क्राईम

  • ZP शाळेत धक्कादायक प्रकार: नराधम शिक्षकाकडून ५ चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

    मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६ भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. ज्या शिक्षकावर मुलांच्या भविष्याची जबाबदारी असते, त्याच शिक्षकाने पाच अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पवनी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्याच शाळेतील पाच लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे. एका पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. अनिल राऊत असं अटक केलेल्या नराधम शिक्षकाचं नाव आहे. तो मागील पाच वर्षांपासून पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने याच शाळेतीलपाच निष्पाप मुलींसोबत अश्लील आणि लैंगिक कृत्य केलं. इतकेच नाही, तर या कृत्याबाबत कुणालाकाहीही सांगितल्यास ‘जीवे मारण्याची धमकी‘ देऊन त्याने मुलींना घाबरवलं होत  आरोपीच्या या कृत्यामुळे मुली प्रचंड दहशतीखाली होत्या. मात्र, अत्याचार सहन न झाल्याने अखेर एका पीडित मुलीने आपल्या पालकांकडे धाडसाने सर्व हकीकत सांगितली. आपल्या मुलीसोबत घडलेला हाप्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. याबाबत अधिक चौकशी केली असता नराधमाने अशाप्रकारे शाळेतील इतर मुलींचं देखील शोषण केल्याचं समोरआलं. या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळा गाठून आरोपी शिक्षक अनिल राऊतयाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर तात्काळ पवनी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शाळेत धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी अनिल राऊत याच्यावर बाल लैंगिकअत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो – POCSO) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला…

    Read More »
  • नांदेडमध्ये खळबळ: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या त्रासाला कंटाळून भावी डॉक्टरची आत्महत्या;गुन्हा दाखल !

    नांदेड प्रतिनिधी:- ०८ मार्च २६  नांदेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने वसतीगृहात गळफास घेऊनआत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी हडको परिसरात ही घटना घडली. आकांक्षा मुंजाजी गायकवाड असंया तरुणीचं नाव आहे. “वसतीगृहाची फीस थकल्याने वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली,” असाआरोप पीडित कुटुंबीयाने केला. त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकचखळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिकम हाविद्यालयातील द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती. आई वडील वीट भट्टीवर मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेश चिटणीस जीवन घोगरेपाटील यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीत त्यांनी कॉट बेसिसवर सुरू केलेले वसतीगृह आहे. मागील दोन वर्षांपासून आकांक्षा ही कॉट बेसिसवर राहत होती. शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहाच्या खोलीतपंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले. आठ महिन्यापासून फीस थकल्याने जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास सुरु होता, त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. दरम्यान, या वसतीगृहात ४० हून अधिक मुली कॉट बेसेसवर राहतात. महिन्याला प्रत्येकी अडीच हजाररुपये वसतीगृह चालकाकडून घेतले जायचे. या वसतीगृहाला परवानगी नसल्याचे बोलले जात आहे. दजीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाणमांडले होते. त्यानंतर पोलिसांकडून घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    Read More »
  • मुखेडकरांमध्ये भीतीचे वातावरण; दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरटे पसार.

    ▫️भरदिवसा झालेल्या चोरीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. मुखेड प्रतिनिधी: ( श्रमिक एकता न्यूज़) ०७ मार्च २६  शहरातील शारदानगर भागात गुरुवारी भरदिवसा घरफोडीची खळबळजनक घटना घडली. चोरट्यांनी बंदघराचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या–चांदीचे दागिने असा एकूण ५० हजारांहून अधिकचा ऐवज लंपास केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून शहरात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. फोटोग्राफर व व्यापारी असलेले ज्ञानेश्वर पडलवार हे गुरुवारी घरातून दुकानासाठी मुखेड येथे गेले. दुपारी१२ वाजेदरम्यान त्यांची पत्नी बाहेर गावाहून घरी परतल्या असता घराचा लाकडी दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळला त्यांनी पतीला फोन करून बोलावले व पाहणी केली असता कपाटाचे दार तोडून नगदी ५५ हजार रुपये, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले व अंदाजे एक तोळा चांदी असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरूननेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी नांदेड येथून श्वानपथक पाचारण केले. श्वानपथक प्रमुख महमंद आयुब व दत्ता गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. बातमी साठी…

    Read More »
  • मुखेड वनविभाग ‘कोमात’, लाकूड तस्कर ‘जोमात’; अवैध वृक्षतोडीने पर्यावरणाचे मोठे नुकसान

