Sharmik Ekta

  • संपादकीय

    बोगस दिव्यांग सावधान ; आता एसटी प्रवासातही होणार दिव्यांग तपासणी

    ◽️बनावट कार्ड आढळल्यास थेट गुन्हा दाखल होणार नांदेड:- प्रतिनिधी:- २८ जानेवारी २६ राज्यात दिव्यांग तपासणीच्या सूचना दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिल्यानंतर यातपासणी मोहिमेला गती आली आहे. आता राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही प्रवासात दिव्यांगांचे यूडीआयडी कार्ड तपासण्याच्या सूचना दिल्या असून, संशयास्पद कार्ड जप्त केली जाणार आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दिव्यांग प्रवाशांना एसटी बसमध्ये सवलत दिली जाते. मात्र, राज्यात अनेक बनावट दिव्यांग आढळत आहेत. काही कर्मचार्‍यांनी तर नोकरीत व बदल्यांमध्येही या दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे. दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी बनावट दिव्यांग शोधमोहीम सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून दिव्यांगांची तपासणी सुरू झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळालाही सूचना दिल्या आहेत.…

    Read More »
  • क्राईम

    नांदेडमध्ये सुनेनेच केला सासूचा खून; अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

    नांदेड प्रतिनिधी:- २८ जानेवारी २६ नांदेड: जिल्ह्यातील हदगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या सासूचा सुनेनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने गळाआवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत महिलेची सून, तिचा प्रियकर आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. कमलाबाई क्षीरसागर (वय ५४) असे मयत महिलेचे नाव आहे. नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कमलाबाई क्षीरसागर या हदगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होते. त्यानंतर त्या आपली विधवा सून सुनीता(वय ३५) आणि नातवासोबत राहत होत्या. मात्र, सून सुनीताचे तिच्यापेक्षा वयाने ८ वर्षे लहान असलेल्या परमेश्वर वानखेडे (वय २६) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पतीच्या निधनानंतर हे संबंध अधिकच वाढलेहोते. असा रचला हत्येचा कट कमलाबाई यांना सुनेच्या या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली होती आणित्यास त्यांचा सक्त विरोध होता. यावरून सासू–सुनेमध्ये वारंवार खटके उडत होते. आपल्या प्रेमात सासू अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुनीताने प्रियकर परमेश्वर सोबत मिळून सासूचा काटा काढण्याचे ठरवले. १० जानेवारीच्या रात्री कमलाबाई गाढ झोपेत असताना, सुनीता आणि परमेश्वरने स्कार्फने गळाआवळून त्यांची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीताने आपला भाऊ अमोल इटकरेआणि नातेवाईक अक्षय कदम यांची मदत घेतली. त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरून दुचाकीवरून नेलाआणि वाळकी फाटा येथील पैनगंगा नदीपात्रात फेकून दिला. सुरुवातीला सासू बेपत्ता असल्याची तक्रारनातवाने दिली होती, परंतु नदीपात्रात मृतदेह सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी लावला छडा हदगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने फिरवला. यात मयत महिलेची सून आणि तिच्या प्रियकराच्या हालचालीसंशयास्पद आढळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच सुनेने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड तहसील कार्यालयात पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

