शहर

  • संघर्षातून यशाला गवसणी: मुखेडच्या रिक्षाचालकाचा मुलगा आता होणार ‘खाकी’ वर्दीचा मानकरी!

    ▫️वडील ऑटो रिक्षा चालक तर आई मजुरी करुन चालविते कुंटुबाचा उदरनिर्वाह. मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६  जिद्द,…

    Read More »
  • दु:खद: माजी उपनगराध्यक्षा शाहजहान बेगम पठाण यांचे निधन

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २७ मार्च २६  माजी उपनगराध्यक्षा शाहजहान बेगम पठाण यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून, एका कर्तृत्ववान महिला नेतृत्वाला आपण मुकलो असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्या माजी नगरसेवक नासरखा पठाण आणि सामाजिक कार्यकर्ते अनवर पठाण यांच्या मातोश्री होत. आपल्या कार्यकाळात त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले होते. जनसामान्यांच्या प्रश्नांचीजाण असलेल्या आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळखहोती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर नमाजे जनाजा रात्री  १०…

    Read More »
  • रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कबरस्तानची स्वच्छता करा; भाई आसद बल्खी यांची नगर परिषदेकडे मागणी”

    मुखेड : पवित्र रमजान महिन्याचा शेवट आणि ईदुल फितरचा सण जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक कबरस्तानची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेकाप राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वत्यांच्यासाठी प्रार्थना (दुआ) करण्यासाठी कबरस्तानमध्ये जातात. मात्र, सध्या अनेक ठिकाणच्याकबरस्तानमध्ये लाईट नसल्याने व मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना तिथे वावरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्वच्छता आणि सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याची गरज या संदर्भात बोलताना भाई आसद बल्खी म्हणाले की,…

    Read More »
  • शेतकरी नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या जनसेवेची १८ वर्ष.. 

