
पत्रकार संरक्षण समिती देगलूर तालुकाध्यक्ष पदी शेख असलम तर उपाध्यक्षपदी अमित पाटील यांची निवड
देगलूर/प्रतिनिधी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार, जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली युवा पत्रकार शेख असलम यांच्या…
Read More » -
क्राईम
नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक करणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात
मुखेड प्रतिनिधी:- तलाठी पदासह कामगार आयुक्त यांच्याकडून भरण्यात येणाऱ्या जागेवर नोकरी लावण्याचे अमिष दाखूवनएका अधिकाऱ्यासह अन्य सहा जणांवर १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्यासह चौघांना मुंबई येथून आर्थिक गुन्हा शाखेने आरोपींना अटक केली आहे. विविध विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्यांचागंभीर प्रकार मुखेड तालुक्यात घडला असून गंभीर गुन्हा प्रकरणी ११ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करताच तपास अधिकारीपोलीस उपनिरीक्षक एन. बी. कुंडगीर यांनी लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथील आरोपी रामदास नारायणशिंदे, मुंबई येथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य नियंत्रण विभागात अधिकारी असलेले सरकारी अधिकारी पवनकुमार धर्मा चव्हाण, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील जावेद राजक तांबोळी व निलंगातालुक्यातील कल्पेश रविकांत जाधव या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी गोविंद गिरी आणि साक्षीदार व नातेवाईक यांच्याकडून तब्बल १ कोटी १४ लाख रुपये नगदी वफोन– पे च्या साह्याने घेतले असून पैसे पोहोचल्यानंतर बनावट निवड यादी तयार करून फिर्यादीच्यामोबाईल व्हॉट्सअॅपवर पाठवून दिली. सदर यादी बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपलाविश्वासघात आणि फसवणूक केल्याचे लक्षात येताच संबंधितांकडे याबाबत विचारणा केली असतासंबंधितांनी फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गोविंद गिरी रा. दबडेशिरूर ता. मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुरनं ३६९/ २०२४ कलम४२०,४०६,४६५,४६६, ४६७, ५७८, ४७१, ४८३, २९४, ५०७, १२० (ब) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
Read More » -
क्राईम
भरदिवसा बंद घर फोडले; ३ लाखाचा ऐवज लांबविला ! नागरिकात भीतीचे वातावरण
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड शहरातील दीपनगर भागातील एका शिक्षक दाम्पत्याचे बंद घराचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश करतघरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनीचोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे शहरातील मध्यवर्ती भागतील घरात घरफोडी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना११ डिसेंबर रोज बुधवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने श्वानपथकास पाचारण केले आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील दीपनगर भागात दादाराव आगलावे यांचे चैतन्य निवास हे घरआहे. दररोजच्या दिनक्रमा प्रमाणे दादाराव आगलावे आणि त्यांची पत्नी सौ. शिला आगलावे हे दोन्हीशिक्षक दाम्पत्य शाळेत कर्तव्यासाठी गेले असता घरी कुणीही नसल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्यानेघराचे कडी कोंडा तोडून भरदिवसा ११ रोजी बुधवारी दुपारी १ वाजता धाडसी चोरी केली आहे. यात घरातील लोखंडी कपाटातील ३५ ग्राम सोन्याचे दागिने नगदी १० हजार रु लंपास केल्याची माहितीसमोर आली आहे. सौ. शीला आगलावे हे शाळेच्या मध्यंतरामध्ये घरी आले आसता घरातील दरवाजे कुलूपकोंडी तुटून दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. मुख्य गेटला कुलूप होते. घरात गेल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले असता त्या क्षणी त्यांना धक्का बसला. दादाराव आगलावेयांनी पोलिस प्रशासनस ही बाब कळवली असता पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, फौजदार चव्हाण यांनीघटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. नांदेड येथील श्वान पथकास पाचारण केले आहे. दादाराव आगलावे यांच्या घरी धाडसी चोरी भरदिवसाझाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सदरील घटनेची सायंकाळी उशिरा मुखेड पोलिसठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे प्रक्रिया सुरू असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.