    ▫️उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांनी दिल्या शुभेच्छा. मुखेड प्रतिनिधी:- दर्पण दिन व मकर संक्रांतीचे औचित्य साधून देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांच्या संकल्पनेनुसार मुखेड तहसील कार्यालयात दि. १६ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना शाल, पुष्पहार, डायरी, लेखणी व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ६ जानेवारी या दर्पण दिनाचे औचित्य साधून संबंध देशामध्ये फाकार दिन साजरा केला जातो त्याअनुषंगाने दि.१६ जानेवारी रोजी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनी मुखेड शहर व परिसरातील फाकारांचा यथोचित सन्मानकरून गौरव केला. यावेळी तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार एस. एस. मामीलवाड, निवासीनायब तहसीलदार शालिनी धुळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, नांदेड जिल्हा मराठीपत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप कामशेट्टे, जिल्हा संघटक सुनिल पौळकर, मुखेड तालुका मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष महेताब शेख, संपादक ज्ञानेश्वर डोईजड, असद बल्खी, बबल्ल मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार राजेश जाधव यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकारसंघाचे अध्यक्ष महेताब शेख यांनी केले. प्रशासनाच्या वतीने उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार शालिनी धुळे यांनी मानले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड व सचिव राजेश बंडे यांनी दर्पण दिनानिमित्त आपल्या मनोगतातुन पत्रकारितेचे महत्व व व्यथा व्यक्त केल्या. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटकएस. एस. हुड्डें, तालुकाध्यक्ष परमेश्वर वारे, सचिव यु.पी. सुभेदार, तलाठी संघटनेचे सचिव सतिश देशमुख, सहाय्यक महसुल अधिकारी मोईन शेख रुपेश मुधोळकर, महसूल सहाय्यक प्रशांत लिखेंकर, के. व्ही. महाडीवाले, संगिता वाडीकर, कमलावती कल्लेपवार, अनुराधा चिनसबवार, गंगागीर गिरी, दफेदारजि.एम. पिंगळे, गोविंद भास्करे, गौस शेख, राजेश जाधव, माधव गायकवाड, शरद नरबागे, संदीप गायकवाड, श्रीकांत श्रीरामे, रविना लुगारे, धम्मशिल्ला हणमंते यांच्यासह सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व तहसिल कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड तहसीलदाराच्या लेखी अश्वासनाने वयोवृद्ध महिलेचे बेमुदत उपोषण सुटले

    ▫️मास संघटनेच्या कार्याला अखेर यश मिळाले. मुखेड-प्रतिनिधी:- १६ जानेवारी मुखेड तालुक्यातील मौजे खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरीबा कांबळे यांच्या नावे…

    Read More »
  • Uncategorized

    शेतकरी, शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली

    ▫️डॉ. पुंडे यांना राष्ट्रपतींकडून विशेष निमंत्रण ▫️भारतामधून ११ डॉक्टरांचा विशेष कार्याबद्दल सन्मान ▫️”हा सन्मान माझा एकट्याचा नसून आई–वडील, पत्नी, गुरुजन, कर्मचारी व रुग्णांचा” – डॉ. पुंडे मुखेड प्रतिनिधी:- १६ जानेवारी  जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य, मुखेड भुषण डॉ. दिलीपराव पांडुरंग पुंडे यांना दिनांक २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे राष्ट्रपती भवना मार्फत विशेष निमंत्रण प्राप्त झालेआहे. सदरील निमंत्रण हे रिसेप्शन अॅट होम या कार्यक्रमाचे असून भारतामधून ११ डॉक्टरांना त्यांच्याविशेष कार्याबद्दल निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात नांदेड ज्ह्यिातील मुखेड या ग्रामीण भागात मागील३८ वर्षांपासूनच्या सर्पदंशावरील विशेष कायार्ची दखल घेत राष्ट्रपती भवनामार्फत नदिड येथील मुख्यपोस्टातील वरिष्ठ अधिकारी अरुण गायकवाड, त्यांची टिम व मुखेड पोस्टातील सर्व अधिकारी, कर्मचारीयांनी स्वतः येऊन डॉ.पुंडे व सौ. माला पुंडे यांना निमत्रंण दिले. सदर कार्यक्रम २६ जानेवारी रोजीसायंकाळी चार वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. मागील ३८ वर्षांपासून डॉ. दिलीप पुंडे हे सेवावतीने या भागात आरोग्य सेवा देत आहेत. १९८८ ते १९९७ याकाळात ग्रामीण रुग्णालय मुखेड येथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. १९९७ पासून पुंडेहॉस्पिटल मुखेड येथे ते कार्यरत आहेत. आजपर्यंत लाखो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. सर्पदंशाच्या दहा हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले. सर्पदंश हा शेतकरी व शेतमजूरयांचा काल मर्यादित अपघात असून वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू संभवतो.  मुखेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दिलीप मुंडे म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझेदिवंगत आई–वडील (के. भीमाबाई व कै. पांडुरंगराव पुंडे), सर्व गुरुजन, पत्नी सौ. माला पुंडे, पुढेहॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे हजारो रुग्ण यांचा आहे भारतात दरवर्षी किमान एक लाखाच्यावर मृत्यू सर्पदंशामुळे होतात. २०३० पर्यंत सर्पदंशाचा मृत्यूदर ५०टक्के कमी करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सध्या देशात सर्पदंशाविषयी अनेक उपक्रम कार्यान्वित केले आहेत. शेतकरी, शेतमजूर व सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली याचा मला विशेष आनंद आहे. मी भारताच्या महामहीम राष्ट्रपती, मराष्ट्रपती भवन, महासंचालक आरोग्य सेवा भारत मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांच्या या सन्मानाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे 

