Sharmik Ekta

  • क्राईम

    ११ कोटी २ लाख किंमतीच्या १९ अवैध गौण खनिजने भरलेल्या गाड्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडल्या

    नांदेड (प्रतिनिधी) दि ०५.जानेवारी २५ नांदेड ग्रामीण पोलीसांनी १९  हायवा गाड्या पकडल्या असून त्या हायवांची किंमत ११ कोटी २ लाख ९५ हजार रुपये आहे. या सर्व गाड्या अवैध मुरूम भरलेल्या होत्या. या प्रकरणात १९ नावांसह त्या हायवागाड्यांच्या मालकाचे नाव सुध्दा आरोपी सदरात नमुद करण्यात आले आहे. पोलीस उपअधिक्षक प्रशांतशिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा काळे, पोलीस उपनिरिक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार हरीश मांजरमकर, रामकिशन मोरे, नितीन मुसळे, विनोद पवार, जायभाये, मारोती भंगे, विष्णु कल्याणकर, संतोष पवार आणि वसंत केंद्रे यांनी असर्जन नाका ते भगतसिंघ रोडकडे जाणाऱ्या कौठा येथील रस्त्यावर १९ हायवा गाड्या थांबविल्या. त्यांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. ▫️अशोक लिलैंड कंपनीचे एकूण १० हाथवा ज्याचे पार्सीग क्र. १) MH ४० CD ०६३९, २) MH २६ CN ९९९४, ३) MII ४०…

    Read More »
  • Uncategorized

    क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा काव्य जागर…!

    भारतीय महिलांच्या कर्तबगारीचा जेंव्हा जेंव्हा उल्लेख केला जातो तेंव्हा तेंव्हा सावित्रीमाई फुले यांचे नाव अग्रस्थानी घेतल्या जाते. भारतीय इतिहासात ज्यांची सुवर्णाक्षरांनी विशेष नोंद घेतली आहे, अशा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा आज जन्मदिन. सावित्रीमाई फुले आणि स्त्री शिक्षण हे एकाचनाण्याच्या दोन बाजू आहेत. महात्मा जोतीबा फुलेंनी एका बाजूने सामाजिक परिवर्तनाची लढाई लढत असताना दुसऱ्या बाजुला त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीमाई फुले महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावूनस्त्री शिक्षणाची धगधगती क्रांतीकारी मशाल हाती घेऊन आपले ऐतिहासिक कार्य पुढे नेटाने चालविले. जिच्या हातात फक्त पाळण्याची दोरी होती त्या हातात राष्ट्रध्वज फडकविण्याची दोरी येईपर्यंतचा थक्क करणारा प्रवास रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. सावित्रीमाई फुले फक्त स्त्रियांच्या शिक्षणापुरते आपले कार्य मर्यादीत न ठेवता अनेक समाजोपयोगी कार्यात विधायक आणि सृजनात्मक क्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. सावित्रीमाई फुले यांचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे त्या उत्तम प्रकारच्या कवयित्री होत्या. त्यांनी स्त्रियांच्या शैक्षणिक प्रश्नावरकार्य करीत असताना आलेले दाहक अनुभव त्यांच्या काव्य रचनेतून दिसून येते. त्यांनी समाज जागृती करीता काव्य जागरच्या माध्यमातून कार्य करुन एका दृष्टीने वाङ्‌मय क्षेत्राला देखील खऱ्याअर्थाने अधिक समृद्ध करण्यात आपले उचित असे योगदान दिले आहे. सावित्रीमाई फुले यांनी‘काव्यफुले‘ (1854) आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकार‘ या दोन प्रमुख काव्य संग्रहाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा स्त्री शिक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रबोधनात्मक काव्यांची निर्मिती केली. ज्यामध्ये त्यांनी इंग्रजी आईच्या आगमनाचे स्वागत करीत शुद्र आणि स्त्रीयांच्या मुक्तीसाठी शिक्षणाला अत्यावश्यक मानले आणि ‘ज्ञान हेच खरे धन‘ आहे असे मौलिक विचार त्यांनी तळागाळापर्यंतपोहोचविले. सावित्रीमाईच्या कवितांची काही ठळक वैशिष्ट्ये, त्यांचा विचार जर केला तर असे स्पष्ट जाणवते की, शिक्षणानेच अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि प्रगती साधता येते. ज्ञान हे धन यासारख्या कवितेतून शिक्षणाचे…

