सामाजिक
-
केवायसी करूनही मिळेना ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा अनुदान; मुखेडमध्ये महिलांची नाराजी
मुखेड प्रतिनिधी:-( श्रमिक एकता न्यूज़ ) मार्च २६ शासनाच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत दरमहा मिळणारे अनुदान केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा होत नसल्याची तक्रार समोर आली आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुखेड तालुक्यातील काही महिलांनी अंगणवाडी केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून दिले होते. तसेच बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अनेक महिने उलटूनही त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. महिलांचे म्हणणे आहे की, सर्व कागदपत्रे वेळेत सादर करूनही अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. काहींना अर्ज मंजूर झाला की नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याचीतक्रार आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर प्रकरणांची चौकशी करून पात्र लाभार्थींना अनुदान वितरित करावे, अशी मागणी महिलांकडून होत आहे. सदर…
Read More » -
प्रभाग क्र.९ मध्ये नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर; नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा फज्जा
▫️कर भरतो आम्ही, नरकयातना भोगतोही आम्ही! तुंबलेल्या नालीमुळे प्रभाग ९ मधील नागरिक संतापले. मुखेड प्रतिनिधी:- ६ मार्च २६ शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला असून, येथील माजी नगराध्यक्ष कामजे यांच्या घराशेजारील मुख्य नाली कचऱ्याने पूर्णपणे तुंबली आहे. यामुळे नालीतील दुर्गंधीयुक्त काळे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात नरकयातना सोसाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक आणि नगर पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत…
Read More » -
समता नगर–अशोक नगर येथे १३५ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी भीमा युवा एल्गार मंडळाची कार्यकारिणी जाहीर
▫️अध्यक्षपदी गोरूपाशा शेख तर सचिवपदी वैभव शिरसे यांची निवड मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता ०५ मार्च २६ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त समता नगर व अशोक नगर परिसरात…
Read More » -
मुखेडमध्ये वाळू माफियांचा हैदोस; प्रशासन झोपेत? संयुक्त पथक नेमून तात्काळ कठोर कारवाईची मागणी
मुखेड (प्रतिनिधी) – ४ मार्च २६ मुखेड शहरातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन इंगोले यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात आज दि ०४ मार्च रोजी त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, मुखेड शहरातून लातूर, उदगीर, शिरूर ताजबंद, जांब बु., बाहेरहाळी रोड, सलगरा तसेच खरबखंडगाव–चांडोळा मार्गे शेकडो टिप्परद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. अनेक टिप्पर एकाच पावतीवर दोन–दोन वेळा दहा ते बारा ब्रास क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून शासनाचा महसूल बुडवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर टिप्पर भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार वाळू वाहतूक सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापूर्वी या कालावधीतच करणे अपेक्षित असताना, संबंधितांकडून दिवसरात्र २४ तास वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूदकरण्यात आले आहे. काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. यासोबतच, मुखेड तहसील अंतर्गत महसूल विभागाने मौजे सलगरा फाटा, कमळेवाडी फाटा व जांब येथे…
Read More » -
मुखेड बसस्थानकात प्रवाशांचे हाल; भिंतीवर ‘पिण्याचे पाणी’ फक्त नावालाच!
▫️प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल; प्रवाशांना विकतचे पाणी घेण्याची वेळ. मुखेड (प्रतिनिधी): ४ मार्च २६ राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना मुखेड बसस्थानकात मात्र प्रवाशांना पिण्याच्यापाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. बसस्थानकाच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘पिण्याचे पाणी‘ असे फलक लावण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र तिथे थेंबभरही पाणी उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.…
Read More » -
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शेख रफिक सेठ यांच्याकडून ईदगाहचे सर्वेक्षण
हिमायतनगर प्रतिनिधी:- २७ फेब्रुवारी २६ अजीम हिंदुस्तानी आगामी रमजान ईदच्या तयारीसाठी हिमायतनगरमध्ये प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज, २७ फेब्रुवारी रोजी हिमायतनगरचे नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी शेख रफिक सेठ यांनी स्थानिक ईदगाहला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ईदगाहच्या परिसराची स्वच्छता आणि इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला. ईदच्या निमित्ताने ईदगाहला नवीन रंगरंगोटी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगराध्यक्षांनी यावेळी घेतला, जेणेकरून सणाच्या…
Read More » -
मुखेड तालुक्यात अवकाळीचा तडाखा; रब्बी पिके आडवी, बळीराजा संकटात
मुखेड (प्रतिनिधी): २४ फेब्रुवारी २६ तालुक्यात सोमवारी (दि. २३) दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाच, सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊण ते एक तास चाललेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा आ ,आणि करडई ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणीज्वारी काढणीला आली होती, तर गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत होता. मात्र, वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमिनीला लागली आहेत. पावसामुळे हरभऱ्यालाही फटका बसला असून पिकांचा दर्जा घसरण्याची भीतीव्यक्त होत आहे. वादळी वाऱ्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याच्या आणि झाडेपडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडूनमदत जाहीर करावी, अशी मागणी मुखेड तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Read More » -
९ वर्षीय मेहरिन धुंदी यांचा आयुष्यातील पहिला ‘रोजा’ पूर्ण
मुखेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६ रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही उपासनेचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याचउत्साहाच्या वातावरणात मेहरिन मुजीब धुंदी या चिमुकलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजायशस्वीपणे पूर्ण केला आहे. भाजपाचे युवा नेते खाजा धुंदी यांची ती पुतणी आहे केवळ ९ वर्षांच्या असलेल्या अलिजा यांनी कडक उन्हाची आणि तहानेची तमा न बाळगता पहाटेपासूनसंध्याकाळपर्यंत मोठ्या धैर्याने हा उपवास पाळला. लहान वयातच दाखवलेली ही धार्मिक ओढ आणिसंयम पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संध्याकाळी इफ्तारच्या वेळी अलिजा यांचे अभिनंदन करण्यासाठी कुटुंबातील आजोबा करीमसाब…
Read More » -
दुःखद वार्ता: सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे निधन
मुखेड/हळणी: दि १८ फेब्रुवारी २६ सेवानिवृत्त सहायक महसूल अधिकारी शेख गुलाब यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनानेकुटुंबीयांवर तसेच सामाजिक ,शासकीय क्षेत्रात व हळणी परिसरात शोककळा पसरली आहे. शेख गुलाब यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केले. महसूल विभागात सहायकमहसूल अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळत जनतेची सेवा केली. त्यांच्या कामातीलपारदर्शकता, कर्तव्यदक्षता आणि साधेपणा यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि समाजातील विविध उपक्रमांनापाठिंबा दिला. त्यांच्या निधनामुळे समाजाने एक कर्तव्यनिष्ठ व सज्जन व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी स्मृतीसुगंधासारख्या नेहमीच सर्वांच्या मनात जिवंत राहतील. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच श्रमिक एकता न्यूज परिवाराकडून प्रार्थना अंत्यविधी स्थळ मुळगाव हळणी येथे आज दि १८ फेब्रुवारी सायंकाळी ०३:०० वाजता. होणार आहे
Read More » -
नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर
▫️14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड दि. 12 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत…
Read More »