    माजलगाव:- १८ जुलै २५ तसं तर २००७ हे साल आयुष्यातील महत्त्वाच्या तीन गोष्टीचं साक्षीदार आहे, पहिलं २००७ ला एल एलबी चं शिक्षण पूर्ण झालं, मी एल एल बी चांगल्या मार्काने पास झालो, दुसरं परीक्षा मार्चमध्ये झाली, आणि २१ एप्रिल २००७ रोजी मी विवाह बंधनात अडकलो, तिसरं २००७ च्या मे महिन्यातच मी माजलगाव जिल्हा व सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी माझे गुरु ॲड. व्हि.जी.तिडके साहेब यांच्याऑफिसला आलो, तेथे मला ॲड. बाबुराव तिडके, ॲड. साहेबराव आचार्य, ॲड.जाधवर मॅडम, ॲड हरिभाऊ बडे हे सहकारी मिळाले, यामध्ये खास करून ॲड बाबुराव तिडके यांना मी आणि आमचे सहकारी नाना म्हणायचो, नाना म्हणजे अगदी सरळ, साधा, प्रत्येकाला आपलं समजणारा, आलेल्या प्रत्येक पक्षकारांना आपुलकीने बोलणारा, त्यांच्या हृदयात घर करणारा एखादा पक्षकार खूपच गरीबघरचा किंवा परिस्थितीने गांगारलेला असेल तर नाना त्याला अगदी तिकिटाला सुद्धा पैसे द्यायचे.. त्यावेळीमी नाना सोबत जास्त वेळ घालवायचो, न्यायालयातील कामकाजाच्या बारीक–बारीक गोष्टी त्यांना निसंकोच विचारायचो, अगदी अर्ज लिहिण्या पासून दावा कसा तयार करायचा, दावा दाखल कसाकरायचा, दावा दाखल केल्यानंतर तो पुढे कोण कोणत्या स्टेज ला लागतो, पहिल्या स्टेज मध्ये आपणकाय करायचे, दुसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे, तिसऱ्या स्टेज मध्ये काय करायचे हे अगदी लहान मुलासारखं विचारायचो, उलट तपास कसा घ्यायचा, उलट तपासात नेमकं काय आलं पाहिजे, पक्षकाराला तोप्रश्न कशा पद्धतीने विचारायचा, उलट तपासात साक्षीदार आपल्याला पाहिजे तसे उत्तर देत नसल्यासआपण कुठला प्रश्न विचारायचा, हाजरी माफीच्या अर्ज काय कारण लिहायचं हे सगळं विचारायला मलाकधीच लाज वाटली नाही, त्याचंही कारण होतं नाना जसे सगळ्यांशी आपुलकीने वागायचे त्याहीपेक्षामाझ्याशी अधिकच आपुलकीने जिव्हाळ्याने वागायचे, मला चांगलं अठवतयं २००७ मध्ये अगदी ऑगस्ट महिन्यात म्हणजे मला त्यावेळी वकिलीत ला “व” देखील कळत नव्हता त्यावेळी मला नानांनी माजलगाव येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश महेश नातू साहेब यांच्या न्यायालयात दिवाणी दाव्याच्या एका प्रकरणात उलट तपास समोर बसून घ्यायला लावला होता, खरं तर त्या  उलट तपासातला प्रत्येक प्रश्ननानांनी मला माझ्या शेजारी बसून  कागदावर वरचेवर लिहून दिलेला व्हता, याच्या पुढे जाऊन नानांनीमला पहिले दिवाणी न्यायाधीश व. अ.अ. ग देशमुख साहेब यांच्या न्यायालयात मनाई हुकूमाच्या अर्जावर युक्तिवाद करायला लावला होता आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणात आम्हाला  मनाई हुकूम मिळाला होता, पुढे काही काळ माझी नाना सोबत चांगली गट्टी जमली होती, अगदी सकाळी, संध्याकाळी ऑफिसला जायचो, संध्याकाळी सिनियर तिडके दादा ऑफिसमध्ये कधी यायचे, कधी नाही यायचे, पणनाना मात्र दररोज संध्याकाळी ऑफिसमध्ये येऊन दुसऱ्या दिवशीच्या बोर्डावरील फायली काढायचे अनंमला फक्त फाईल वाचा म्हणायचे, मी प्रत्येक फाईल वाचायचो प्रत्येक फाईल मधील परिस्थिती वेगळीअसायची, प्रकरण वेगळे असायचे, ते काही लवकर लक्षात यायचे नाही, मग त्याबाबत मी नानांना विचारायचो की नाना हे कशाचं प्रकरण आहे मग नाना साध्या शब्दात मला समजून सांगायचे आणि त्याफाईल मध्ये आता पुढे काय होणार, आपण पुढे काय करणार हे सगळं सांगायचे अगदी दीड वर्षातनानांनी मला जवळजवळ सर्वच प्रकरणांची आणि सर्व प्रकारची चांगलीच माहिती दिली होती, त्यानंतर मात्र वडवणी तालुक्यात दिवाणी न्यायालय स्थापण झाले, आमच्या ऑफिसच्या बऱ्याच फायली वडवणीकडे ट्रान्सफर झाल्या त्या फायली चालवण्यासाठी नाना वडवणी ला गेले, पुढे २४ एप्रिल २०१० रोजी मीस्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे स्वतंत्र प्रॅक्टिस करण्यासाठी न्यायालयात ऑफिससुरू केले त्याचे उद्घाटन माझे गुरु ॲड विठ्ठलराव तिडके दादा यांच्या हस्ते झाले, पुढे वकिलीतुनच ॲड रामरावजी नाटकर यांच्या सहवासात आल्याने आणि एस एफ आय सारख्या विद्यार्थी संघटनेची पूर्वीची पार्श्वभूमी मला लाभलेली असल्याने, मी नाटकर साहेबांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम सुरूकेलं, त्याच दरम्यान माजलगाव येथे तत्कालीन खासदार राजू शेट्टी व संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचीमोंढा मैदानावर खूप मोठी सभा आम्ही त्यावेळी घेतली, आपल्याकडील साखर कारखानदार मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पटीने शेतकऱ्यांना लुटण्याचं काम करत होते ते आजही करतात…