    Read More »
  • सामाजिक

    डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने महिलेला हरवलेली पिशवी मिळाली

    ▫️समितीने दाखवून दिले माणुसकीचे आदर्श उदाहरण मुखेड प्रतिनिधी:- ३० डिसेंबर २५ मुखेड–आठवडी बाजारासाठी तालुक्यातील मौजे. कर्णा या गावातून मुखेड शहरामध्ये आलेल्या एकागरीब महिलेची हरवलेली पिशवी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने सुस्थितीत सापडली असून आतमध्ये एक मोबाईल व महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवीचा शोध लाऊन परत मिळाल्यामुळे सदर चिंताग्रस्त महिलेला अत्यानंद झाला. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाज सेवा समिती ही शहरातील सर्व धर्म समभाव विचारांचे एक परिवर्तवादी युवा सामाजिक कार्यकर्ते एस.के.बबलू यांच्या अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्षांपासून सामाजिकसलोखा जोपासून समाजात मानवतावादी विचार पेरण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी तालुक्यातील मौजे. कर्णा येथील एक अतिशय गरीब महिला बाजारकरून गावी परत जाण्यासाठी बसस्थानकात गेली असता तिच्या जवळची मोबाईल सहतहसील व शेतीकामासाठीची महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी चुकून दुसऱ्या व्यक्तीकडे गेली असता शहरातील डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या प्रयत्नाने महिलेच्या हरवलेल्या पिशवीचा शोध घेऊनसदर पिशवी महिलेस सुस्थितीत परत दिल्यामुळे तिचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाजसेवा समितीचे उपाध्यक्ष रौफ मुल्ला, सचिव इस्माईल पठाण, कोषाध्यक्ष अब्दुलसय्यद, असद बल्खी, गौस पठाण, खदिर शेख, सोहेल मुल्ला, अरबाज बागवान, आंतेश्वर कांबळेयांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम समाजसेवा समितीने सदर गरीबमहिलेची हरवलेली पिशवी शोधून तिच्या स्वाधीन करून समाजाला माणुसकीचे एक आदर्श उदाहरण दाखवून दिले.

    Read More »
  • क्राईम

    सावधान ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल, तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार !

    ◽️यंदा निवडनूकांमुळे थर्टी फर्स्ट जंगी होणार  मुखेड (प्रतिनिधी) बल्खी आसद ३० डिसेंबर २५ सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या जल्लोषाला गालबोट लागू नये, यासाठी नांदेड जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर आणि भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांची रवानगी थेट कोठडीत केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. नगरपालिका निवडणुकांचा हंगाम नुकताच संपल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे यंदाचा ‘थर्टी फर्स्ट‘ अधिक जंगी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन शहराच्या चारही कोपऱ्यांवर कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. विशेषतः हॉटेल, ढाबे आणि शहराबाहेरील रस्त्यांवर गस्त वाढवण्यात येणार आहे.…

    Read More »
  • राजकीय

    हिमायतनगर नगर पंचायत स्विकृत्त नगरसेवक पदासाठी ही तीन नावे सर्वाधिक चर्चेत

    ▫️एकाच्या घरातून काँग्रेसचा जन्म तर दोन काँग्रेस चे विश्वासू हिमायतनगर प्रतिनिधी:- २९ डिसेंबर गेल्या काही दिवसांपूर्वी हिमायतनगर नगर पंचायत ची…