    मुखेड प्रतिनिधी: २४ फेब्रुवारी २६ निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकीकडे वृक्षारोपणाचे कोट्यवधींचे टार्गेट दिले जाते, तर दुसरीकडे मुखेड तालुक्यामध्ये वनविभागाच्या नाकाखाली वनसंपदेची दिवसाढवळ्या कत्तल सुरू आहे. मुखेड तालुक्यातील बारहाळी , मुक्रमाबाद, जाहुर, राजूरा, आंबुलगा , ईडग्याल ही गावे कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या अगदी जवळ असल्यामुळे या भागातून दररोज सुमारे ५० हून अधिक  ट्रॅक्टर आणि ट्रक लाकूड भरून राज्यात व परराज्यात लाकूड अवैध मार्गाने विकले जात आहे . विशेष म्हणजे, यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही वनविभाग ढिम्म असल्याने “वनविभाग कोमात आणि तस्कर जोमात” अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ​मुक्रमाबाद , बाऱ्हाळी , जाहूर , राजूरा, आंबुलगा , ईडग्याल अवैधरीत्या तोड करून ती लाकडे मोठ्यावाहनांतून वाहून नेली जात आहेत. (सोबतच्या छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे) लाकडांनी भरलेली हीवाहने मुख्य रस्त्यावरून बिनदिक्कतपणे जात असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. या तस्करांना कोणाचे अभय लाभले आहे? असा सवालआता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. ​हवे तसे परवाने? : एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाकूड वाहतूक होत असताना वनविभागाकडे याचे रीतसरपरवाने आहेत का? की केवळ अर्थपूर्ण तडजोडीतून हा ‘हिरवा‘ बाजार सुरू आहे?…

    Read More »
  • सावधान! दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार केल्यास होणार जेल; नांदेड जिल्ह्यात ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा’ लागू

    नांदेड प्रतिनिधी:- २३ फेब्रुवारी २६ जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने…

    Read More »
  • मुखेड शहरात व्यसनाच्या विळख्यात अडकले कमी वयातील मुलं.

    ▫️शहरालगत असलेले ले आऊट बनले अय्याशीचे अड्डे ▫️१३ वर्षांखालील मुलांमध्ये गांजा व तंबाखूचे वाढते व्यसन मुखेड प्रतिनिधी:- २९ जानेवारी २६ मुखेड शहरात अल्पवयीन मुलं व्यसनाच्या अधीन असल्याचे एक चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे. शहरातील विविध शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये ड्रग्स, गांजा आणि अन्यव्यसनांचा वापर वाढत असल्याचे समोर आले आहे. सरासरी किराणा दुकानावर गुटखा, मावा, तंबाखूयासारखे व्यसनाचे पदार्थ सहज उपलब्ध असल्याने अल्पवयीन मुलं व्यसनाचे अधीन होत आहेत. शहरात गुटखा, गांजा सारखे अमली पदार्थ चौका चौकात सहज मिळत असल्याने तरुणाई व अल्पवयीन मुलं मुली व्यसनाचे अधीन होत आहे. लपून छपून नशा करणाऱ्यांसाठी शहरालगत असलेले ले आऊट अय्याशीचे अड्डे बनले आहे. अंधार पडताच शहरातील कौठा रोड,जुनी…

    Read More »
  • पूर्णाच्या लॉजमध्ये नांदेडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

    ▫️मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही पूर्णा :- १८ जुलै २५ शहरातील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या ‘इंडियन लॉज’मध्ये नांदेड येथील…

    Read More »
  • जाहूर येथील तलावात  उडी मारून वयोवृद्धाने केली आत्महत्या

    मुखेड  :- १८ जुलै २५ मुखेड : तालुक्यातील येवती येथील वयोवृद्ध गोविंद रामराव सुडके ८२ वर्ष यांनी जाहूर येथील तलावातउडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १७ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याआत्महत्येचे कारण आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा गावात होत आहे . सुडके हे १५ जुलै रोजी ” जाहुर येथे बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते पैसे काढून आपल्या पत्नीला दिल्या वर…

    Read More »
  • धक्कादायक ! २५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

    ▫️विद्या सुकळे यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे अद्याप गुलदस्त्यात पोलिसांकडून सखोलतपास सुरू मुखेड/एकलारा १७ जुलै २५ विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . विद्या सुशील सुकळे (वय २५) असे तिचे नाव आहे  ही घटना एकलारा गावात सोमवारी (दि. १५ जुलै) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षकमंचक फड आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी…

    Read More »
  • फी’साठी मुजोर संस्थाचालकानं केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं 

    पूर्णा तालुक्यातील घटना :दोघांनवर गुन्हा दाखल  परभणी:- १२ जुलै २५ आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकाला फीससाठी चक्क संस्थाचालकाने…

    Read More »
Back to top button