Read More » -
आरोग्य
हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
तंबाखू विक्रेत्यांना 8 हजार 500 रुपयांचा दंड आकारला …
Read More » -
शहर
मुखेडात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड – भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तदि. ६ डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सामूहिक बौद्धवंदना आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिकायासह अनुयायीणी मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तरशहरातील फुलेनगर येथील बौद्ध मूर्ती पासून तर मिलिंद नगर येथील बौद्ध विहारा पासून शहरातील मुख्यरस्त्याने कॅन्डल मार्च काढण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मार्कात सकाळच्या सत्रातउपस्थित मान्यवरांनी सामूहिक वंदना करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण केले. समाजासाठी त्यांनीकेलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्व अधोरेखितकरण्यात आले. या सभेसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. जि.प. सदस्य दशरथरावजी लोहबंदे, गौतम काळे, के. एच. हसनाळकर, गंगाधर सोंडारे, दीपक लोहबंदे, कलमलाकर घोडके, डॉ. राहुल कांबळे, राजू घोडके, बाबुराव येवतीकर, इंजि. वाघमारे, भारतीताई काळे, भद्रेताई, कुलदीप कोतापल्ले, बाबुराव तांदळीकर, पी.एस. कांबळे, विठ्ठल शिरसाटे, संदीप बावलगावकर यांचा समावेश अनेक सामाजिक कार्यात असणारेअनुयायी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, बंधुत्व, आणि समतेच्याविचारांचा प्रसार करण्यासाठी उपस्थितांनी पुढाकार घेतला.
Read More » -
Uncategorized
ऊसतोड कामगारांची मुलं शाळांऐवजी उसाच्या फडात; केंद्रप्रमुखांनी केले शाळेत दाखल
मुखेड प्रतिनिधी:- कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल पण उसतोड कामगारांच्या मुलांसाठी हे दरवर्षीचं अवस्था आहे हि अवस्था केवळ या टोळीतील विद्यार्थ्यांचीच नाही. तर महाराष्ट्रात जवळपास पंधरा लाख ऊस तोडकामगार आहेत. ऊस तोडीसाठी हि कुटुंबे साखर पट्यात दरवर्षी स्थलांतरित होत असतात. स्थलांतरित झाल्यांनंतर त्यांच्या मुळगावी फक्त वयस्कर लोक उरतात. आई वडील काम करत असताना लहानअसलेल्या मुलांची जबाबदारी पेलण्यासाठी तसेच शेळी व इतर पाळीव जनावरांची देखभाल करण्यासाठीया मुलाना आईवडील सोबत आणत्तात. यामुळे हि मुले किमान पाच ते सहा महिने शाळे पासून बाहेर…
Read More » -
राजकीय
मी पुन्हा आलो…मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई:- भारतीय जनता पार्टीच्या कोर – कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यानावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भातील ठराव चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवारयांनी मांडला होता. कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानेराज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत. भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपच्या निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री निर्मलासीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवारचंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
Read More » -
राजकीय
सांगोला तालुक्यात हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाईगिरी अजिबात चालू देणार नाही: आ.बाबासाहेबदेशमुख
माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची वाढली जबाबदारी सांगोला :- सांगोला तालुक्यात हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाई गिरी अजिबात चालू देणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच ५५ वर्षाच्या परंपरेनुसार सांगोला मतदारसंघाचा कारभार करू. कोणाचीही अडवणूक अथवा वेठीस धरण्याचे प्रकार आता चालणार नाहीत. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्याकोणाचीही गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीयावेळी दिला. तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहे. जनतेच्या भल्यासाठी काम करणे हेचमाझे ध्येय असून, भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन. आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्याअसे आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही, तालुक्यात या पुढे हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, भाई गिरी अजिबात चालू देणार नाही असा इशारा आम बाबासाहेब देशमुखयांनी दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत म ोठ्या मताधिक्यानेविजय मि ळवला होता. निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केलाअसून शनिवारी मुंबईहून त्यांचे सांगोला येथे आगमन झाले. यावेळी सर्वसाम ान्य नागरिकानी त्यांच्यास्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांनी हार तुरे ऐवजी रोपे देऊन डॉक्टरबाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन करत आहे. यावेळी ते बोलत होते. आगामी काळात सर्वसामान्यनागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन अशी ग्वाही उपस्थितांना दिली. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक होतअसून हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे. स्वर्गीय भाई गणपतराव देशम ख यांच्याप्रमाणेमाझ्यावर सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आम्हाला मतदारसंघात खूप काम करावे लागेल, याची जाणीव होत आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडाजाऊ देणार नाही तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहे. विधानसभानिवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यशमिळाले आहे. माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढेअधिक बारकाईने काम करावे लागेल. आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊदिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले
