क्राईम

  • हिमायतनगरमध्ये ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; ११ लाख १५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त!

    हिमायतनगर प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ १८ जून २६ नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन‘ अंतर्गत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला, जर्दा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ११ लाख १५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन‘ अंतर्गत स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना आदेश दिले होते. या आदेशानुसार, पोलीस…

    Read More »
  • मे. तोष्णीवाल मेडिकलवर प्रशासनाचा बडगा; औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत मोठी कारवाई!

    नांदेड प्रतिनिधी:-श्रमिक एकता न्यूज़ १६  जून २६  नांदेड शहरातील मे. तोष्णीवाल मेडिकल्स, डॉक्टर्स लेन, नांदेड या पेढीकडून मुदतबाहय औषधाची डॉक्टराच्या चिठठी शिवाय, फार्मासिस्टचे गैरहजेरी मध्ये, विना बिलांने विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरील पेढीविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या खालील नियम १९४५ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.   औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठठी शिवाय फार्मासिस्टचे गैरहजेरी मध्ये विना बिलाने औषधाची विक्री  करू नये. डॉक्टराच्या चिठठीवरील औषधी विक्री करतेवेळी विक्री करण्यात येत असलेल्या औषधाचा तपशील  व  औषधावर नमूद  तपशील यामध्ये तफावत आढळून येणार नाही याची त्यांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी.  मुदतबाहय औषधांचे सेवनामुळे रूग्णांचे आरोग्यावर त्याचे  विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मुदतबाहय औषधी विक्री होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आवाहन सर्व औषधी विक्रेत्यांना करण्यात आले आहे.  सर्व औषध विक्रेत्यांनी सतर्क राहून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम १९४५ चे पालन करूनच औषधांची  विक्री करावी.  कायद्याचे उल्लघंन झाल्यास किंवा त्यांचे…

    Read More »
  • आंबुलगा सेवा सहकार सोसायटीत सेक्रेटरीचा अजब कारभार! संचालकांना अंधारात ठेवून ठरावावर घेतल्या सह्या; मुखेड सहाय्यक निबंधकांकडे तक्रार

    ▫️कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून ‘अज्ञानपणाचा’ फायदा! ▫️बाजार समितीच्या सभापतींच्याच गावात अंधेर नगरी? ▫️निबंधक कारवाई करणार की अर्ज लालफितीत अडकणार? मुखेड…

    Read More »
  • लोहा शहरात बंदी असलेल्या मटका जुगाराचा उच्छाद; लालसेपोटी गरीबांचे संसार उध्वस्त!

    ▫️मटका किंग माहीत असूनही पोलीस प्रशासन सुस्त का? अवैध धंद्यांवर ‘वरदहस्त’ कोणाचा? लोहा (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १३ जून २६…

    Read More »
  • अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

    ▫️अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीशी गैरवर्तन; मुलीच्या आरडाओरड्यामुळे आरोपी घटनास्थळा वरून फरार. मुखेड : मुखेड तालुक्यातून एक अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक १२ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोरील अंगणात खेळत होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीनेतिला घरात बोलावले आणि तिच्याशी अत्यंत गैरवर्तन (छेडछाड) करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करताच, पीडित मुलीने घाबरून न जाता तात्काळ आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून कोणीतरी येईल या भीतीने नराधम आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पालकांच्या तक्रारीवरून आरोपी नारायण लक्ष्मण गायकवाड (रा. उमरदरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून, पोलीस निरीक्षक चितांबर…

    Read More »
  • हिमायतनगर पोलिसांवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप: विकत घेतलेला बैल जप्त करून गोशाळेत पाठवल्याची तक्रार

    ▫️तक्रार केली तर चालता–फिरता येणार नाही“, पोलिसांकडून बेदम मारहाण आणि धमकी दिल्याचा शेतकऱ्याचा लेखी आरोप; भोकर उपअधीक्षकांकडे न्यायासाठी धाव. हिमायतनगर (प्रतिनिधी): अजीम हिंदुस्तानी १२ जून २६  शेतीकामासाठी कष्टाने खरेदी केलेला बैल पोलिसांनी ‘कत्तलीचा संशय‘ व्यक्त करत जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार हिमायतनगरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पभूधारक शेतकरी शेख जुबेर शेख रज्जाक यांनी भोकर येथील जिल्हा पोलीस उपअधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमकी घटना काय? तक्रारदार शेख जुबेर हे अल्पभूधारक शेतकरी असून ते बटाईने शेती करतात. त्यांच्याकडे आधी पासून…

    Read More »
  • मुखेड तालुक्यातील खैरका येथील युवकाचा खून

    ▫️उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह सोडून आरोपी पसार मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज १० जून २६  तालुक्यातील खैरका येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात कारणावरून जबर मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. ज्ञानेश्वर नारायण श्रीरामे (वय…

    Read More »
  • मुखेड पालिकेचा माजी मुख्याधिकारी व विद्यमान तहसीलदार विजय चव्हाण लाच घेताना रंगेहात जेरबंद; बीड एसीबीची धडक कारवाई

    ▫️६ लाख ४० हजारांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ठोकल्या बेड्या! मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०६ जून २६ जालना जिल्ह्यातील वाळू वाहतूकदार आणि उपसा करणाऱ्या व्यावसायिकांकडून दरमहा लाखोरुपयांची ‘मंथली‘ (मासिक हप्ता) उकळणाऱ्या अंबडचे लाचखोर तहसीलदार विजय…

    Read More »
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई: मुखेडच्या हुतात्मा माधव विद्यालयाचा मुख्याध्यापक ५० हजारांच्या लाचेसह नांदेडमध्ये ताब्यात!

    मुखेड प्रतिनिधी : श्रमिक एकता न्यूज़ ०४ जून २६ शालेय खर्चाचा हप्ता, बदली करून देणे आणि नोटीस न बजावण्यासाठी ५०…

    Read More »
  • मुखेडच्या पोलीस निरीक्षकाच्या अत्याचारा विरोधात आजपासूनआझाद मैदानात ‘आमरण उपोषण’

    ◽️सामान्य जनतेचा अमानुष छळ, वसुली आणि खोट्या गुन्ह्यांचे सत्र थांबवा; भ्रष्ट अधिकारी लक्ष्मण केंद्रेंना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी! मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०३ जून २६ मुखेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय, छळ आणि भ्रष्टाचार याविरोधात आज बुधवार, दिनांक ३ जून २०२६ पासून मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदान येथे आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे. मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण व्यंकटराव…

    Read More »
Back to top button