सामाजिक

  • मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचार विरोधात विचार विनिमय बैठक संपन्न 

    नांदेड प्रतिनिधी:-  मुस्लिम अत्याचार संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी नांदेड येथे दि ४ एप्रिल रोजी नॅशनल कॉन्फरन्सफॉर मायनॉरिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामावेशक बैठकीचे आयोजनअब्दुल बशीर माजीद यांच्या वतीने करण्यात आले होते.  मशीदींवरील हल्ले , मुस्लिमांवरील हल्ले , मदरशांवरील हल्ले त्याचबरोबर  हेटस्पीच वक्फ बोर्ड सुधारणाविधेयक इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलेहोत.   या बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेल्या मुस्लिम विरोधी धार्मिक हिंसाचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्तकरण्यात आली असून अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्राचं पुरोगामीत्व संपवत आहेत. तसेच अशाप्रकारच्या सातत्यपूर्ण होणाऱ्या दंगली , हिंसाचाराच्या घटना व हेच स्पीचमुळे राज्यातील मुस्लिम समाजभयग्रस्त झाला असून या भीतीच्या छावटातून त्यांना काढणे आवश्यक आहे व यासाठी सर्व धर्मनिरपेक्षकार्यकर्त्यांनी, व्यक्तींनी पुढाकार घ्यायला हवा अशी भूमिका या बैठकीत व्यक्त करण्यात आली.  सदर घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी लवकरच राज्यव्यापी शांततापूर्वक वातावरणात आंदोलने करण्यातयेणार असलाचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील मागील १० वर्षांमध्ये घडलेल्या मुस्लिम अत्यांचारांच्याघटनांचे संकलन करून त्याचा विस्तृत अहवाल तयार करून तो राज्यपाल , राष्ट्रपती , मुख्यमंत्री , प्रधानमंत्रीयांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पाठविण्यात येणारअसल्याची माहिती यावेळी राहुल डंबाळे यांनी दिली.  या बैठकीत विविध जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते.  ज्यात प्रामुख्याने ॲड.  झेड सिद्दिकी साहेब , ॲड.  अब्दुल रहमान सिद्दिकी , ख्रिस्ती धरामगुरु रेवरंड जॉन्सन जेकब,  आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेशदादा गायकवाड, निवृत्त न्यायाधीश पटेल व निवृत्त न्यायाधीश शफातुल्ला खान,अल्पसंख्याकांचे नेतेफिरोज खान  लाला , श्याम वडजे पाटील , गंगाधर गायकवाड , विजय गाबने , मोहम्मद खान पठाण , मोहम्मद अझरुद्दीन , सय्यद शेर अली , शिरीन बेगम, रहीम अहमद खान , मोहम्मद वसीम , आरिफ खानपठाण  , नासिर खातीर ,  आबिद फिरदोस खान , मुखेड तालुकाद्यक्ष आसद बलखी , युवा जिल्हाध्यक्ष जलील पठाण,  जिल्हाध्यक्ष महेताब शेख , यांचेसह अनेक आजी–माजी नगरसेवक व राजकीय नेते याबैठकीत सहभागी झाले होते.  नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांनी बैठकीचे आयोजन केलेहोते. या बैठकीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील आठवड्यात छत्रपतीसंभाजी नगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी आणखीन एक विभागीय आढावा बैठक मुस्लिम अत्याचाराच्याअनुषंगाने घेण्यात येणार असल्याचेही अब्दुल बशीर माजिद यांनी सांगितले.

    Read More »
  • संशयीताच्या घरावर बुलडोझर चालवणे ही हुकूमशाही कोरटकर, सोलापूरकर यांच्या घरावर संरक्षण का?-डॉ श्रावण रॅपनवाड

    मुखेड प्रतिनिधी:- दि. २४ मार्च २५संवैधानिक न्यायव्यवस्थेची प्रतीक्षा न करता एका विशिष्ट समाजाच्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्या राज्य शासनाकडून महाराष्ट्राची…

    Read More »
  • नंदनवन येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला आग ;कुटुंब बेघर  मदतीची मागणी 