Read More » -
शहर
मुखेड व परिसरातील भाविकांनी मनोभावे पूजा करून शनिदेवाचे घेतले दर्शन
मुखेड प्रतिनिधी मुखेड :- शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी मुखेड शहर, कर्नाटक, तेलंगणा सह विविध ठिकाणच्या भाविकांनीशनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. मुखेड व परिसरातील भाविकांचेदर्शनासाठी लांब रांगा लागल्याने रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. शनी पिडा परिहार्थ तेल, काळेतीळ खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. मुखेड तालुक्यात गत काही दिवसांपासून नैसर्गिक संकटाचीमालिका सुरू आहे. कधी अतिवृष्टी तर पावसाने दिलेली ओढ यातून पिकेही हातची गेल्याने शेतकरी हतबलदिसून येत आहे. तालुक्यात हिवताप, डेंग्यू, टायफॉइड, चिक न गुनियासारख्या आजाराने अनेक जण त्रस्तआहेत. जीवनात संकटाची मालिका खंडित व्हावी, जगणे सुसह्य व्हावे, रब्बी हंगामात शिवार सुजलामसुफलाम व्हावे, आर्थिक सुब्बता यावी, संकटे, साडेसात्ती हद्दपार व्हावी यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनीशनिवारी सकाळ पासूनच दर्शनासाठी रांगा, लावल्या होत्या. मुखेड शहरात प्राचीन अतिशय स्वयंभूशनिदेवाचे जाज्वल्य पुरातन मंदिर उंच निसर्ग रम्य डोंगरावर काळी पाषाणाची ४ ते ५ देखणी मूर्ती मंदिरातशनीच्या साडेसाती व पीडा परिहार्थ शनी देवाची वक्रदृष्टी होवु नये म्हणून अनेक भाविकांनी पूजा अर्चाकेली. शनिवारी सकाळी १० वाजुन १९ मिनिटाला सुर झालेली अमावस्या रविवारी सकाळी ११ पर्यंत होती. त्यानिमित्त विविध प्रकारच्या साहित्याची विक्री झाली आहे. काळे तीळ तेल, काळे उडीद, पांढरे फूल, नारळ, धूप घेऊन भाविकांनी शनिवारी सकाळपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी लांब अंतर राखत रांगा लावल्या. नवसाला हमखास पावणारे शनिदेव म्हणून मंदिर प्रसिद्ध आहे. नवस फेडण्यासाठी पूर्तता करण्यासाठीअनेक भाविक दुरून येत असतात. श्री शन्नेश्वराय नःम चा जयघोष करीत हजारो भाविक– भक्तांनी दर्शनघेतले आहे.
Read More » -
राजकीय
आ.डॉ तुषार राठोड यांना आरोग्यमंत्री पदी निवड करुन, रुग्णसेवा मजबूती करण्याची संधी द्यावी- आदी बनसोडे
मुखेड प्रतिनिधी:- मुखेड:- मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपा पक्षाकडून प्रचंड मताधिक्यानेविजयी होणारे आमदार डॉ तुषार राठोड यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळा मध्ये आरोग्यमंत्री पदी निवड करुन, महाराष्ट्रातील आरोग्यसेवा मजबुती करण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी नर्सेस संघटना समन्वय आदीबनसोडे यांनी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा मा. देवेंद्र फडणवीसयांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे. मुखेड कंधार मतदार संघामध्ये मागील दहा वर्षांच्या कालावधीत प्रचंड प्रमाणात निधी मंजूर करुनतालुक्याचा सर्वांगिण विकास केला आहे, डॉ तुषार राठोड हे स्वतः एम बि बि एस , रेडीओलाॅस्टिटवैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन वडीलांच्या निधनामुळे, रिक्त झालेल्या विधानसभापोटनिवडणुकीत मतदारसंघातील नागरीकांच्या आग्रहास्तव राजकारण आले त्यांनी मतदार संघातसर्वाणगिक विकासाबरोबरच शहरातील नागरिकांनसह ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवाउपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची मंजुरी आणून, तालुक्यातील आरोग्यसेवामजबुत केली आहे, शहरांमध्ये 100 खांटाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करुन आणले, कोरोना काळातदेवदुता सारखं नागरिकांच्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे आरोग्याची काळजी घेतली, नागरिकांना मास्क वाटप, आरोग्य तपासणी, सोशल डिसटंन्स पाळून भाजीपाला, किराणा उपलब्ध करुन दिले, अनेकांना राशन किटवाटप केले, नागरिकांच्या सेवेसाठी स्वतः कोव्हिड पाॅझिटीव्ह झाले, असे होऊनही कोव्हिड रुग्णांनावेळोवेळी धिर दिला, अंगणवाडी,शाळा बंद असताना शासनाकडून मागणी करुन, पाकीट बंद खाऊचेघरपोच वाटप करुन, बालकांच्या पोषणाची जबाबदारी देऊन कुपोषणापासुन रोखणाऱ्या युवा नेतृत्वलोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड यांची महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्तारात आरोग्यमंत्री पद देऊनमहाराष्ट्राची आरोग्यसेवा मजबुत करण्याची संधी द्यावी, अशी मागणी मतदार संघातील युवक आरोग्यदूतनर्सेस संघटना मराठवाडा विभागाचे समन्वयक आदी बनसोडे यांनी निवेदनाद्वारे भाजपाचे प्रदेश अध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे सर्वेसर्वा मा. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे
Read More »