Sharmik Ekta
-
राजकीय
‘शाळा वाचवा, शाळा सुधारा’: झेडपी शाळांच्या दुर्दशेविरोधात SFI-DYFI आक्रमक, नांदेडमध्ये बेमुदत धरणे सुरू!
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: १ सप्टेंबर २६ जिल्हा परिषद शाळांची झालेली दयनीय अवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उडालेला बोजवारा याविरोधात विद्यार्थी आणि युवक संघटना आता तीव्र आक्रमक झाल्या आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शाळा सुधारा‘ या मोहिमे अंतर्गत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आज पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जि. प. शाळांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि शिक्षणाचा घसरलेला दर्जा यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरशः वाऱ्यावर आहे. या ढिसाळ कारभाराचा जाब विचारत, विद्यार्थ्यांना तत्काळ दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेआहे. जोपर्यंत मागण्यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे. शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी…
Read More » -
सामाजिक
एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: आज पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी NCMC कार्ड अनिवार्य
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क:- ०१ सप्टेंबर २६ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एकमहत्त्वाचा निर्णय घेतला असून, १ सप्टेंबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी ‘NCMC कार्ड‘ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक एसटी महामंडळाच्या वाहतूक खात्याने ३१ ऑगस्ट २०२६रोजी जारी केले आहे. या नव्या नियमानुसार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला लाभार्थ्यांना एसटी प्रवासातील सवलतीचे तिकीट आता केवळ NCMC कार्डद्वारेच दिले जाणार आहे. सध्या ‘अमृत ज्येष्ठनागरिक‘, ‘ज्येष्ठ नागरिक‘ आणि ‘महिला‘ प्रवाशांसाठी आगार, बसस्थानके आणि अधिकृत एजंट्स मार्फत (मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लि. द्वारे) या कार्डची नोंदणी व वाटपाचे काम सुरू असून, भविष्यात टप्प्याटप्प्याने इतर सर्व सवलतधारक प्रवाशांसाठीही हे कार्ड सक्तीचे केले जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या कार्डमध्ये पैसे भरण्याची सुविधा थेट एसटीच्या वाहकांकडे (कंडक्टर) उपलब्धकरून देण्यात आली आहे. महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व विभागनियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना या नव्या नियमाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून, सर्व चालक आणि वाहकांना याबद्दल अवगत करून प्रवाशांना योग्य ती माहिती देण्याच्यासूचना दिल्या आहेत.
Read More » -
सामाजिक
मुखेडमध्ये मानवसेवेचा अनोखा जागर: ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त ६४ जणांनी केले रक्तदान
राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा स्तुत्य उपक्रम; प्रशासकीय व वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २८ ऑगस्ट २६ जश्ने ईद–ए–मिलादुन्नबीच्या पवित्र सणाच्या औचित्य साधून मुखेड येथे राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेच्या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या याशिबिराला नागरिक, युवक आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल ६४ जणांनी रक्तदान करत समाजा समोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या शिबिराचे उद्घाटन हाफिज अब्दुल गफार आणि हाफिज माजिद बागवान यांच्या शुभहस्ते पार पडले. या समाजपयोगी उपक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी आदमपूरकर, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड, डॉ. दिलीपराव पुंडे, डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. श्रीहरी बूडगेमवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पो.उप.नि. संदीप यामावार उपस्थित होते.…
Read More » -
आरोग्य
आज मुखेडमध्ये जश्ने ईद-ए-मिलादुन्न्बी निमित्त भव्य रक्तदान शिबिर.
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- २६ ऑगस्ट २६ पवित्र सण ईद–ए–मिलादुन्न्बी म्हणजेच अंतिम पैगंबर हजरत मोहम्मद स.अ यांच्या जन्माचा पवित्र दिवस आहे. …
Read More » -
सामाजिक
पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; बाराहाळी नाक्यावरील डिव्हायडरवर लावली झाडे.