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड तहसील कार्यालयासमोर ८० वर्षीय वृद्ध महिलेचे बेमुदत उपोषण

    ▫️मयत पतीची हडप केलेली जागा परत मिळवून देण्याची मागणी मुखेड-प्रतिनिधी १४ जानेवारीमुखेड तालुक्यातील मौजे खरबखंडगाव येथील श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे…

    Read More »
  • सामाजिक

    राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव साजरा

    मुखेड प्रतिनिधी:- १३ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा दि. १२ जानेवारी रोजी थाटात साजरा करण्यात आला. संस्कारातून शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची बीज रोवली गेली अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्ञानाचा दीप पेटवून अंधार दूर करणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले, आणि उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असा मंत्र देत तरुणाईला आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व अध्यात्माची दिशा देणारे स्वामी विवेकानंद या तिन्ही महामानवांच्या जयंती एकत्र साजऱ्याकरत त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रध्यापक बालाजी इंगोले सर राजमुद्रा सघटनेचे सचिन पा इंगोले, संभाजी ब्रिगेडचे सदानंद पा जाधव, अ भा छावा सघटनेचे गिरीधर पाशिंदे केरुरकर, शरद पा सचिन चिखलीकर, कपिल काटेवाडे वाडीकर, रोहित भोसले, मनोज इंगोले, वैभवइंगळे, शुभम जाधव, आकाश पा शिदे, गोविंद पा आर्मी, शिवराज पा जाधव, पाटील, दिपक जुने, अंकुश इंगोले, गजानन गोजेवार, आभिजीत घोगुरवार, ज्ञानेश्वर जाधव, राहुर टिकोरे, संदेश जाधव, लक्ष्मण देसाई, राजेश वाघमारे, सोहम भिसे शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.

    Read More »
  • क्राईम

    अवैध उत्खननावर दबंग जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड, दि. १२ जानेवारी :- लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैधवाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धडक कारवाई करत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवार ११ जानेवारी रोजी लोहा तालुक्यातील मौजे येळी येथे नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूअसल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिलेयांनी रात्री सुमारे १०.३० वाजता प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी नदीपात्रात अवैध उत्खनन सुरू असताना ३ हायवा ट्रक, ७ जेसीबी, १ मोठी फायबर बोट व ४ तराफे आढळून आले. तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना घटनास्थळी बोलावून अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ४५ ब्रास वाळूचासाठा देखील जप्त करण्यात आला असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ कोटी ३२ लाख रुपये इतकीआहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल तहसील कार्यालय, लोहा येथे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यातील अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर निश्चितच आळा बसण्यास मदतहोईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

    Read More »
  • सामाजिक

    येवती येथे १० जानेवारी रोजी जंगी कुस्तीचा सामना !

    मुखेड ता. प्रतिनिधी ०८ जानेवरी २६ मुखेड तालुक्यातील तिर्थक्षेत्र लघु आळंदी म्हणून ओळखले जाणाऱ्या परम पूज्य श्री सद्गुरू नराशाम महाराज…

    Read More »
  • सामाजिक

    आज बडी दर्गाह उर्स; कंधार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

    कंधार प्रतिनिधी:- ०६ जानेवारी २६ हिंदू–मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले प्रसिद्ध सुफीसंत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम सय्यद सईदीद्दीन रफाई (रहे.) यांच्या ७११ व्या उर्साला आज मंगळवारी, दि.६ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या उर्सामध्ये संदल मिरवणूक, कुस्त्यांची दंगल, कव्वालीचा मुकाबला, हास्यकवी संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आज मंगळवारी, दि.६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता नमाज नंतर बडी दर्यातून संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवारी, ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. संध्याकाळी ८ वाजता टी.व्ही. सिंगर बेबीजारा वारसी (दिल्ली)) व टी.व्ही. सिंगर साखीब आली साबरी (उत्तरप्रदेश) यांचा कव्वालीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच मंगळवारी, दि. ६ जानेवारी व बुधवारी, दि.७ जानेवारी रोजी लंगरचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी, दि.८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता कुलहिंद मजाहीया मुशायरा (हास्यकवी संमेलन) आयोजित करण्यात आला आहे. या कवी संमेलनात नामांकित कवी उर्सानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ…

    Read More »
Back to top button