    Read More »
  • राजकीय

    मुखेडमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चा 

    मुखेड प्रतिनिधी:- २८ डिसेंबर  बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंगदल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरुवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजतामुखेड शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वीरभद्र मंदिर येथून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्यासंख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान मुखेड बस स्थानक चौकात बांगलादेशविरोधी निषेध व्यक्त करत प्रतीकात्मक स्वरूपातबांगलादेशच्या पंतप्रधानाचा पुतळा जाळण्यात आला तसेच घोषणाबाजी करण्यात आली. उपस्थितांनीबांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवावेत, तेथील हिंदू समाजाला संरक्षण मिळावे, अशीठाम मागणी केली. यानंतर मोर्चा मुखेड तहसील कार्यालयात पोहोचला. तेथे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनसादर केले. या निवेदनात बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची गंभीर दखल केंद्रसरकारने घ्यावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करून हिंदूंच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षणसुनिश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली. मोर्चादरम्यान “बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार बंद करा”, “हिंदू सुरक्षित राहावेत” अशा घोषणादेण्यात आल्या. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. कार्यक्रमाच्या ठिकाणी कायदा–सुव्यवस्था अबाधितराहावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती व पोलिस बंदोबस्त ठेवण्यातआला होता. या आक्रोश मोर्चात शहर व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

    Read More »
  • सामाजिक

    मुखेडच्या पोस्टात अपुरे मनुष्यबळ; कामाचा ताण वाढला ; विलंब सेवेमुळे नागरिकांची गैरसोय

    ▫️२ टपाल सेवकांवर शहराचा भार, किमान ४ सेवक आवश्यक मुखेडः प्रतिनिधी 28 डिसेंबर मुखेड शहराची झपाट्याने बाढत चाललेली लोकसंख्या, विस्तारणाऱ्या वसाहती आणि वाढती व्यापारी उलाढाल लक्षात घेता येथील डाकघरात किमान चार टपाल सेवकांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोनच टपाल सेवक कार्यरत आहेत. त्यामुळे टपाल वाटप, पार्सल वितरण तसेच आर्थिक व्यव– हारांवर मोठा ताण येत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. मुखेड डाक घरासाठी तातडीने दोन नवीन टपाल सेवकांची नियुक्ती करावी व कार्यालयात अपुरे असलेले मनुष्यबळ भरती करुन पूर्ण करण्याचीमागणी ग्राहक व सुज्ञ नागरिकांतुन होत आहे. मुखेड डाकघरा मार्फत दररोज सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार होतात. सक ाळी आठवाजल्यापासून ग्राहकांसाठी पैसे काढण्याची व इतर आर्थिक सेवांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या कामासाठी सध्या ग्रामीण टपाल सेवकांची मदत घेतली जाते. मात्र नवीन टपाल सेवकांची नियुक्तीझाल्यास ते आर्थिक व्यवहारांमध्ये मदत करू शकतील आणि ग्रामीण टपाल सेवकांना त्यांच्या मूळजबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडता येतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सध्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या खासगी कंपन्याजलद पार्सल वितरण करत असताना डाक घरातून येणारी पार्सलही वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन टपाल सेवकांसमोर उभे आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे टपाल सेवकांना प्रचंड धावपळकरावी लागत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढून सेवेच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याने येथीलटपाल कार्यालयात कर्मचारी वाढविण्याची नितांत गरज असल्याचे ग्राहकांतून बोलेले जात आहे. मुखेड शहराची व्याप्ती सुमारे दोन किलो मीटर परिसरात पसरलेली आहे.या परिसरात शाळा, महाविद्यालये, प् प्रशासकीय कार्यालये, बँका, वाढीव वस्ती तसेचअसंख्य व्यापारी प्रतिष्ठाने एकूणच मुखेड शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता डाकघरात तातडीने दोनअतिरिक्त टपाल सेवकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. यामुळे टपाल व पार्सल वितरण वेळेतहोईल, आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता संबधितविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष घालुन टपाल सेवक व अपु–याकर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड नगरपरिषद छाननीत शिवसेना (शिंदे गट) उमीदवारांचे अर्ज राखीव