▫️शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात पडणार भर श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २१ ऑगस्ट २६ शहरात हिरवळ वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीच्या वतीने बाराहाळी नाका येथील डिव्हायडरवर मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. वाढत्या तापमानात आणि बदलत्या हवामानात झाडांचे महत्त्व ओळखून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीचे अध्यक्ष डॉ. श्रीहरी बुडगेमवार, सचिव पवन पोतदार यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
Read More » -
क्राईम
बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून खून; मुखेड पोलिसांनी अवघ्या ५ तासांत आवळल्या तिन्ही आरोपींच्या मुसक्या
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २१ ऑगस्ट २६ मौजे लादगा शिवारात प्रेम प्रकरणातून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना मुखेड पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत जेरबंद केले आहे. सविस्तर वृत्त असे की,मुखेड पोलीस ठाण्यात आरोपी किशन राजकुमार जोगदंड (रा. दापका राजा) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून दिनांक २० ऑगस्ट२०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास आरोपी किशन जोगदंड व त्याचे मित्र सोहम ऊर्फ सोम्या बयास आणि मंग्या लिंगे (सर्व रा. दापका राजा) यांनी संगनमत केले. या तिन्ही आरोपींनी फिर्यादीचे वडील यांच्या लादगा शिवारातील शेतात जाऊन त्यांच्या डोक्यात चाकूने गंभीर वार करत त्यांना जीवे मारले. तसेच, फिर्यादीच्या आईच्या तोंडावर चाकूनेवार करून त्यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला.…
Read More » -
राजकीय
मुखेड तहसील कार्यालयावर भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांचा उद्या भव्य ‘एल्गार मोर्चा.
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : १९ ऑगस्ट २६ भूमीहीनांना हक्काची जमीन मिळावी, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्न…
Read More » -
शहर
गोरक्षकांच्या तत्परतेमुळे जखमी वासराला जीवदान.
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड:- १९ ऑगस्ट २६ दि १८ ऑगस्ट रोजी दुपारी शासकीय गोडाऊन परिसरात एका गाईच्या वासराच्या पायावरून चार चाकीगाडी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वासराचा पाय पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. मात्र, परिसरातील गोरक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या मुक्या जीवाला वेळेवर उपचार मिळून जीवदान मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर वासरू वेदनेने तडफडत होते. ही माहिती बजरंग दलाचे अध्यक्ष नागेश लोखंडे आणि गोरक्षक पवन कार्लेकर यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वासराची अवस्था पाहता त्यांनी त्वरित एका तीन चाकी गाडीची(ऑटोची) व्यवस्था केली व जखमी वासराला त्यामध्ये सुरक्षितपणे उचलून ठेवत स्थानिक मुखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दवाखान्यातील डॉक्टरांनी वासराच्या जखमी पायावर तातडीने प्रथमोपचार व योग्य औषधोपचार केले. वेळेवर उपचार मिळाल्याने वासराला मोठा दिलासा मिळाला. उपचार पूर्ण झाल्यानंतर, या दोन्ही कार्यकर्त्यांनी वासराला पुन्हा त्या गाई कडे…
Read More » -
शैक्षणिक
जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न ५ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा! शिक्षक परिषदेची जिल्हा परिषदेकडे मागणी
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- १८ ऑगस्ट २६ जिल्ह्यातील शिक्षकांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आगामी शिक्षक दिनापूर्वी, म्हणजेच…
Read More » -
क्राईम
मुखेडमध्ये हिंसक प्राण्याचा थरार: शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय शेतमजुराचा भीषण हल्ल्यात जागीच मृत्यू
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १८ ऑगस्ट २६ मुखेड शहरातील यशवंतराव चव्हाण शाळेच्या पाठीमागे असलेल्या भवानी मंदिराच्या माळरानावर शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धावर हिंसक प्राण्याने अत्यंत भयानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा हल्ला इतका भीषण आणि खतरनाक होता की, या मध्येया वृद्धाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मुखेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मोतीराम लक्ष्मण वाघमारे (वय ६५ वर्षे, रा. अण्णा भाऊ साठे नगर, मुखेड) असे या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. ते नेहमी प्रमाणे भवानी मंदिराच्या माळरानात खंडाने केलेल्या…
Read More »