    कौठा प्रतिनिधी… कंधार तालुक्यातील नंदनवन येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन गोविंदराव भागानगरे यांचे राहत्या घरात दिनांक 17 रोजी दुपारी अचानक आग लागून संसार उपयोगी वस्तू ,अन्नधान्य, आवश्यक साहित्य जळूनखाक झाले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदनवन येथील शेतकरी घरास कुलूप लावून शेताकडे कामासाठी गेलेअसता दिनांक 17 रोजी दुपारी घरास अचानक आग लागली गावकऱ्यांनी आग  विझवण्याचा  प्रयत्न केलातोपर्यंत घरातील टीव्ही, अन्नधान्य, कुलर ,फ्रीज ,सोफा सेट, शेतीमाल जळून खाक झाले असून अंदाजे सात लाखाचे नुकसान झाले .जीवित हानी झाली नाही आगीचे कारण समजू शकले नाही . घटनेचा पंचनामा नंदनवन सज्जाचे तलाठी श्री कापसे यांनी केला.सध्या मोहन भागानगरे यांचे कुटुंब उघड्यावर असून शासनाने त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे

    Read More »
  • शिधापत्रिकारधाकांनी ई-केवाईसी करून घ्यावे अन्यथा अन्नधान्य योजनेचा लाभ सदस्याना मिळणार नाही :- तहसिलदार राजेश जाधव

    मुखेड/प्रतिनिधी:-   शासनाच्या अनुदानित अन्नधान्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राशनकार्ड धारकांनी सर्व सदस्यांची ई–केवाईसी करणे बंधनकारक आहे. रेशनकार्ड ई–केवाईसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणेबंद होणार आहे. अद्यापही तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थ्यांपैकी  ६८५६८ लाभार्थ्यांची ई–केवायसी होणे शील्लक आहे. त्यामुळे या सर्व राशनकार्ड धारकांनी ई –केवाईसी दि. ३१ मार्च पर्यंत तात्काळ करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार राजेश जाधव व नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे. राज्यातील नागरीकांना उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गतअनुदानित अन्नधान्य देण्यात येत असते. या योजनेमध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील राशन कार्डधारक कुटूंबाचा समावेश आहे. या अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील शिधापत्रिकेमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व सदस्यांची ई– केवाईसी करणे बंधनकारक आहे. केवायसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ त्या सदस्याला मिळणार नाही. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारक सदस्यांनी दि.३१ मार्च २०२५ पर्यंत आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे मुळ राशनकार्ड व आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतिसह रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या ई–पॉस मशिनवर सर्व सदस्यांनी बोटाचे ठसे देवून आपलीई–केवाईसी पूर्ण करुन घ्यावी.  तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण २१४८४७ लाभार्थी असून आज रोजी पर्यंत ८५०७१ लाभार्थ्यांची ई–केवायसी पूर्ण झालेली आहे. तर अद्यापही ६८५६८ लाभार्थ्यांची ई–केवाईसी होणे शिल्लक आहे. केवाईसी न केलेल्या राशनकार्ड धारकांना अन्नधान्य मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्डधारकांनी आपली ई केवाईसी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत करुन घ्यावी व होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन तहसिलदार राजेश जाधव आणि नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी निलेश रोहनकर यांनी केले आहे.

    Read More »
  • जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू           

    नांदेड दि. 17 मार्च :- नांदेड जिल्ह्यात 18 मार्च 2025 चे सकाळी 6 वाजेपासून ते 1 एप्रिल 2025 च्या मध्यरात्री…

    Read More »
  • ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे यांना शेळी, मेंढी विकास महामंडळावर घेण्याची मागणी

    मुखेड/प्रतिनिधी:- भटक्या व विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पु. अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मुखेड येथील ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे यांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी जि.प. सदस्य सुर्याजी पाटील चाडकर, पं. स. सदस्य शकरराव काळे, अॅड. मुरलीधरराव डाके, गंगाधर पाटील नारे, दिगांबर पिंपळे, माधवराव श्रीरामे आदी धनगर समाजाच्या नेत्यांनी माजी खा.डॉ. विकास महात्मे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. धनगर व भटक्या प्रवर्गातील समाजबांधवांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासनाने पुणे येथे पु. अहिल्यादेवीहोळकर शेळी व मेढी विकास महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळाचा सर्वसामान्यांना लाभ मिळवूनदेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघ संस्कारात वाढलेले, परिवारातील अनेक जबाबदाऱ्या निभावलेलेनिष्ठावंत कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे यांची नियुक्ती करुन सामान्य कार्यकर्त्याला न्यायद्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी पाटील चाडकर सरपंच चारवाडी,गंगाधर पाटील नारेडोंगरगांव, माजी पं. स. सदस्य शंकरराव काळे बिलोली, एडवोकेट मुरलीधरराव डाके हादगाव, एड.प्रशांतकोकणे, शिवाजी पाटील हंगरगेकर, शेळगावचे सरपंच संजय पाटील चोंडे, हाणमंतराव मावले उपसरपंचचारवाडी, माधवराव श्रीरामे,माधव पाटील घोणसे, नारनाळीचे सरपंच भुजंगराव देव्हारे, युवा उद्योजक गणेशबिरु, विलास गावंडे माहूर, दिगांबर पिंपळे मरवाळीकर, चिवळीचे सरपंच संदिप पाटील जायनूरे, दिगांबरमाने सर, गोपाळराव म्हेत्रे सर, साहेबराव पाटील नारे, शिवशंकर पाटील देवकत्ते, बालाजी पाटील नारे सर, माजी सरपंच हणमंतराव वनाळे पाटील, प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे परभणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