    Read More »
  • कष्टाचं चीज झालं; कष्टाळू मुलगा शेख रियाज़ झाला साहेब

    आई–वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून मी केलेल्या प्रयत्नला मला यश मिळाल .:- रियाज  मुखेड (प्रतिनिधी) – दि ११ एप्रिल २५ मुखेड शहरातील अत्यंत कष्टाळू व अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले कित्येक वेळेस अपयश आला तरी खचून नजाता आपल्या यशासाठी दिवस रात्र धडपड करून जिद आणि चिकाटीच्या बळावर शेवटी यश गाठण्यात यशस्वी ठरले असे शेख रियाज़ सलीम एक कष्टाळू गरीब कुटुंबातील मुलगा आज कार्यकारी…

    Read More »
  • मुखेड शहरातील विनापरवाना बाबासाई पेट्रोल पंप सिल; नगरपरिषदेची धडक कारवाई

    मुखेड /प्रतिनिधी  मुखेड नगर परिषद हद्दीतील पूरग्रस्त भागात विना परवानगी चालू असलेल्या बाबासाई पेट्रोल पंपावर मुखेडनगर परिषदेच्या वतीने मंगळवारी दिनांक २५ मार्च  रोजी सायंकाळी सिल ठोकून पंप बंद करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी दिली आहे, याकारवाईने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्राप्त झालेली माहिती अशी की मुखेड नगर पालिका हद्दीत पूरग्रस्त भागात विनापरवानगी चालू असलेल्या बाबा साई पेट्रोल पंपाची तक्रार बाबत प्रशासनाचे वतीने चौकशी करण्यात आली या चौकशीत सदरील पेट्रोल पंप हा पूरग्रस्त भागामध्ये बांधकाम परवाना न घेता अनधिकृतपणे सुरु आहे सदरील पेट्रोलपंप २०१२ पासून अस्तित्वात आहे. संबंधिताकडे मागील बारा ते तेरा वर्ष पासून सदरील पेट्रोल पंप चालकाने मालमत्ता कर भरला नाही त्यामुळे मुख्याधिकारी नगरपरिषद मुखेड यांनी वेळोवेळी नोटीस देवून संबधितयांनी दुर्लक्ष केल्याचे प्रशासनच्या निदर्शनास आले लाखो रुपये कर थकीत असल्याने व सदर पेट्रोल पंप पूरनियंत्रण क्षेत्रात येत असल्याने संबधित पेट्रोल पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश देगलुर सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांनी मुख्याधिकारी नगर परिषद मुखेड यांना दिले या आद्देश मुळे तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी पेट्रोल पंप दिनांक २५  मार्च रोजी मंगळवारी सिल करण्यावी कारवाई केली आहे. यावेळी नगर अभियंता उत्तम नारलावार, सहाय्यक नगर रचनाकार ,सचिन अंदीलवाड, कर निरीक्षक लक्षमन गीरी, कर निरीक्षक किरन श्रीमनवार,अभियंता डी. पी. गुट्टे, लिपिक बलभीम शेंडगे, एस.जी.कुचेवाड, आर. वी. ताटीपामल, रफिक बागवान उपस्थित होते. सदर पेट्रोल पंप सील करते वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यातआला होता.

    Read More »
  • प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या मुखेड आगार प्रमुखावर कार्यवाहीची मागणी.

    शेकाप व रिपब्लिकन सेनेचे विभागीय नियंत्रक म .रा .प.म नांदेड यांना निवेदन  मुखेड /प्रतिनिधी    मुखेड आगारात कार्यरत आगार प्रमुख सुभाष पवार यांचे आगार कामकाजात लक्ष नसल्याने चालक वाहक मनमाणी पद्धतीने कामावर येणे वेळेवर बस सोडत…

    Read More »
  • मुखेड येथे आजपासून तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन!