    ▫️6 वाजता निर्णय न झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांत नाराजी ▫️साडेआठ वाजता घेतलेला निर्णय फलकावर लावला ▫️निर्णयात उशीर; उमीदवारांचा तीव्र असंतोष — अखेर सर्व उमेदवार पात्र मुखेड प्रतिनिधी:- १९ नोव्हेंबर  मुखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान मंगळवारी मोठी हालचाल पाहायला मिळाली. शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जांवर भाजपाकडून आक्षेप नोंदवल्यानंतर छाननी अधिकाऱ्यांनी हे सर्व अर्ज राखीव ठेवले. छाननी दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले होते की“संध्याकाळी सहा वाजता निर्णय दिला जाईल.  ठरलेल्या ६ वाजेच्या वेळेला कोणताही निर्णय न झाल्याने उमीदवार व कार्यकर्त्यांमध्येअसंतोष,संभ्रम,तणाव असे वातावरण निर्माण झाले. छाननीच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थितकरण्यात आले. संध्याकाळपासून झालेल्या प्रतिक्षेनंतर रात्री साडेआठ वाजता छाननी समितीने तांत्रिक तपासणी पूर्णकरून निर्णय अंतिम केला. त्यानंतर हा निर्णय थेट निवडणूक कार्यालयातील फलकावर लावण्यात आला. यामध्ये सर्व शिवसेना (शिंदे गट) उमेदवार पात्र ठरल्याची नोंद करण्यात आली.  निर्णयात झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या नाराजीचे वातावरण अखेर निर्णय जाहीर होताच उत्साहात बदलले. उमेदवारांची प्रतिक्रिया “सहा वाजता निर्णय देणार सांगूनही उशीर झाला, त्यामुळे प्रक्रियेबाबत शंकानिर्माण झाली होती.” दिवसभर चर्चांना उधाण भाजपाने नोंदवलेले आक्षेप ,निर्णयातील विलंब ,कार्यालयातील वाढलेली गर्दी…

    Read More »
  • राजकीय

    मुखेड नगराध्यक्ष पदासाठी १२ तर १० प्रभागातील २० नगरसेवक पदांसाठी तब्बल १२२ अर्ज दाखल 

    मुखेड प्रतिनिधी:- १८ नोव्हेंबर  मुखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (१७ नोव्हेंबर) शेवटचा दिवसहोता. दहा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अर्ज दाखल प्रक्रियेत आज दुपारी तीन वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी १२ तर १० प्रभागातील २० नगरसेवक पदांसाठी तब्बल १२२ अर्ज दाखल झाले. तहसील येथे अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होती भाजपातर्फे विजया रामराव पत्तेवार यांनी नगराध्यक्ष पदाचाअर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या डॉ. दिपाली श्रावण रॅपणवाड, तर शिवसेना (शिंदे गट) कडून विजयाधोंडूराम देबडवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. नगरसेवक पदासाठी तब्बल १२२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत तीव्र स्पर्धेचे संकेतमिळत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर असून त्यानंतरच नगरपरिषदेच्यानिवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रशासनावरही लक्षवेधी ताण निर्माण झाला. प्रचंडअर्जामुळे प्रशासनाची दमछाक झाल्याचेही चित्र दिसून आले. दरम्यान, शेवटच्या दिवशी मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रशासनावरही लक्षवेधी ताण निर्माण झाला. प्रचंड अर्जामुळेप्रशासनाची दमछाक झाल्याचेही चित्र दिसून आले.

    Read More »
  • क्राईम

    संतापजनक! ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे लैंगिक अत्याचार, मुखेड हादरलं

    नांदेड प्रतिनिधी:- ८ नोव्हेंबर २५ मुखेड शहरा मध्ये एका ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या संशयिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देगलूरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दिली. सविस्तर माहिती अशी की ,खंडोबा गल्लीत आपल्या अजीकडे राहणारी अल्पवयीन मुलगी ट्युशनवरुन घरी परतत होती. त्यावेळी नारलावार गल्लीत राहणारा २२ वर्षीय आरोपी ओंकार डाकुरवार हा तरुण तेथे उपस्थित होता. आरोपीत्याच्या बांधकाम सुरु असलेल्या घरात मुलीला घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार डाकूरवार याला पोलीसांनी तातडीने अटक केली. पीडित बालिका खाजगी क्लासेसवरुन घरी जात असताना आरोपी ओमकार डाकुरवार याने तिला बळजबरीने उचलून बांधकाम सूरू असलेल्या घरी नेले. तिथे या चिमुकलीवर अत्याचार केले. दरम्यान याघटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. यावेळी ठाण्यात नागरिकानी ठिय्या केला. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, आरोपीला…

    Read More »
Back to top button