    Read More »
  • मुखेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारीच्या समक्ष जनतेच्या तक्रारींचा निपटारा

    मुखेड प्रतिनिधी:-  मुखेड पंचायत समिती येथे  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याउपस्थितीत मंगळवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या तक्रार निवारण दिनाच्यानागरिकांच्या समस्यांवर चर्चा करुन त्याचे निवारण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पसंचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळउपाययोजना करण्याचे आदेश दिले. तक्रार निवारण दिनाच्या आयोजनामुळे नागरिकांना त्यांच्यासमस्यांबाबत त्वरित उत्तर मिळाली. तक्रार निवारण उपक्रमामुळे प्रशासन व नागरिकांमध्ये सुसंवादाची भावना निर्माण झाली. तसेच समस्यांचेत्वरित निराकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी दिलेले निवेदन जिल्हा स्तरावर संबंधीत विभागप्रमुखांना वर्ग करण्यात आले असून त्या तक्रारीचे लवकरच निवारण करण्यात येणार आहे. तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमारमुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जलजिवन मिशचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी नारायण मिसाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, समाजकल्याण अधिकारीसत्येंद्र आऊलवार, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी थोरात, कार्यकारी अभियंता भोजराज, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार तसेच विविध विभागाचे खाते प्रमुख, गटविकास अधिकारी सी. एल. रामोड आदींची उपस्थिती होती

    Read More »
  • सावली फाऊंडेशनच्या वतीने मठ संस्थान परिसरात व्यायाम शाळेची मागणी

    खासदार रविंद्र पाटील यांच्या कडून सावली फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक बेटमोगरा प्रतिनिधी:-  बेटमोगरा येथील ऐतिहासिक श्री.शिवलिंग बादशाह मठ संस्थान परिसरात व्यायामशाळा मंजूर करण्यातयावा या मागणीचे निवेदन आज सावली फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्याचे खासदार मा.रविंद्रपाटील चव्हाण यांना दिले. याप्रसंगी शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठाधिपती श्री.सिद्धदयाळ शिवाचार्यमहाराज बेटमोगरेकर यांनी सावली फाउंडेशनच्या कार्याचे, निसर्ग मित्रांच्या दैनंदिन मेहनतीचे व मिळतअसलेल्या यशाची सखोल माहिती खासदार यांना दिली. यादरम्यान खासदार रविंद्र पाटील सावली फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत व्यायाम शाळेच्या प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन देत सावली फाउंडेशनच्या उद्यानातील सर्व झाडांची पाहणी केली. याप्रसंगी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, डॉ.यशपालजी भिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी,धनराज पाटील, बालाजी पाटील,श्रीधर पाटील,डॉ.फारुख शेख,इस्माईल शेख,गणू सावकार अन्सापूरे, मुस्तफा पिंजारी,शमशुद्दीन शेख, आसलम दौलताबादी सह आदींची उपस्थिती होती.

    Read More »
  • नाच गाण्यावर लाखो रुपये खर्च करून महसूल क्रीडा महोत्सवाला निधी देणा-या आमदारांना दिव्यांगाचा पडला विसर :- साळवे

    जिल्ह्यातील दिव्यांग निधीसाठी झिजवतात आमदारांच्या ऑफिसच्या पायऱ्या नांदेड प्रतिनिधी :नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात संख्या असून त्यांना…

    Read More »
  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण

    बालेवाडी, पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण  नांदेड येथील कार्यक्रमात खासदार डॉ. अजित गोपछडे यांची उपस्थिती  घरकुलांचे बांधकाम गतीने होण्यासाठी…

    Read More »
Back to top button