    रांगोळी स्पर्धा, मोटर सायकल रॅली, महाप्रसाद, ध्वजारोहण, शिवकालीन देखाव्यासह पालखी सोहळा मुखेड प्रतिनिधी:- महाराष्ट्राचा आराध्य दैवत, कुळवाडी भूषण, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त मुखेड येथे तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2025 भव्य रांगोळी स्पर्धांचा आयोजन करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या राजश्री नागनाथराव लोखंडे तर उद्घाटक म्हणून डॉ. माधवी सुभेदार या उपस्थित राहणार आहेत. दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून माजी आमदार हाणमंतराव पाटीलबेटमोगरेकर हे उपस्थित राहणार आहेत. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आमदार डॉ. तुषार गोविंदराव राठोड यांच्या शुभहस्ते भगव्याध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे यावेळी तहसीलदार राजेश जाधव, माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे आदीसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ९.३० वाजता राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक बाराळी नाक्यापासूनभव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्यावतीने शिव महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता भव्य पालखी सोहळा वशिवकालीन देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार असून कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड तर उद्घाटक म्हणून दिलीप पाटील बेटमोगरेकर हेउपस्थित राहणार आहेत. तीन दिवसीय या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या सर्व कार्यक्रमास शिवप्रेमी जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थितराहावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष नागनाथराव लोखंडे, शिवजन्मोत्सव समितीचेअध्यक्ष नरेश इंगोले, सचिव योगेश पाटील जाधव खंडगावकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील मसलगेकर, प्रशांत उल्लेवाड, सहसचिव दीपक पाटील जुने, कोषाध्यक्ष बालाजी माधवराव इंगोले, सौरभ पाटीलजोगदंड, योगेश पाटील हिवराळे, माधव देवकते, विश्वजीत पाटील इंगोले, सुरज पाटील जाधव, सचिनरिंदकवाले, सहसल्लागार विशाल बाबळे, सचिन पाटील इंगोले, रामदास पाटील जाधव, श्याम पाटीलइंगोले, बालाजी पा. इंगोले, गंगाधर पाटील जाधव आदींनी केले आहे.

    Read More »
  • साबीर अलीशाह खादरी उर्सनिमित्त संदलसह विविध कार्यक्रम उत्साहात.

    मौलाना नक्षबंदी यांचे व्याख्यान व लतीफ हैरा यांच्या कव्वालीचा रंगला समा. मुखेड / प्रतिनिधी. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हजरत सय्यद साबीर…

    Read More »
  • मुखेडात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड – भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तदि. ६ डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सामूहिक बौद्धवंदना आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिकायासह अनुयायीणी मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तरशहरातील फुलेनगर येथील बौद्ध मूर्ती पासून तर मिलिंद नगर येथील बौद्ध विहारा पासून शहरातील मुख्यरस्त्याने कॅन्डल मार्च काढण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मार्कात सकाळच्या सत्रातउपस्थित मान्यवरांनी सामूहिक वंदना करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण केले. समाजासाठी त्यांनीकेलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्व अधोरेखितकरण्यात आले. या सभेसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. जि.प. सदस्य दशरथरावजी लोहबंदे, गौतम काळे, के. एच. हसनाळकर, गंगाधर सोंडारे, दीपक लोहबंदे, कलमलाकर घोडके, डॉ. राहुल कांबळे, राजू घोडके, बाबुराव येवतीकर, इंजि. वाघमारे, भारतीताई काळे, भद्रेताई, कुलदीप कोतापल्ले, बाबुराव तांदळीकर, पी.एस. कांबळे, विठ्ठल शिरसाटे, संदीप बावलगावकर यांचा समावेश अनेक सामाजिक कार्यात असणारेअनुयायी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, बंधुत्व, आणि समतेच्याविचारांचा प्रसार करण्यासाठी उपस्थितांनी पुढाकार घेतला.

    Read More »
Back to top button